Ashvini Duragkar

Drama

3.3  

Ashvini Duragkar

Drama

माझा आवडता कलाकार - नवाजुद्दीन सिद्दिकी

माझा आवडता कलाकार - नवाजुद्दीन सिद्दिकी

3 mins
431


माझा आवडता कलाकार नवाजुद्दीन सिद्दिकी... जन्म १९ मे १९७४. बुढाना, मुझफरनगर च्या एका छोट्याश्या गावातून मोठी स्वप्ने घेऊन आलेला अभिनेता. अभ्यासात हुशार विज्ञानाच स्नातक, अगदीच माध्यम कुटुंबातून आलेला, वडील शेतकरी, वर्णाने सावळा, उंचीने ठेंगणा, वागण्यात-बोलण्यात यू॰पी॰ ची झलक असलेला पण तेवढाच डाऊन टू अर्थ आणि उत्तम व्यक्तिमत्व असलेला स्वप्नांना मोठी पंख लावून आलेला धूमकेतू. घरच्यांच्या विरुद्ध जाऊन दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विश्वविद्यालयातून अभिनयाचे धडे घेऊन सिनेमासृष्टीत आपलं प्राक्तन घडवायला आलेला. कित्येक संघर्ष करून सुरवातीला त्यांना छोट्या छोट्या भूमिका मिळाल्या. १९९९ मध्ये सरफरोश सिनेमात एक अगदीच छोटी भूमिका पार पाडून त्यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले आणि लवकरच लाखोंच्या संख्येने त्यांचे प्रशंसक वाढले. त्यानंतर शूल, मुन्नाभाई M.B.B.S., आजा नचले, न्यूयॉर्क इत्यादी चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या नवाजुद्दीनला सन २०१२ साली विद्या बालन अभिनीत कहानी ह्या चित्र्पटातील भूमिकेसाठी प्रसिद्धी मिळाली. यानंतर गॅंग्ज ऑफ वासेपूर, तलाश इत्यादी चित्रपटांत त्याच्या प्रमुख भूमिका होत्या. तलाशमधील भूमिकेसाठी त्याला झी सिने पुरस्कार व स्क्रीन पुरस्कार मध्ये सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले. २०१३ मध्ये लंच बॉक्स साठी फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्य्क अभिनेता पुरस्कार प्राप्त झाला आणि मग बजरंगी भाईजान व बदलापूर, किक ह्या चित्रपटांद्वारे सिद्दिकीची प्रसिद्धी अजूनच वाढली. प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाची तोंड भरून प्रशंसा तर केलीच सोबतच कौतुकाचा वर्षावही केला. 

    

पण मला आवडलेला त्याचा आता लेटेस्ट आलेला रितेश बात्रा द्वारा दिरदर्शित चित्रपट फोटोग्रॉफ. सिद्दिकी किती कुशल कलाकार आहेत ते त्यांच्या या हलक्या फुलक्या शोर्ट फिल्म मधून प्रेक्षकांना उत्तम कळल. अभिनयाचा जिवंत आणि अप्रतिम हिरा. त्यांच्या एका एका डायलॉग मध्ये किती शुद्धता असते. ते छोटे छोटे हावभाव, त्या छोट्या छोट्या शारीरिक हालचाली, ते वेगळेच छोटे छोटे पंच सगळंच आगळ वेगळं आणि हटके असत. 

     

या चित्रपटात त्यांनी रफी नावाच्या एका गेट वे ऑफ इंडिया वर काम फोटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारलेली आहे. तो मिलोनी (सनाया मल्होत्रा) नावाच्या मुलीची गेट वे ऑफ इंडिया वर फोटो काढतो तेव्हा तिला म्हणतो " ये रात यूही ढल जायेंगी पर ये उगता सूरज आपके साथ हमेशा रहेगा" त्याच हे बोलणं तिला खूप आवडत.ती त्याच्या कडन फोटो काढते आणि घाई घाईत त्याचे पैसे न देता निघून जाते. 

    

तो तिला शोधतो पण ती त्याला भेटत नाही. त्याची आजी येते गावावरून त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटायला. तो नकळत तिला तिची फोटो दाखवतो. तिला ती खूप आवडते आणि भेटायची जिद्द करते. मग तो तिला भेटतो. तिला त्याच्या आजी ला भेटायला तयार करतो आणि मग सुरुवात होते एका सुंदर कथेची. 

    

ती एका उगवलेल्या सुंदर पहाट सारखी असते आणि तो मावळणाऱ्या सूर्यासारखा तरीही त्याच्या व्यक्तिमत्वावर तीच प्रेम जडत आणि दोघे एकमेकाला न भेटता चित्रपटाचा दुःखद अंत होतो. दोघांनी अतिशय उत्तम अभिनय करून खूप वाह वाही लुटली पण एक लेखक म्हणनू मी त्याचा अंत बदलवू इच्छिते दोघांनी एकमेकाला आणखी समजावं, एकमेकांच्या प्रेमात पडावं आणि मग लग्न करावं. माणसाचं मन सुबक आणि शुद्ध असायला हवं असच मिलोनी समजून त्याच्याशी लग्न करावं. हा असावा या चित्रपटाचा अंत. 

अतिशयच उत्तम अभिनयाद्वारे नवाजुद्दीन नेहमीच प्रेक्षकांचे प्रिय बनतात. त्यांच्या सुबक आणि हटके किरदार ने माझे हि ते आवडते कलाकार आहेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama