Aruna Garje

Others

4.5  

Aruna Garje

Others

जात

जात

1 min
329


आज सीमेवरच्या युध्दात त्याला दोन्ही हात गमवावे लागले होते. दवाखान्यात जगण्यासाठी त्याची धडपड चालू होती आणि त्याच दवाखान्यात ब्रेनडेड झालेल्या एकाने मृत्यूपूर्वी अवयवदानाची इच्छा व्यक्त केलेली होती. तेथील दोन डॉक्टरांनी विचार करून जवानाला त्याचे हात परत मिळवून देण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. इच्छापूर्तीचे समाधान आज सर्वांच्याच चेहर्‍यावर दिसत होते.

    डॉक्टरांपैकी एक होता हिंदू , दुसरा होता मुस्लीम, जवान होता शिख, तर अवयवदान करणारा होता ईसाई. आज जात कुठेच आडवी आली नव्हती.

     



Rate this content
Log in