Author Sangieta Devkar

Abstract Drama

4.0  

Author Sangieta Devkar

Abstract Drama

खूळ

खूळ

2 mins
215


गज्या,आर अस बघ ह्यो पदर असा डोक्या वर घेवून उडवायचा .पशा सांगत होता.

गज्या ने परत एकदा साडी ठीक ठाक केली. ओठावर लाली लावली.एक टिकली कपाळावर टेकवली.

गज्या लई झ्याक दिसतोस की या लुगड्यात.

पशा जा बघ बाहिर लोक किती जमली. गजा म्हणाला.

तसा पशा बाहेर गेला. मांडव सगळा भरला होता.आज त्यांच्या गावाची जत्रा होती.त्या जत्रेत कोणी रामायण ची कथा नाटक करून सांगणार होते तर कोणी पोरी नाच करणार होत्या.गजा आणि त्याचे मित्र तमाशा चा सिन करणार होते.

एक एक करत कार्यक्रम सुरू झाले.गाव वाले शिट्ट्या मारून आनंद घेत होते.गजा आणि पशा ,अज्या, दिन्या सगळे स्टेज वर आले. पशा ढोलकी वाजवत होता आणि त्याच्या तालावर गज्या साडी नेसून पदर उडवत नाचत होता.सगळा गाव हसत शिट्या मारत होता. गज्या च कौतुक करत होता,तर कोण म्हणत होते की आकशी बाई वाणी नाचला गज्या.हे सगळ मागच्या रांगेतून गज्या चा बाप दिनेश बघत होता.त्याच्या अंगाची लाहीलाही होत होती. गज्या चा नाच संपला तसे त्याचा बाप स्टेज कडे आला, गज्याला धरून मारू लागला.काय रे सुकाळीच्या , बारदाण्या,या साठी जन्माला घातलं तुला,बाई परास नाचायला.लाज वाटली नाही तुला हे लुगड नेसायला..त्याला ओढत मारत दिनेश तिथून निघाला होता.सगळे गाव वाले हसत होते.ये नाच्या..नाच की.अस काही लोक चिडवत होती.दिनेश ने मार मार मारले गज्या ला.घरात आणले.


का ओ पोराला मारता..गज्या ची आई बोलली.

शांते हे पोरग.. आपल्या अब्रूच खोबर करायला निघालाय. लूगड नेसून नाचत होता ,तमाशा वाणी.दिनेश म्हणाला.

काय रे तुझा बा बोलतो ते खर हाय काय? तिने विचारले.

आये,मला साडी नेसायला आवडती.आणि नाच पण आवडतो.

खूळ लागलय का पोरा तुला?. बाप्य माणूस लुगड नेसत नाय कधी.आणि अस तमाशा सारख नाचत बी नाय.

दिनेश ने लई शिव्या घातल्या त्याला.गावा समोर नाचक्की झाली होती त्याची.

गजानन चौदा वर्षाचा शाळेत जाणारा मुलगा पण त्याला गाणी,ढोलकी याचा नाद जास्त होता.चोरून गावात तामाशा बघायला जायचा तो.

एकदा घरात कोणी नाही बघून गज्या ने आई ची साडी नेसली आणि नाच करू लागला.तो नाच करण्यात मग्न होता.रेडिओ चालू होता.तेव्हा अचानक त्याचा बाप घरात आला.त्याला अस बघून बद बद बदडला.अरे तू पोरगा हायेस का दूष्मन माझा. शांता पण घरात आली. तिने गज्या ला विचारले तुला हे नाच गाणं का आवडत.चांगल शिकायचं सोडून कसल खुळ घेतलस डोक्यात.

आये मला साडीच आवडती नेसायला.नाच पण आवडतो.मला मुली सारख राहायला आवडत.एक सणसणीत थप्पड त्याच्या गाला वर पडली.दिनेश ने त्याला बखोटी ला धरून बाहेर नेले.चल आताच्या आत निघ इथन,तुझं काय बी काम नाही या घरात.तू बापय नाय ,ना तू बाई हायेस.जा अजून आमची अब्रु घालवू नकोस. तू पायपुसण    हायेस ,तुझी जागा या घरा बाहेर समजलास..."पायपुसण"दिनेश ने गजानन ला हाकलून दिले.


"रसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला

साता जन्मांची देवा पुन्याई लागू दे आज पणाला

हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग

नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग..(नटरंग सिनेमा गाणे)

या गाण्यावर गज्या नाचत होता,तमाशात गेला तो नाच्या म्हणून फडावर नाचू लागला.हेच होत त्याचखुळ.दारा बाहेर राहणारा पायपुसण होता तो.


समाप्त.. मराठी बोली भाषा शब्द.. खूळ --- वेड.

पायपुसण --- डोअर मॅट.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract