माझ्या आठवणीतली ती...
माझ्या आठवणीतली ती...
आज अचानक तिची आठवण आली....
हा...हा...
हा ठीके...येत असते आठवण अधून मधून...पण बोलू नाही शकत कोणाला...आणि बायको तकतक करायला लागली...की हमखास येते तिची आठवण...आणि डोळ्या समोर उभी राहते ती... तिची छटा....काय बोलावं आता तिच्या दिसण्या बदल...गोरा रंग , काळे भोर डोळे , काळे लांबसडक केस , लालचुटुक ओठ आणि त्याच्या वार येणार गोड स्मित...हसायची ती...पण घायाळ मी व्हायचो...
पण आज काय माहित... कुठून इतकी आठवण झाली...आज सहजच... कॉफीचा मग घेऊन बाल्कनीत बसलो होतो...पाऊसच वातावरण झालेलं....आणि त्या पावसा बद्दल तर मी कायच बोलावं....पाऊस म्हंटला तर मला न आवडणारा ऋतू...पण पावसा मुळे झालेली भेट...आणि तिथून जमलेल पावसाचं... आणि माझं नात...या बद्दल तर बोलावं तितकं कमी आहे...
एक दिवस असाच पाऊस पडत होता....माझा नवीन ऑफिसचा पहिला दिवस...घरातून तसा लवकर निघालो होतो...पण नेमक पावसामुळे... जाऊस तर उशीर झाला... शिव्या तश्या मी अफाट घातल्या पावसाला...पण काय करता शेवटी नवडत बोलायलाच नको....अत गेल्या गेल्या पहिल्याच दिवशी प्रसाद देण्यासाठी केबिन मध्ये बोलवलं गेलं....आतमध्ये जाताच खूप साऱ्या प्रसादाचा वर्षाव झाला...मॅनेजर काय थांबायचं नाव घेत नव्हता....पण तेव्हड्यात माझ्या शेजारून एक आवाज आला... "Sir please लवकर signature हवी होती... क्लाएंटचा माणूस वाट बघतो आहे..." एकदम गोड आवाज माझ्या कानावर पडला...आणि मी झटक्यात त्या बाजूला बघितलं.... ती उभी होती समोर...तिला बघून माझी जशी विकेतच पडली...पण तेव्हड्यात सर बाहेर जाऊन काम करायला बोले...माझी तंद्री भंगली...पण मी कोणताही विचार न करता माघ फिरलो...पण न राहून शेवटी मी माघारी परत एकदा वळून बघितलं....आणि तिचा तो चेहेरा बघितला....पण शेवटी भानावर येत मी लगेच बाहेर आलो...पण कामात काही लक्ष लागत नवत...सारखी ती आणि तिचा तो चेहेरा...मी माझ्या विचारत गुंग झालो होतो...अस वाटत होत सगळे विचार सारून फक्त तिला बघावं...पण तेव्हड्यात कानावर परत तो मंत्रमुग्ध आवाज पडला...आणि माझी तांद्री खडक्यात तुटली....मी लगेच वरती बघितलं..."नेहेमी मी नसेल वाचवायला...लवकर येत जा... And all the best...it's your first day in this office...." ती एवढाच बोली आणि तिच्या जागेवर निघून गेली....तेव्हा मला अस वाटल ना...की दररोज पाऊस पडावा....आणि मला दररोज तिने वाचवलं...पाहिले नावडणारा पाऊस आता आवडू लागला....पण तिचे ते शब्द...माझ्या मनावर चांगलीच जादू करून गेले...हळू हळू बोलणं व्हायला लागलं....मैत्री झाली....ठीक मित्राचे खूप चांगले मित्र बनलो....तिच्या सोबत गप्पा मारणं...बोलणं....वेळ घालवण....मला आवडू लागलं...कोन्हा मध्ये न मिसळणार मी....तिच्या मध्ये पुरता मिसळलो....तिचा सहवास जसा आवडू लागला....तशी ती पण खूप आवडू लागली...आवडायचं रूपांतर प्रेम मध्ये झालं....तिच्या काढून पण काही तरी आहे...अस मला कायम वाटायचं...अर्थात ते डोळ्यात दिसायचं...पण इतका सगळं असूनही बोलण्याची हिंमत कधीच होत नव्हती....कायम भीती वाटायची की तिच्या मनात काही नसलं तर मैत्री पण गमावून बसेल....आणि खर सांगू ना...तर प्रेम कारण सोप असत हो....अवघड असतं ते व्यक्त होन.
...ते व्यक्त कारण म्हणजे जणू अग्नी परीक्षा होय....हो की नाही....? पण कधी न कधी त्या अग्नी परीक्षेत उतरण ते होताच....शेवटी मनाशी खूप ठरवलं....की आता काही पण होऊ बोलायचं....काय होईल काही नसलं तर नकार देईल....पण ते रेग्रेट्स नको आयुष्यभर....तिला वर्षाच्या पहिल्या दिवशी सगळं सांगायचं....अस मी ठरवल....नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी माझ मन मी तिच्या समोल मोकळं करेल....आणि नवीन वर्षाची... आणि आयुष्याची... दोन्हींची सर्वात तिच्या सोबत करेल....
आता सगळं काही मनात ठरलं होत...फकात सत्यात उतरवायची वेळ बाकी होती...सगळी स्वप्न रंगवत होतो...मी खूप जास्त खुश होतो...नवीन वर्ष चालू व्हायच्या दोन दिवस आधी मी ऑफिसला गेलो....आणि समोर ती उभी होती...हातात ट्रान्स्फर लेटर घेऊन....ते बघून मी थोडा चक्रावलो....तिला मी पुढे विचारणार "हे काय....?" पण तेव्हड्यात दुसरा हात समोर आला....आणि त्या हातात तर मी लग्नपत्रिका बघून पूर्ण खचलो....सगळी स्वपन क्षणात नाहीशी झाली....डोळ्यात क्षणात पाणी आलं....मनात खूप सारे विचार चालू झाले....पण मी नरहाऊन तिच्या डोळ्यात बघितलं.....तिच्या पण डोळ्यातून खळाखळा पाणी वाहत होत....मी ते अश्रू पाहून... पुढे बोलणार...पण तीच पुढे बोली...."नका काही बोली आता....मी आता तुम्हाला कोणताही उत्तर देऊ शकत नाही....खूप वेळ झाला....."ती रडक्या आवाजात बोली.....आणि माझ्या घाष्याशी आलेले शब्द माघ फिरले....तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून... तिला जवळ घ्यावं...आणि स्वतः ते पुसावे अस झाल होत...पण आता सगळे अधिकार मी गमावून बसलो होतो....मी खरंच व्यक्त व्हायला खूप वेळ केला होता....मी शेवटी तिथून परतायचं ठरवलं....आणि शेवटी फक्त "अभिनंदन...."बोलून तिथून परतलो....तिथून पुढे तिची आणि माझी भेट कधीच झाली नाही....ना आम्ही पण एकमेकांना भेटण्याचं try केलं....
त्या नंतर दोन वर्षात मी पण लगणं केलं....माझा सौंसाराचा गाडा वढू लागलो....मी पण माझ्या आयुष्यात खूप खुश आहे....माझ्या बायकोला तिच्या बद्दल सगळं माहित आहे....आणि तिने ही मला माझ्या भूतकाळा सकट स्वीकारलं आहे....
पण....
आज सुधा कधी कधी शांत बसलो ना... की ती आठवते...अस वाटत का लवकर व्यक्त नाही झालो....खूप सारे प्रश्न मनात येतात....
कशी असेल ती....?
कुठे असेल....?
खुश असेल ना....?
अशे ना...ना... प्रकारचे हजारो प्रश्न मनात येतात.....पण शेवटी....त्याची इच्छा....आणि नियतीचा खेळ....म्हणून सोडून द्यावं लागतं....शेवटी आयुष्य आहे....ते ठरलं तसच जाणार....त्या मुळे सगळ्या गोष्टींना आयुष्यात मान्य करण खूप महत्त्वाचं असतं....आणि ती एक गोष्टच आयुष्य खर आनंदी जगू देत असते....
आता शेवटी असाच वाटत...की ती खुश असली पाहिजे....जिथे कुठे असेल...आणि तिचा नवरा तिच्या वर जीवापाड प्रेम करणारा पाहिजे....
एवढीच काय आता माझ्या आठवणीतली ती....बोलायला खूप आहे पण नंतर कधी तरी....बाकी माझं नाव प्रभाकर म्हात्रे....ते सांगायला विसरलो होतो....म्हणून आता बोलो...तीच मात्र विचारू नका....सध्या खूप आठवते ती...पुन्हा भेटबीट होटे का काय....?काय माहित...पण भेटली तरत परत लिहिलंच एखाद पान....