Jyoti gosavi

Comedy Others

3.5  

Jyoti gosavi

Comedy Others

हे बघ धुण्या पाणी

हे बघ धुण्या पाणी

1 min
111


हे बघ धुण्या पाणी


 हा एक पारंपरिक वाक्प्रचार आहे. 

यामध्ये, "हे बघ धुण्या पाणी" म्हणजे पूर्वीच्या काळी, गावातील लोकांचे कपडे धुवायला परीट घेऊन जात असे. 

आता इतक्या लोकांचे कपडे धुवायचे म्हणजे ते तशाच पद्धतीने धुतले जायचे. फक्त कडकडीत उन्हामध्ये वाळवून परत मिळायचे. त्याचा डाग काही निघायचा नाही. मळलेले तसेच असायचे. 

तर खरा शब्द आहे "कपड्यांना पाणी दाखवणे" तर असं विनोदाने म्हटलं जायचं की, तुमच्या कपड्याचं गाठोड ती परटीण बाई नदीच्या काठावर नेऊन ठेवते, आणि त्या कपड्यांना म्हणते 

"हे बघ धुण्या पाणी" म्हणजे लांबूनच त्यांना पाणी कस आहे ते दाखवते, उन्हात वाळवते ,आणि तुम्हाला आणून परत घरी देते .

हा वाक्यप्रचार चुकार व्यक्तीच्या कामासाठी वापरला जातो. 

म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद काम सांगितलं आणि त्यांनी एकदम तकलादू पणे ते केलं ,

 जस की फक्त नावालाच तुम्ही म्हणालात म्हणून त्या कामाला हात लावला. आता कामाला हात लाव म्हणल्यावर नुसता त्या वस्तूला हात लावून परत जागेवर आलं तर चालेल का ?किंवा दुधाकडे लक्ष ठेव असं म्हटल्यावर ती व्यक्ती फक्त दुधाकडे बघत बसते, मग ते ओतू जात असेल तरी बघतच बसते. अशा ठिकाणी हा वाक्प्रचार वापरला जातो 

"हे बघ धुण्या पाणी"


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy