" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Action Fantasy Inspirational

4.0  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Action Fantasy Inspirational

मी जादूगार असतो तर..

मी जादूगार असतो तर..

2 mins
201


खूप पहातो डोळ्यांनी मी घडू नये ते घडताना

पुसावेत वाटे अश्रू पाहून कोणी रडताना,

गप्प का सारेच शंढ अन्याय सारा घडताना

कसा पहावा माणूस इथला नको तितका बिघडताना...?

जेव्हा जेव्हा वाईट काही घडत तेव्हा मला गांधीजींची ती तिनं माकडं दिसायला लागतात.बुरा मत बोलो,बुरा मत देखो आणि बुरा मत देखो असा संदेश देणारी ती तिनं माकडं खरोखरच महान.

.     मला तर वाटतं बुरा मत सोचो आणि बुरा मथ करो आता आपणच म्हणावं...जगाचा कायापालट व्हावा, वाईटाचा नाश व्हावा नी सर्व जग अगदी सुखात राहावं.

जगाचा कायापालट करायचा तर खरंच जादूच हवी..

म्हणून मला वाटतं आपण जादूगार असायला हवे...

मी जादूगार असतो तर दुनिया सारी बदलुनच गेली असती..

मी जादूगार असतो तर गरीब, श्रीमती इथे राहिलीच नसती.. पैसा श्रीमंतांकडे काय गरीबांकडेही राहिला असता.. माणूस पृथ्वी वर नाही तर आकाशात, चंद्रावर काय तर सुर्या वरही दिसला असता.

मी जादूगार असतो तर सारी दुनिया जादुची च झाली असती...कष्ट, दुःख,यातना, अश्रू, गरीबी, दारिद्रय यांचा नायनाट झाला असताच पण कोणी कुणाचा दुश्मन, शत्रू राहिला नसता,भारत पाकिस्तान या कोणतं महायुद्ध घडलं नसतं कोणी उपाशी राहिला नसता.मंत्र उच्चारताच हवं त्याला हवं ते राहायला, खायला, प्यायला,लेवायला, नेसायला जे हवे ते प्रत्येकाला मिळाले असते... अन्याय, अत्याचार,बंड,, भ्रष्टाचार नी स्वार्थ केंव्हाच संपून गेला असता..

    दुनिया म्हणजे सारा स्वर्ग झाला असता., माणूस माणूस राहिला असता तो हैवान झाला नसता... सारं काही भलं नी कल्याण झालं असतं तर मी जादूगार असतो तर..

दे देवा दे मला अशी जादू दे, मला मोठा जादूगार कर.

मी या दुनियेला खरा स्वर्ग बनवीन...


अवतरला असता स्वर्ग पृथ्वी वर

मी जादूगार असतो तर....

मी जादूगार असतो तर..


Rate this content
Log in

Similar marathi story from Action