Vasudha Naik

Others

3.4  

Vasudha Naik

Others

मायेच घर

मायेच घर

2 mins
152


 घर, घर म्हणजे चार भिंती नसून आपला एक छान निवारा आहे. संध्याकाळी दमून भागून नोकरीवरून आल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण शिरल्यानंतर आपल्याला मायेचा पांघरुण देते ते घर.

  आजकाल सर्व गृहिणी नोकरी करतात. त्यामुळे प्रत्येकाकडे एक कामवाली बाई असतेच असते. मग स्वयंपाक करायला एखादी असेल,घर कामाला एखादी असेल,वर कामाला एखादी असेल,पण कामवाली बाई असतेच.

  दर रविवारी सुट्टी असली की मग आपल्या घरातल्या बाईला जरा आठवड्यातनं वेगळेपणा हवा म्हणून मग ती छोट्याशा ट्रीपला जाते. आपले मन रमवते कुटुंबासमवेत वेळ घालवते.नोकरीचा ट्रेस घालवते.

   पण आपल्या घराकडे तिचे पूर्ण दुर्लक्ष होते. कामवाल्या बाईवर घर सोडून ती रिकामे होते.

  पूर्वी मात्र असे नव्हते पूर्वीच्या बायका नोकरी करणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे घरामध्ये दिवस-रात्र आपलं घर सांभाळण्यामध्ये त्यांचा वेळ जायचा.

  म्हणतात ना" चूल आणि मुल "एवढेच तिच्या जीवनामध्ये होते.

 पण ती घरातला काना कोपरा स्वच्छ लखलखीत ठेवत असे. तिची माया तिच्या घरावर असायची. घरात कुठे काय आहे, घराला डागडुजी करण्याची काही गरज आहे का, पावसाळ्यामध्ये आपलं घर गळत तर नाही ना, असे अनेक प्रश्नांना ती स्वतः तोंड देत असे.

  आजकाल काय झालं आपल्या घराकडे पाहायला नोकरी करणाऱ्या बाईला वेळ नसल्यामुळे, तिचे घराकडे पूर्णतः दुर्लक्ष होते.

  पण आपण एक महिन्यातनं एक दिवस तरी असा ठेवावा की आपल्या घराकडे आपण पाहावे.आपल्या हाताने झाडून काढावं.फरशी पुसावी. घराला कुठे काही करायची गरज आहे का ते बघावं. खूप किरकोळ गोष्टी असतात पण त्या कराव्या लागतात.

उदा... बेसिनचा पाईप तुंबलाय आहे का, घराचे काने कोपरे स्वच्छ आहेत का, फ्रिज स्वच्छ आहे का, फ्रिजमध्ये एखादा पदार्थ तसाच राहून जाऊन तो सडला आहे का, घरामध्ये डबे भरून ठेवलेत पण ते डबे आपण कधी उघडून बघितलेत का त्यामध्ये किडे तर झाले नाहीत ना, असे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील.

  नारी तू आहे जगात भारी. तर प्रत्येक स्त्रीला महिन्यातला एकदा तरी आपल्या घराला मायेन हात फिरवावा.

  घराचे बाळांतपण छान करावे. घराला बरे वाटेल. घर जरी निर्जीव असेल तरी त्याचा जीव असतो ना. आपण घरामध्ये आल्यानंतर तो आपल्याला मायनं जवळ करतोच ना.

  आपण घरी आल्याबरोबर हात पाय ताणून बसतोच ना. मग ज्या घरामध्ये आपण खूप छान रिलॅक्स होऊ शकतो त्या घराला आपण आपलेपणा द्यायला नको.

   चला तर मग माझ्यासहित मी पण एक नोकरी करणारी आहे ना, आपण सर्व नोकरदार महिला आपल्या घराकडे महिन्यातले एकदा तरी छान त्याच्या डोक्यावरून हात फिरवूया, आणि त्याचे काने -कोपरे साफ करून घेऊन घराला काय हवं आहे याची विचारपूस करूया.

  बघा बरं मग मायनं हात फिरवलेले घर आणखी आपल्याला किती छान वाटतंय ते.

 आपण ज्या घरात विसावा घेतो ते आपलं घर होम स्वीट होम व्हायला वेळ लागणार नाही.

 काय मग पडले ना माझे म्हणणे बरोबर आहे ना.....


Rate this content
Log in