Author Sangieta Devkar

Tragedy Inspirational

4.3  

Author Sangieta Devkar

Tragedy Inspirational

माणूस म्हणून..

माणूस म्हणून..

3 mins
206


आदिती शैला चला या लवकर. निमेष ने आवाज दिला.

चल निघूया.अदिती बोलली.

आदिती तू माझ्या सोबत ये आणि शैला तू विवेक सोबत.

अरे हा विकी कुठे अडकला.अदिती म्हणाली.तो पर्यंत धापा टाकत विवेक आला.चला चला निघू.

निमेष एक डाऊट आहे रे. शैला म्हणाली.

कसला डाऊट आता.

त्या वस्तीत कस जायचे म्हणजे ऑड वाटते ना रे.

वा रे..स्त्री मुक्ती स्त्री स्वातंत्र्य यावर गप्पा मारणाऱ्या तुम्ही.आज या कामा साठी माघार घेताय?

निम्या तस काही नाही बोलण सोप आणि प्रत्यक्ष तिथे जाणं..

तू थांब मग आम्ही जातो.काय अदिती ?का तुला पण प्रॉब्लेम आहे?

नाही नाही चल.बर येते मी पण ...शैला.

कॉलेज तर्फे यांना घरा घरातून वस्ती वस्ती मधून तिरंगा वाटपाच काम दिले होते.आज त्यांना पुण्या तील बुधवार पेठेत जायचे होते.

कसे बसे बिचकत बीचकत हे चौघे त्या वस्तीत आले.त्यांना विचित्र आणि प्रश्नार्थि नजरेने तिथले लोक बघत राहिले.ही पोरं इथे का आली असतील? अस सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते तिथे एकाला लागून एक अशी सरळ रेषेत काही घर होती एका घराच्या दारावर नीमेष ने टकटक केली," अरे कोण आहे सकाळी सकाळी टपकले..आतून एका बाई चा आवाज आला.


थोड्या वेळाने त्या बाई ने दार उघडले.,. दारात तरुण चार पोरं बघून त्या बाई ला आश्चर्य वाटले,कोण तुम्ही आणि हीत काय काम हाय तुमचं?

ते आण्टी आम्ही कॉलेज मधून आलोय.

कशा साठी? मजा मारायची आहे का? का तसला अनुभव घ्यायचा हाय..

नाही नाही आंटी तुमचा गैरसमज होतोय.विकी बोलला.

आंटी आम्ही फक्त हा झेंडा द्यायला आलो होतो .अदिती बोलली.

झेंडा तो कशा पायी. आन १५ ऑगस्ट अजून लांब हाय नव्हं.

होय आंटी तेच आपल्या देशाला या वर्षी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होणार म्हणून सगळ्यांनी अप आपल्या घरावर हा झेंडा लावायचा आहे

त्यांचा आवाज ऐकून बाकी च्या खोली मधून बायका बाहेर आल्या होत्या.आणि यांचं बोलण ऐकत होत्या.

देशाला स्वातंत्र्य मिळाल म्हणून आनंद मानायचा पण आमचं काय ? आमचं आयुष्य तर या वस्तीत गहाण पडले आहे कित्येक वर्ष!. एक बाई अदिती जवळ येऊन म्हणाली.

इथे वस्तीत सगळ्याच बाया स्वतः च्या मर्जीने आल्या नाहीत काही जणींना जबरदस्ती या धंद्यात आणल. आम्हाला काय ही जिंदगी प्यारी नाय.आम्हाला पण वाटत की बाकीच्या बाया सारखं काम करून पैका मिळवावा.

आमच्या कड शिक्षण नाही.,तुमच्या सारखी परिस्थिती नाही म्हणून नाइलाजने असल काम करून जगतो आम्ही आमच्या स्वातंत्र्याच काय? सरकार ला पण वाटत नाही की आम्हाला एकदा विचाराव की बायांनो तुम्ही जबरदस्ती इथे राहता का? तुम्हाला बाकीच्या लोकां सारखं जगायचं का? ती बाई मनातलं दुःख बाहेर काढत होती.

दुसरी एक जण म्हणाली, निवडणुका आल्या की नेते लोक येतात मत मागायला..तेव्हा पण कोण आम्हाला विचारत नाही की या वस्तीत तुम्ही खुश आहात का? आम्हाला पण वाटते की या बाहेरच्या मोकळंया जगात मोकळे पणान जगावं.मोकळा श्वास घ्यावा." कोणी आमच्या कडे ती "वेश्या "या घाणेरड्या नजरेने पाहू नये.एक माणूस म्हणून जगू द्यावे पण हे तुमच्या सारख्या चार बुक शिकलेल्या लोकांना पटणार नाही की आम्हाला पण स्वातंत्र्य पाहिजे आहे.नाही जगू शकत आम्ही तुमच्या सारखं..साधं सरळ कारण आमच्या वर शिक्का बसल्याय वेश्येचा...तो ही या समाजा ने दिलेला..

पोरांनो..देश स्वतंत्र झाला पण आमच्या सारख्या बाया कधीच स्वतंत्र होऊ शकत नाहीत. समाजात ताठ मानेनं जगू शकत नाही.तरी पण तुम्ही झेंडा द्यायला आलात ..द्या ते सगळे झेंडे..आम्ही लावू आमच्या घरावर...आमच्यावर देशाने नाही समाजाने अन्याय केला आहे.देशाचा अभिमान आम्हाला पण आहे..आम्ही पण वाट बघतो आमच्या स्वातंत्र्याची....जयहिंद...ती बाई बोलली तसे तिच्या मागे सगळ्या जणी बोलल्या जयहिंद....भारत माता की जय....मेरा भारत महान...


आदिती म्हणाली खरच अशा किती तरी स्त्रिया असतील ज्या अजून ही कैदेत आहेत.कोणी या वस्तीच्या मावशी कडे...कोणी संशयी नवर्याच्या नजरेत...कोणी मानसिक शारीरिक छळ करणाऱ्या सासरी...कोणी स्त्री हुंड्या साठी अत्याचार सहन करत असेल...कोणी बालिका गर्भातच मारली जात असेल...प्रत्येक घराच्या दारा मागे पारतंत्र्यात एखादी स्त्री नक्की असेल.... चौघांच्या नजरेत प्रश्न होते.त्याची उत्तरे मात्र अनुउत्तरीत होती.


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy