Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

3.9  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

कभी किसी रोज.(भाग 3)

कभी किसी रोज.(भाग 3)

2 mins
202


अमित विचारात हरवला होता.पण त्याला मोहन आपले बाबा आहेत या बद्दल राग ही येत होता.


दुसऱ्या दिवशी अमित आणि सुमिता घरी यायला निघाले.

घरी पोहचले अमित मात्र शांत होता.मोहन ने ओळखले अमित काही बोलत नाही ते.तेव्हा तेच म्हणाले,अमित आपण जावू तुझी बाईक आणायला.

नको बाबा मला नको आहे ती बाईक.

अरे पण तुला हवी होती ना ती बाईक किती मागे लागला होतास तू माझ्या.

पण आता नको आहे मला.इतकं बोलून अमित बाहेर पडला.

सुमिता याला काय झाले आहे? हा असा का वागत आहे आल्या पासून.तू सांगितले का त्याला काही?

नाही ओ,मी काहीच बोलले नाही .आणि प्रसाद ही काही बोलले नाहीत.

मग याला काय झाले अचानक?

बघू घरी आला की विचारू आपण. सुमीता म्हणाली.

दुपारी अमित घरी आला,तिघे एकत्र जेवण करत होते,रोज बडबड करणारा अमित आज गप्प आहे हे मोहन ने ओळखले..अमित काही झाले आहे का? तू आल्या पासून असा शांत का आहेस?

बाबा,का लपवले तुम्ही माझ्या पासून.

काय लपवले ,कशा बद्दल बोलत आहेस तू अमित?


बाबा,मी तुमचा मुलगा नाही आहे,हो ना?

सुमिता आणि मोहन एकमेका कडे बघू लागले.

बाबा मला समजले आहे की मी त्या प्रसाद यांचा मुलगा आहे ते.

अमित,तुला ही गोष्ट आम्ही सांगणार नव्हतो.पण तुला कशी समजली? सुमिता ने विचारले.

आई मी हॉस्पिटल च्या वॉर्ड मधून बाहेर पडताना तुझे आणि प्रसाद त्यांचे बोलणे ऐकले होते.

अमित,तू त्यांचाच मुलगा आहेस.प्रसाद माझ्या घरा शेजारी राहत होता आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो.आमच्यात जवळीक निर्माण झाली.आम्ही लग्न करणार होतो.प्रसाद बाहेरून आपल्या गावी शिकायला आला होता,अजून तो सेटल झाला नव्हता.मी माझ्या आई बाबांना प्रसाद बद्दल सांगितले पण बाबा खूप चिडले.प्रसाद सारख्या बेरोजगार मुला सोबत माझं लग्न कदापि होणार नाही असे म्हणले .लवकरात लवकर माझ्या साठी त्यांनी मोहन यांचे स्थळ पाहिले आणि लग्न लावून दिले.प्रसाद मग त्याच्या गावी निघून गेला.

मी तुझ्या बाबा ना माझ्या आणि प्रसाद च्या नात्या बद्दल सांगितले.तेव्हा मी गरोदर होते.तुझ्या बाबांनी मला समजून घेतले.तू पोटात असताना ही त्यांनी माझा आणि तुझा ही स्वीकार केला.त्यांचे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही.अमित,तुझे बाबा इतके चांगले आहेत की त्यांनी दुसऱ्या मुला चा हट्ट सुद्धा केला नाही.तू एकटा त्यांच्या साठी पुरेसा आहेस अस म्हणत असायचे.तुझ्यावर त्यांनी स्वतः च्या मुला सारख प्रेम केले.तुझे सगळे हट्ट लाड त्यांनी पुरवले.कधी तरी तुला त्यांनी ओरडल्याचे आठवते का अमित?

सुमिता अग उपकार वैगेरे काय बोलतेस.त्या वेळी तुला समजून घेणार कोणी तरी हवे होते.ते मी केले.अमित ला माझाच मुलगा मानला कायम.

बाबा,माझे चुकले.मी तुमच्या बद्दल् नको ते विचार करत राहिलो.बाबा,तुम्ही ग्रेट आहात.आय एम सॉरी.

अमु,अरे तू माझाच मुलगा आहेस.आणि कायम असशील.

बाबा तुम्ही आई वर आणि माझ्या वर खूप उपकार केले आहेत.

नाही बाळा,वडील कधीच मुला वर उपकार करत नसतात.मोहन ने अमित ला आपल्या कुशीत घेतले.


अमित तुझी बाईक आणायला जावूया ना आपण?

हो बाबा आजच जावू.हसतच अमित म्हणाला.

सुमिताच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract