Neha Ranalkar

Abstract Tragedy

4.6  

Neha Ranalkar

Abstract Tragedy

कंजूष

कंजूष

1 min
186


ती अतिशय काटकसरी व कंजूष स्वभावाची. वर्षानुवर्षे साठवून ठेवलेले तिच्या मुलींचे बालपणीचे चांगले चांगले कपडे,पायपुसणे वा अन्य बाबींसाठी उपयोगात येतील म्हणून तिने गच्चीतल्या ड्रम मध्ये ठेवून दिले. काही वर्षांनंतर पहाते तर सारे कपडे ओल्या‌ बुरशीने अगदीच कुजून गेल्यानं योग्य वेळी गरजूंना न दिल्याने आज तिला ते घंटागाडीत देतांना अश्रूंना आवरणे मुश्किल जात होते!

ती ही प्रातिनिधिक स्वरूपात साकारली तर आपल्या आजूबाजूला अशा खूप खूप व्यक्ती असतात ज्या भविष्यात कामी येतील म्हणून साठवून ठेवतात व शेवटी योग्य वेळी कुणा गरजूंना ते न देता आल्याने तीच गोष्ट जेव्हा कवडीमोल ठरते तेव्हा अश्रूं खेरीज काही देण्यासाठी नसतंच त्यांच्या जवळ ! अशी हि छोटी अलक (लघूकथा).



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract