Revati Shinde

Others

4  

Revati Shinde

Others

हरवलेले बालपण

हरवलेले बालपण

2 mins
283


"नियती अगं काय करतेस." "काय करणार ऑफीस मधे आहे." "बाहेर बघ किती छान पाऊस पडतोय." मिना म्हणाली. "हो गं. असं वाटतय मस्त भिजावं पावसात." "हो ना मलाही वाटतं. पण नको बाई सर्दी झाली तर काय करणार."

"तुला आठवतं लहानपणी आपण किती भिजायचो पावसात."" हो.कसलिच भिती नाही वाटायची. आई मस्त आ ल्याचा चहा करून दयायची. आणि गरम गरम भजी.गेले ते दिन गेले."

मिना आपण नंतर बोलू .लंच हवर संपला.बाय.""ओके बाय."

नियती परत कामात गुंतली. पण तिचे मन मात्र तिच्या बालपणात गुंतले होते.

खरंच किती निरागस, स्वच्छ्दी आयुष्य होते ते. फुलपाखरां सारखे.

आपण पाच भावंडे मायेने बांध लेले होतो. पैसा कमी असला तरी सुख होते. आई बाबा कीती लाड करायचे.

सकाळी लवकर ऊठून शाळेत जायचो.शाळेत पण किती मज्जा यायची.बाई किती काळ जी घ्यायच्या. कधी डबा नेला नाही तर सगळ्यांच्या डब्यातला खाऊ खायचा. एका सुरात पाढे, कविता म्हणायच्या.कधी गृहपाठ केला नाही तर मारही खायचा.पावसात शाळेतून येताना चिखलात खेळताना कधी इन्फेक्शनची भिती नाही वाटली. 

संध्याकाळी खेळायला जायचे.क्रिकेट, विटी दांडू,लगोरी, लपाछपी,असे खेळ असायचे.टीव्हीला जास्त म्हहत्व नव्हते. भातुकलीचे खेळ ,बाहुला बाहुलीची लग्ने लागायची.धमाल असायची.

उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी तर विचारूच नका.फुल टू धमाल.गोष्टीची पुस्तके, कॉमिक्स,वाचायची, पत्ते.साप सीडी, कॅरम ,लुडो,व्यापार असे बैठे खेळ खेळायचे, वीडियो भाड्याने आणून सिनेमे बघायचे. रात्री बॅडमिंटन खेळायला मज्जा यायची.समुद्रा वर फेरी मा रायची.वाळूचे किल्ले करायचे.मनसोक्त बर्फाचे गोळे, आइस्क्रिम खायचे.कधी दात नाही किड़ायचे कि सर्दी व्हायची.

गणपतीला गावी जायचे. सगळी चुलत भावंड एकत्र येऊन रात्रभर जागुन आरास करायची, आरती,भजने रंगायची, हार करायचे,दुर्वा निवडून ठेवायच्या, आईला मोदक करण्यात मदत करायची, अंगणात झिम्म्मा फुग्डया खेळायच्या. आजी आजोबा छान छान गोष्टी सांगायचे.खूप लाड करायचे.

दिवाळीत कंदील करायचे . किल्ले करायचे, रांगोळया काढायच्या, पणत्या सजवय च्या. आईला फराळात मदत करायची.फटाके जपुन जपुन वापरायचे.एकमेकांच्या घरी फराळाला जायचे. कसले दडपण नाही,ईगो नाही. 

किसे नेहमी चिंचा,बोरे,करवंदे,चिचुके,चणे कुरमरे यांनी भरलेले असायचे.जंक फूड माहित नव्हते.एक रुपया पॉकेट मनी.त्याचे किती अपृप वाटायचे.आईचे भूक ,तहान लाडू किती गोड लागायचे.आणि आता पिज़्ज़ा बलगर खाऊनही पोट भरत नाही. नियतिला तिच्या मुलीची आठवण झाली. पाळणाघरात थंड पोळी भाजी खाऊन एकटीच झोपली असेल. म नात असुनही आपण तिला गरम जेवण देहू शकत नाही,कुशीत घेऊन झोपू शकत नाही.तिच्या मनाला खूप खंत वाटली. आईच्या कुशीत शिरायला आता आपले आई ,बाबाही राहिले नाहित.

तिचे डोळे भरून आले. खरच किती सुंदर होते ते बालपण.

गेले ते दिन गेले उरल्या फक्त आठ्वणी.तरी आपण खूप भाग्यवान होतो आपल्या वाट्याला असे बालपण आले पण आताच्या या पिढीचे काय त्यांचे बालपण कधी अभ्या साच्या(स्पर्धा) कधी इन्फेकशनच्या तर कधी मोबयल्च्या जगात हरवून जातेय.याचेच दुख वाटते.


Rate this content
Log in