लॉक डाऊन दिवस-6
लॉक डाऊन दिवस-6
सकाळी लवकरच उठून आपण आपले कर्तव्य देशासाठी काहीतरी आहे, ही मनामध्ये जाणीव होती. त्या विषाणू बद्दल जनजागृती होणे फार आवश्यक होते. त्यासाठी अनेक संस्था, शासन, प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने जेवढे काही होईल तेवढे सर्व करत होते. एकीकडे करोना विषाणूचे रुग्ण बरे होत होते.अतिशय आनंददायी वार्ता होती. पण दुसरीकडे चिंता वाढवणारी बाब म्हणजे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. अशा भयंकर परिस्थितीत गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा उद्भवलेल्या अतिशय भयानक अशा परिस्थितीत आता समाज जाणीव, माणुसकीची जाण ठेवणे हाच तर खरा आपल्या भारत देशाचा खरा धर्म. अनेक एक संस्था, अनेक एक दानशूर व्यक्ती, सर्वजण कसोटीने आपले आपले खारीच्या वाटा प्रेमानं योगदान देत होते.
आमचीसुद्धा टीम आता सज्ज झाली होती. विविध ठिकाणी आपापल्या परीने समाजासाठी जे काय करता येईल ते प्रत्येक जण अतिशय अशा उत्साहाने, जोमाने करत होते. हे सर्व करत असताना सरकारच्या सर्व सूचनांचं पालन अतिशय योग्य पद्धतीने प्रत्येक जण करत होता...