Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

क्राॅस कनेक्शन

क्राॅस कनेक्शन

2 mins
75


मी माझ्या मैत्रिणीला वंदनाला फोन लावला.

   रिंग वाजली.ट्रिंग ट्रिंग...फोन उचलला.आवाज आला पुरुषाचा.मी जरा गोंधळले.

  वंदे,वंदना असे म्हणत फोनवर बोललेच. पुरूष बोलला"मॅम आपण वसुधा का"

  मी बोलले हो.परत विचार आला हा वंदनाचा नवरा सचीन असेल.मी बोलले "सचीन वंदीला दे फोन तिच्याकडे काम आहे."

    तो पुरूष बोलला "मॅम ,तुम्ही पुण्यावरून बोलताय,नाईक आडनाव आहे न आपले.आपण कविता करता,लेख लिहिता त्याच न आपण"

  मी बोलले हो,पण "सचीन बास झाली मजा,वंदीला फोन दे." 

    तो पुरुष बोलला "माझे नाव प्रकाश आहे.मी सचीन नाही की तुमच्या मैत्रिणीचा नवरा नाही.मी तुमचा बिग बिग बिगगगगगग फॅन बोलतोय ,प्रकाश सोनवणे ,औरंगाबाद"

   मग मात्र मी खजील झाले.साॅरी क्राॅस कनेक्शन म्हणत फोन ठेवू लागले.पण ती व्यक्ती बोलली "नाही हो मॅम,नका ठेवू फोन,क्राॅस कनेक्शन जरी लागले तरी मी तुमचा खूपप मोठा फॅन आहे.मी तुमचे 'गुंजन मनीचे' पुस्तक खूप शोधतोय पण मला मिळत नाही."

    मी खरचच आश्चर्याने आनंदीत,पुलकीत झाले होते.खूश झाले होते.त्याचा प्रत्येक शब्द कानात घुमत होता.

   मी बोलले "मी पुस्तक विक्रीसाठी ठेवली नाहीत.तर तुम्हांला कशी मिळतील?तुम्ही पत्ता पाठवा मी पाठवीन पुस्तक"

   ते म्हणाले "मी पुण्यात येत असतो.मला पुस्तक तर द्याच,भेटही होईन व भेटीअंती चहा,काॅफी ही होईल."

   मस्त बोलले "I am a big big biggggg fan fou u and ur book.."

   मी होकार दिला.व प्रत्यक्ष भेट घेवून पुस्तक ,चहा किंवा काॅफी घ्यायची हे ठरले.

  शेवटी ते एक म्हणाले"मॅम आपले स्माईल खूप छान आहे.आपण दिसताही खूप छान,आपले विचार पारदर्शक आहेत.आपले पुस्तक भारीच असणार. मॅम तुमची "आई" कविता फेसबूकवर वाचली.अक्षरशः डोळ्यातून पाणी वाहू लागले.तुमची एकच कविता वाचून मी अधीर झालोय पुढील कविता वाचायला."

   मी मनोमन आनंदले.शेवटी दोघांनी बाय करताना ते म्हणाले "तुमच्या वंदनाला धन्यवाद सांगा,त्यांच्यामुळे मी माझ्या बिग फॅनला ऐकू शकलो."

  त्यांच्या या वाक्यावर मी खूप हसले...माझे हसणे त्यांना खूप आवडले.व मी फोन बाय म्हणत ठेवला.

  असे हे क्राॅस कनेक्शन कायम लक्षात राहणारे आहे.या वरून एक समजले की आपली ख्याती होत आहे . 


Rate this content
Log in