vaishali vartak

Others

3  

vaishali vartak

Others

जीवनदायिनी

जीवनदायिनी

2 mins
197


म्हणतात ना!  अजाणत्या पाण्यात सहजा सहजी उतरु नये. हेच खरे. 

 लहान होते मी ..नुकतीच पोहणे शिकले होते. घरी पाहुणे आले होते . सारे म्हणाले चला जाऊ नदीवर ..डुंबून येऊ. 

  मी नवीन पोहावयास शिकलेले होते साधारण इयत्ता ४/५वीत असेन. मला माझे पोहणे नाते वाईक मंडळींना दाखविण्याचा मला हुरुप आला. . ..

  ठरले निघालो नदीकडे.. घरापासून जवळच होती. आते मामे भावंडे होतो. त्यात एक आते भाऊ. तो पण आला होता. किती प्रमाणात पोहणे त्यास येत होते हे आता आठवत नाही. अर्थात मोठी मंडळी होतीच बरोबर. 

  नदीवर पूल बांधण्याचे काम चालू होते . तसे आमच्या नदीत पाणी कमीच असायचे. खोल तर नसायचे. नदीच्या एकाच तटाला पाणी... बाकी दुसरा तट कोरडाच...

इतका कोरडा की आमच्या शाळेची शनिवारची कवायत त्या नदीच्या पटात व्हायची. ऐवढेच काय थंडीत सर्कस पण लागायची. 

   आम्ही  जेथे पाणी होते तेथे गेलो. नदीवर नवा पूल बांधण्यात येत होता. त्याबाजूस जरा ब-यापैकी पाणी होते. तेथे गेलो. 

   पूलाचे खांब अर्धवट बांधले होते, त्या मुळे त्यावर चढून खाली पाण्यात उडी मारण्यास मजा येत होती. पाणी 7/8 फूट खोल असावे. मी पोहण्याचे प्रशिक्षण घेत होते ... त्यामुळे तेथे लहान डायवींग बोर्ड वरुन उडी घेणे माहीत होते.. शिकले होते . त्यामुळे मी मारली उडी.व लगेच कसे बाहेर यावयाचे हे शिकवले असल्याने वर पण आले . मजा वाटू लागली. मी पुन्हा पुन्हा उड्या मारल्या. 

 ..... पण बरोबर आलेल्या आते भावास पोहणे जमत नव्हते . पण तो पण वर चढला व उडी मारली.. तो पण लहानच होता. माझ्या इतकाच. पण व्यवस्थित पोहण्याचे शिक्षण घेतले नसल्याने नाका तोंडात पाणी जाऊन घाबरला.... बरे झाले. बाजुलाच मोठी मंडळी , नातेवाईक होते .त्यांनी हात देऊन खेचून घेतले. डुबला नसता पण त्यावेळी तो घाबरला. 

   मग आम्ही घरी येत होतो ..बाकी इतर मंडळी पोहत होती तेथे येत होतो. तर पाऊलभर पाण्यात पाय ठेवायला तो आते भाऊ घाबरत होता.

 रडतच म्हणत होता," नको मी डुबेन पाण्यात . मी पाण्यात पाय नाही ठेवणार .."

.चांगलीच भिती त्याला पाण्याची बसली. 

   तर असे असते .पाण्याशी ...अजाण पाण्याशी उगाच मस्ती नको. नाहीतर जीवनदायिनी जी नदी , जीव घेणी बनते. नाहीतर तीच नदी प्राणी मात्रा स जीवन देते. 

जिच्या काठावर संस्कृती वसल्या आहेत अशी नदी जीव घेणी होते का?



Rate this content
Log in