लॉकडाऊन दिवस क्र. 19
लॉकडाऊन दिवस क्र. 19

1 min

377
आज सकाळी शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम यांचा फोन आला. कोरोना जनजागृतीसाठी एक विडिओ त्यांनी मला बनवायला सांगितला. मी लगेच माझ्या वर्गातल्या मुलांना फोन करून कोरोना विषयावर आधारित चित्रं काढून व्हाट्सअँप ग्रुपवर टाकायला सांगितली. काहींना हात धुणे प्रात्यक्षिक करण्यास सांगितले. दुपारपर्यंत एक मस्त विडिओ बनवून मॅडमला पाठवून दिला आणि कोरोना काळात वर्क फ्रॉम होमचा आनंद घेतला.