Swapna Sadhankar

Classics

3  

Swapna Sadhankar

Classics

गंधाळले मन

गंधाळले मन

1 min
173


अवेळी आलेला तो धुवाधार कोसळणारा पाऊस. काही न बोलता सुकलेल्या आठवणींना ओलावा देऊन गेला. भूतकाळात त्याने दिलेल्या सुखी क्षणांची उजळणी करण्यात मन चिंब भिजलं. श्वासात भिनलेला मृदगंध निरंतर दरवळत रहावा. चोरट्या नजरेतले गारठलेले भाव शहारे आणायला पुरेसे. अश्या उधाण वाऱ्याचे होऊ पाहणाऱ्या मनाने काही वेळ आनंद विहार केला. पण काहीच वेळ! त्याचा ओझरणारा ओसरता ओघ वर्तमानात परत घेऊन आला. आता गंधाळलेले मन लख्ख उन्हात छत्री घेऊन त्याच्या अचानक येण्याची वाट पाहत, उबदार आठवणींचा अविरत प्रवास करतंय.......


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics