Love Marriage
Love Marriage
माधुरी आणि सागर दोघेही पोलीस स्टेशन मध्ये बसलेले होते. अचानक तिथे माधुरी चे बाबा आणि भाऊ आलेत. त्यांचे चेहरे काळजी ने सुकले होते. सकाळपासून रात्रीपर्यंत ते आपल्या लाडक्या लेकीचा माधुरी आणि नातीचा ईश्वरी चा शोध घेत होते. पण हा शोध निरर्थक आहे हे त्यांना आधीच समजले होते.पण मुलीपेक्षा ईश्वरी महत्त्वाची होती त्यांना. हो माधुरी आणि सागर पळून जाऊन प्रेमविवाह करणार होते. ईश्वरी ही माधुरी ची पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी होती. आणि तिच्या नावावर बरीच रक्कम जमा होती.या पैशासाठी कदाचित सागर माधुरी सोबत लग्न करत असेल म्हणून त्यांना ईश्वरी परत हवी होती. कारण माधुरी येणार नाही याची खात्री त्यांना होती.
माधुरी ही मध्यम वर्गीय घरात जन्माला आलेली एक सुंदर सडपातळ बांधा असलेली साधी सरळ मुलगी.जी बोलकी आणि दिसायला ही सुंदर. तसेच सागर हा तिचाच शाळेत होता. घरची परिस्थिती साधारण होती.एक भाऊ आणि म्हातारी आई असे तिघे राहत होते.दोघांचे शिक्षण दहावी पर्यंत होते. सागर व्यसनी होता. हे माधुरीला माहीत नव्हते. माधुरीचे लग्न हे एका प्रायव्हेट बँकेत कारकून असलेल्या राजेश बरोबर करून देण्यात आले. राजेश हा स्वभावाने प्रेमळ,शांत मुलगा होता.
राजेश आणि माधुरी यांच्यात सगळ व्यवस्थित सुरू आहे याची खात्री नेहमी बाबा करून घेत होते. आणि ती राजेश सोबत व्यवस्थित राहत ही होती. पण ती सागरला विसरली नव्हती. म्हणून ती राजेश सोबत भांडण करण्याचे कारण शोधत असे, कधी सासू वरून तर कधी सासरे, कधी नणंद बाईला घेऊन भांडायची. राजेश दिवसभर काम करून थकून घरी यायचा आणि घरी नेहमी काही न काही असायचं. त्याला वाटल कधीना कधी माधुरीचा स्वभाव बदल होईल आणि ते समाधानान राहतील. अशातच त्यांना एक मुलगी झाली ती म्हणजे ईश्वरी होय. ईश्वरी तिच्या आईसारखी दिसायला सुंदर नाजूक होती. पण जसं जशी ईश्वरी मोठी होत गेली तसं तसा माधुरीचा स्वभाव त्रासदायक होत गेला. एक दिवस त्यांचे भांडण एवढे विकोपाला गेले की ती कायम ची माहेरी निघून आली.
माहेरी तिची खूप समजूत काढली गेली पण तिला तिथं जाणेच नव्हते म्हणून घरच्यांनी घटस्फोट घेतला. यामध्ये दोघींच्या नावे मोठी रक्कम देण्यात आली. आता त्या दोघीही माहेरी राहत होत्या. माधुरीने ब्युटीपार्लर सुरू केले. घरापासून फार लांब नव्हते पण तरीही नजरें आड होते. याचाच फायदा तिने आणि सागर
घेण्यास सुरवात केली. परत ते एकमेकांच्या संपर्कात, जवळ येऊ लागले. असेच सहा सात महिने निघून गेलेत. आणि माधुरीच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा घरी सुरू झाली. तिच्या साठी एक चांगले स्थळ आले जे सगळ्यांना पसंत होते आणि त्यांनी ईश्वरी सह माधुरीला पसंत केले.या मुलाचे नाव होते रुपेश.
रुपेश ही दिसायला हँडसम स्मार्ट होता. तोही एका बँकेत कॉम. ऑपरेटर होता. त्यामुळे दोघांचे लग्न करून द्यायचे ठरले. ठरल्याप्रमाणे दिवाळी नंतर लग्न काढण्यात आले. हळू हळू ही बातमी सागर लाही समजली. पण त्याची एवढी तयारी नव्हती की लगेच तो माधुरीला पळून घेऊन जाईल. त्याने काही दिवस थांबायचं ठरवलं. लग्नापर्यंत तिचे ब्युटीपार्लर सुरू होतेच,भेटी आणि बोलणे ही व्यायचे.त्यामुळे त्यांना जास्त त्रास सहन करावा लागत नव्हता. पण माधुरीला हे लग्न करायचे नव्हते. तरीही तिचा नाईलाज झाला होता कारण, तिने खूप वेळा याची कल्पना घरी दिली होती पण कुणी तिला समजून घ्यायला तयार नव्हते. नाईलाजास्तव तिने हे लग्न केले.
रुपेश माधुरी सोबत ईश्वरी ची काळजी घेत होता. रोज जाताना तिचे लाड करायचा. संध्याकाळी तिच्यासाठी खाऊ आणायचा. इथे माधुरीला सासूबाई नव्हत्या त्या तिघांशिवाय तिचे सासरे गोविंदराव होते. तेही दिवसभर ईश्वराचा आपल्या नातीप्रमाने सांभाळ करत होते. मध्यंतरी ती एक दोन वेळा माहेरी येऊन गेली होती. खूप छान सासर मिळालं म्हणून कौतुक करत होती आणि घरचे सगळे तिची आणि तिच्या मुलीची कशी काळजी करतात हे आवर्जून सांगत होती. आणि ती आनंदी आहे तिथं हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. पण ते असते न विनाश काळे विपरीत बुद्धी तस् झाले होते माधुरीचे तिला दोन वेळा लग्न करायला भाग पाडणारा मुलगा कसं काय तिच्या वर खर प्रेम करू शकते हेही तिला कधी समजल नाही.आणि ती काही महिन्यातच तिथूनही परत माहेरी आली. आणि ईश्वरीला घेऊन सागर सोबत तिने पलायन करण्याचं ठरविल, आणि पकडल्या गेले.