Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

4.0  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

कलावंतीण नंदा (,,भाग 1)

कलावंतीण नंदा (,,भाग 1)

2 mins
176


सर,मी जातो आहे त्या निमगाव ला,तिथली ती हॉरर स्टोरी कव्हर करतो.सगळ्या चॅनल वर ती न्युज दाखवत आहेत.ते कुठले से निमगाव एका दिवसात टॉप ला आले. रिपोर्टर संग्राम म्हणाला.

संग्राम पण या असल्या भाकड कथा वर तू विश्वास ठेवतोस का? .मुळात आपले चॅनल अशा स्टोरी साठी बनले आहे का? . "साद प्रतिसाद "चॅनल चे हेड राजीव म्हणाले.

सर तिथे प्रत्यक्ष गेल्या शिवाय खर काय आणि खोट काय याची शाहनिशा होणार नाही.त्या गावचे लोक म्हणतात की तिथे वाड्यात घुंगराचा, तबल्या चा आवाज येत असतो.अमावस्येला कोणीतरी गाणं म्हणत नाच करत असते.गावकरी अस म्हणतात की त्या वाड्यात कलावंतीण राहते, म्हणजे तिचे भूत दिसते.काही लोकांनी तिला जवळून पाहिली ही आहे.

संग्राम,आर यू शुअर हे अस काही आजच्या काळात घडत असेल? आणि जरी घडत असेल तर कोणी विश्वास ठेवेल का?

सर,म्हणूनच म्हणतो की मी स्वतः जावून याची माहिती करून घेतो.काही हाती लागले तर आपल्या चॅनल चा टीआर पी किती वाढेल बघा.

ठीक आहे संग्राम तुझी इच्छा आहे तर जा.पण अगदी बिनचूक माहिती घेवून ये.सोबत कोणाला घेवून जाणार आहेस का?


नको सर मी एकटा जातो.मला काही कसली भीती वैगेरे वाटत नाही. उलट असल काही थ्रिलिंग न्युज असेल तर मला ते काम जास्त आवडते.

ओके संग्राम जा मग.

हो सर मी उद्या सकाळीच निमगाव ला जायला निघतो.असे ही दोन दिवसांनी अमावस्या आली आहे. जर खरच अमावस्येला त्या कलावंतीण चे भूत किंवा प्रत्यक्ष दिसत असेल तर मी पण बघून येतो.ती कलावंतीण खरी असेल तर तिचा पण इंटरव्ह्यू घेतो.हसतच संग्राम म्हणाला.

राजीव सर ही त्याच्या कडे बघून हसले. ऑल द बेस्ट संग्राम.अँड टेक केअर.

येस सर थँक्यु.

संग्राम मग रात्री सगळी तयारी करून आपल्या कार ने निमगाव ला जायला निघाला.

हायवे संपून आता आतला गावातला कच्चा रस्ता सुरु झाला होता.अगदी तीस किलो मिटर वर निमगाव राहिले होते.वाटेत एक चहा ची टपरी होती .संग्राम ने कार थांबवली,तो गाडी मधून उतरला.

एक स्पेशल चहा ..त्याने टपरी वाल्याला सांगितले.

काय पावंण निमगावात कोणा कडे आलात.त्याने विचारले.

मी एक रिपोर्टर आहे तो जमीनदार करडे पाटलांचा वाडा,त्याची माहिती घ्यायला आलो आहे.तुम्हाला काही त्या बद्दल माहिती आहे का? संग्राम ने विचारले.

साहेब,त्या वाड्यात कलावंतीण च भूत राहते,नका जावू तिकडे,तिथे जाणारा माणूस परत आलाच नाही.ती कलावंतीण नंदा कोणाला जिवंत सोडत नाही.


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract