End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

SWATI WAKTE

Others


3  

SWATI WAKTE

Others


क्षमा... तिचा संघर्ष

क्षमा... तिचा संघर्ष

3 mins 184 3 mins 184

क्षमाला शेवटच्या दिवसात तिनी तिची संपत्ती कुणाच्या नावाने केली हे विचारण्यासाठी लांबून नातेवाईक भेटायला येऊ लागले.. जेव्हा त्यांना कळले की क्षमा आता काही दिवसांचीच सोबती आहे.. क्षमाला कॅन्सर डिटेक्ट होऊन एक वर्ष झाले होते, पण कुणीही तिच्या जवळ आले नाही, कधी काळी तिची फोन वर चौकशी करून कॅन्सर बरा होतो फक्त हे कर ते कर एवडीच सल्ला देत पण तिच्या सोबत दवाखान्यात यायला किंवा तिची काळजी घ्यायला कुणी येत नव्हते.. ती एकटीच खटपट करून दवाखान्यात जात असे केमोथेरपी घेत असे.. औषधी घेत असे.. बरेचदा क्षमा नी आपल्या बहीण भावाला विनंती केली की कुणीतरी माझ्याजवळ या किंवा तुम्हाला जमत नसेल तर मीच येते तुमच्याकडे कारण काही कमी जास्त झाले तर मी एकटीच आहे आणि हे सर्व कसे करेल... पण सर्व जण तिला तिथे न येऊ द्यायचे किंवा त्यांना येणे जमणार नाही ह्याचे हजार कारण सांगत होते.. असे एक वर्ष क्षमा एक स्वतःच्या मदतनिसांच्या हाताने एकटीच स्वतःचे आजारपण काढत होती जेव्हा डॉक्टरनी सांगितले की क्षमा आता 15 ते 30 दिवसांचीच सोबती आहे हे कळल्यावर मात्र सर्व आले आणि तिला तुझी संपत्ती कुणाच्या नावावर केली ह्याचा जाब विचारू लागले तेव्हा क्षमाला खुप वाईट वाटले आणि सर्व भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर येऊ लागला.. क्षमा तीन भावंडांपैकी सर्वात मोठी मुलगी.. तिला एक भाऊ आणि एक बहीण असते.. वडील एका छोटया कंपनी मध्ये कामाला असतात.. दिसायला सावळी ठेंगणा बांधा अशी असते.. तिचे बाकी भावंडे ठीक असतात.. वडिलांना पगार तुटपुंजा असतो पण तरीही सर्व मुले शिकून मोठी झाली पाहिजे आपल्या सारखा आयुष्यात स्ट्रगल त्यांना करावा नाही लागला पाहिजे म्हणून सर्वानाच जे पाहिजे ते देत.. क्षमा दिसायला चांगली नसली तरी अभ्यासात प्रचंड हुशार आणि चित्रकला, खेळणे ह्या सर्व गोष्टीत ऑलराउंडर असते.. तिचे इतर भावंड अभ्यासात खुप मागे असतात.. ते जेमतेम पास होणारे किंवा फेल होणारे असतात.. क्षमा शिकून इंजिनीरिंग करून मोठया कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीर म्हणून लागते.. पण दिसायला चांगली नसल्यामुळे चांगले स्थळ तिला येत नाहीत आणि तिला कॉम्प्रमाईज करायला तयार नसते म्हणून लग्न न करण्याचा निर्णय घेते तिची बहीण भावंड कशीतरी ढकलत ग्रज्युएट होतात.. पण काही करत नाहीत वडीलही रिटायर्ड होतात.. त्यांचे स्वतःचे घरही नसते.. त्यामुळे सर्व जबाबदारी क्षमा वर पडते . बहिणीचे योग्य मुलगा पाहून लग्न करून देते.. क्षमा सॉफ्टवेअर मध्ये असल्यामुळे नेहमी तिला विदेशात पण जावे लागते.. आणि चांगले पॅकेज असल्यामुळे वडिलांना घर घेऊन देते.. भावाला बिझनेस थाटून देऊन त्याच्यासाठीही योग्य मुलगी शोधून थाटात लग्न लावून देते.... आणि भावाच्या संसारात ढवळाढवळ नको म्हणून स्वतः दुसरीकडे घर घेऊन राहते.. पण भावाच्या बायकोला काही दिवसांनी सासू सासऱ्यांच्या त्रास वाटू लागतो.. त्यांची सततची भांडणे सोडवून क्षमा कंटाळते आणि आई बाबांना स्वतःकडे घेऊन जाते आणि शेवटच्या क्षणापर्यंत आई बाबांचे स्वतः सर्व करते.. बहीण भाऊ फक्त त्यांना काही पाहिजे असले तेव्हा क्ष्माकडे जातात.. क्षमाही काहीही विचार न करता त्यांना जे पाहिजे ते घेऊन देते.. बहीण भावांना मुले होतात त्यांना क्षमा कोडकौतुक करण्यासाठी आणि आता ह्यांच्या शिवाय आपल्याला कुणीच नाही हा विचार करून त्यांच्या शाळेच्या फी पासून सर्व खर्च करते... पण वयाच्या 48 व्या वर्षी तिला कॅन्सर डिटेक्ट होतो तेव्हा कुणीही जवळ येत नाही किंवा तिला जवळ येऊ देत नाही हयांचे क्षमाला खूप वाईट वाटते.. 


जेव्हा शेवटचे 15 दिवस तिच्या हातात आहे असे तिला समजते तेव्हा सर्व तिला तिच्या संपत्तीचा वाटा मागायला येतात.. क्षमा सर्वांना तिच्या संपत्तीचे तिने काय केले सांगून धक्का देते.. ती सांगते मी थोडे पैसे माझी मदतनीस जी माझ्या सोबत वर्षभरापासून सेवा करण्यासाठी आहे तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी ठेवले.. आणि बाकी सर्व संपत्ती ने मी एक माझ्या आई बाबांच्या नावाने वृद्धश्रम काढून त्यावर खर्च केलेत त्यामुळे कुणालाही आता काहीही मिळणार नाही.. माझ्या आई बाबांना मी होते म्हणून सांभाळले पण ज्यांना कुणी नाही त्यांचे हाल होऊ नये आणि त्यांना चांगल्यात चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून हा निर्णय घेतला.. आणि दोन दिवसात समाधानाने प्राण त्यागते... काही दिवसातच भले मोठे वृद्धाश्रम होते आणि क्षमाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि एक वर्षाने क्षमाचे वर्षश्राद्ध वृद्धाश्रमात करतात आणि सर्व तिला आशीर्वाद देतात... 


Rate this content
Log in