Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

4.0  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

कलावंतीण नंदा (भाग 3)

कलावंतीण नंदा (भाग 3)

3 mins
180


अचानक जोरात वीज चमकली, वारे सुटले..एक मोठा प्रकाश झोत त्या दिवाणखाण्यात पसरला..संग्राम चे डोळे दिपले,आणि समोर दिसली त्याला एक मूर्तिमंत सौंदर्याची अप्सरा... कलावंतीण नंदा!


संग्राम तिला एकटक बघत राहिला.नंदा दिसायला एखाद्या अप्सरे सारखी.त्याच्या समोर कंबरे हात ठेवून उभी होती.कोण तू आणि इथे का आलास? तुला जीवाची भीती नाही वाटली का?

नाही,मला तुला भेटायचे होते.गाव वाले जे बोलतात तुझ्या बद्दल ते खरे की खोटे हे बघायचे होते म्हणून आलो.मला तुझी कहाणी ऐकायची आहे.

काय करणार कहाणी ऐकून?

ते मी टीव्ही वर बातमी दाखवणार.लोकांना तुझी भीती वाटते ती मग कमी होईल.

माझी बातमी दाखवून माझ्या वर जो अन्याय झाला त्याला न्याय मिळणार हाय काय?आणि आता तो पाटील पण मेला मग काय उपयोग?हा पाटलाचा पोरगा हाय जिवंत त्याची मी वाट बघते मी.त्याला नाही सोडणार.

तू मला तुझी कहाणी सांग मला ,मी मदत करतो.संग्राम म्हणाला.

ऐक मग,नंदा बोलू लागली.मी या गावात आली माझा तमाशा चा फड होता.पाटील माझ्या अदा वर फिदा झाला मला गोड बोलून त्याच्या या वाडयात घेवून आला.मला असच घरात ठेवली.बायको सारख ठेवंल मला.माझं तमाशात नाचण बंद केले.मी खूप खूष होते.त्याने त्याच्या बायकोला ही सांगून ठेवले की माझ्या सोबत लग्न करणार आहे अस.मी त्यांना सरकार म्हणत असे.


एक दिवस त्यांच्या कडे फॉरेन ची लोक आली. जेवण खाण पिण झालं त्यातल्या एकाचा माझ्या वर डोळा होता,त्याने सरकारांना काहीतरी सांगितले आणि माझ्या खोलीत येवून त्या गोऱ्या माणसानं माझी अब्रू लुटली.तो गेला आणि त्याची दोस्त लोक पण माझ्या खोलीत आली आणि एका पाठोपाठ सगळ्यांनी माझी अब्रू लुटली.तेव्हा मी पोटूशी होते. माझ्या अंगात काहीच त्राण राहिले नव्हते.त्यात मी आजारी पडले माझं बाळ गेलं.सरकारांच्या मागे मी लग्ना साठी हट्ट धरला,तेव्हा त्यांनी मला हाकलून दिले.मला जगण्या साठी काही कारण उरले नव्हते. मीच मग माझा बदला पूर्ण केला, पाटला चा खून केला.मी मागच्या विहिरीत जीव दिला.

पण त्या पाटलाचा पोरगा अजून जिवंत हाय,त्याची वाट बघते,त्याला पण जिवंत नाही सोडणार मी.

पण नंदा तू त्याचा जीव घेवून काय मिळवणार?

मला शांती मिळेल,सरकारच सगळ खानदान मी संपवणार आहे. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळल.

तू माझं ऐकून घेतलं जा मी तुला जिवंत सोडते नाहीतर ठार मारले असते.लोक इथ माझ्या भीतीनेच मरून जातात. संग्राम ने नंदाचा व्हिडिओ काढला होता. तिचे बोलणे सगळ रेकॉर्ड केले होते.पुन्हा एकदा जोरात वारा सुटला,वीज चमकली ,संग्राम ला काहीच दिसेना.थोड्या वेळात सगळ शांत झाले,त्याने पाहिले तर त्याच्या समोर कलावंतीण नंदा नव्हती.कोणीच नव्हती.संग्राम ने इकडे तिकडे बघितले पण तिथे कोणच नव्हते.

संग्राम मग वाड्यातून बाहेर पडला.बाहेर सगळे गाव करी त्याची वाट बघत होते.तो जिवंत परत आला यावरच त्यांचा विश्वास बसत नव्हता.

साहेब,काय झाले आत.खरच आत कलावंतीण नंदा च भूत आहे काय?.सगळे जण विचारत होते.

हो मला ती दिसली आणि माझ्याशी बोलली पण.

काय सांगता पावण,काय बोलली ती.एकाने विचारले.

संग्राम म्हणाला,हे बघा मी तिचा व्हिडिओ काढला आहे अस म्हणत संग्राम ने त्याचा मोबाईल ओपन केला आणि नंदाचा व्हिडिओ ओपन केला पण त्यात काहीच शूट झाले नव्हते.

कुठे आहे व्हिडिओ? एकाने विचारले.

मी काढला होता पण आता दिसत नाही.

संग्राम ला पण काहीच समजत नव्हते.

दुसऱ्या दिवशी संग्राम निमगावा तून बाहेर पडला.त्याला त्या कलावंतीण नंदा चे गूढ काही केल्या उलगडत नव्हते.ती त्याच्याशी बोलली ,त्याने तिचा व्हिडिओ काढला पण आता काहीच पुरावा नव्हता त्याच्या जवळ.

ऑफिस ला आला तो,राजीव सराना नंदाची सगळी कहाणी ऐकवली.त्यांचा पण विश्वास बसत नव्हता.शेवटी ही बातमी खरी की खोटी सगळच अनाकलनीय गूढ राहून गेले होते.


(समाप्त.). 

# गूढ कथा


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract