लॉकडाऊन डायरी #14
लॉकडाऊन डायरी #14
प्रिय डायरी,
आज चौदावा दिवस. भाजीच्या सुवासाने जाग आली. पोटात कावळे ओरडत होते. मस्त तयार होऊन पोटोबाची पूजा केली. मी लावलेल्या मेथीच्या बिया आता चांगल्याच उगवल्या आहेत. त्यात मी अजूनही काही बिया लावल्या होत्या. त्या मात्र अजून उगवलेल्या दिसत नाहीत. त्यांना पाणी दिलं.
इतरवेळी बोलायला वेळ नसतो; परंतु आता सक्तीचा आरामच आहे! दिवसभरात अनेकांचे कॉल्स येत असतात. आणि समाज माध्यमे आहेतच करमणुकीला!
आता जवळजवळ सर्वच वाहिन्यांवर जुन्या मालिका दाखवू लागले आहेत. त्यामुळे घरच्या मंडळींनाही जुन्या आवडत्या मालिका पाहता येत आहेत. हल्ली उष्णता भयंकर वाढत चालली आहे. रात्री झोपही येत नाही कारण दिवसभर काही कामच नाही.पण तरीही झोपायला तर हवंच. तर माझ्या प्रिय डायरी, चला शुभ रात्री!