लॉक डाऊन दिवस - 7
लॉक डाऊन दिवस - 7


बघता बघता एक एक दिवस पुढे जात होता. तसं तसं आपण त्या विषाणूच्या जाळ्यामध्ये आपण अडकत चाललो होतो. एवढ्या साऱ्या योजना आखून, त्यांची पद्धतशीरपणे पालन केले जात होते. फक्त काही आडमुठ्या लोकांमुळे त्या विषाणूला त्याचे घर बनवण्यास आणि त्याचा विस्तार करण्यास मदत होत होती.
अशा लोकांच्या मनामध्ये देशभक्ती आणि समाजाचं, आपल्या परिसराचे, आणि देशाचं हीत शासन ज्या या गोष्टी सांगत आहेत ,त्यामध्येच आहे अशी नवीन प्रत्येक खेड्यापाड्यात गावागावात जाऊन सरकार यंत्रणेच्या मदतीने प्रसार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हे सर्व करत असताना खुप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. पण त्या सर्वांवर मात करत ,आपल्या देशासाठी सर्वजण जे त्यांचे परिवाराला सोडून देशाच्या रक्षणासाठी तसेच ,सर्वान पर्यंत आवश्यक अशा सेवा पुरवठा करत असणाऱ्या आदर्श समोर ठेवला तर ते काहीच नव्हतं वाटत.
हळूहळू जसजशी अनेक समाज सुधारकाकडून, तसेच आणि क्षेत्रातून मदत येत गेली. सर्वजण आपापल्या परीने खारीचा काना वाटा देत होते. हिच तर आपली ताकद आहे . त्यामधून ज्या गोष्टी ज्या विषयाने पासून आपल्याला संरक्षित ठेवतात त्या खरेदी करून हळू एका-एका टप्प्याने गरजू पर्यंत पोचण्याचा हा नवीन ध्यास मनाशी बाळागला...