गमतीशीर उखाणे
गमतीशीर उखाणे


श्रावण म्हटलं की सणवार आले मंगळागौर आली शुक्रवारच्या हळदी कुंकू आले मग त्यामागे उखाणे देखील आले मंडळी छान छान उखाणे सगळेच घेतात पण जरा गमतीशीर उखाणे यामध्ये घेतले आहेत आपणाला जरूर आवडतील
काही गंमतशीर उखाणे
सचिनच्या बॅटला सलाम करते वाकून रावांचं नाव घेते चार गडी राखून
वाकडी तिकडी बाभळ
तिला हिरवा हिरवा पाला
सखाराम पळून गेला
म्हणून तुकाराम केला
माझ्या चुलीवर भाजला पापड
सखाराम माझा दिसण्यात माकड
सुंदरशा हरणाचे फेंगडे फेंगडे पाय
राव अजून घरी आले नाहीत
पिऊन गटारात पडले की काय
नाजूक दाताला म्हणतात
कुंद कळ्या
रावांचे दात म्हणजे
नांगराच्या फळ्या
पिवळ धम्मक दिसतय
केतकीच पान
राव आमचे कोळशासारखे
गोरे गोरे पान
मटणात मटन बकरीचे मटण
रावांच्या कोटाला हाडकाचे बटन
चांदीच्या ताटात बर्फी चे तुकडे
घास देते मेल्या थोबाड कर इकडे
चांदीची सायकल
सोन्याच्या तारा
राव गेले डब्बा घेऊन
त्याला लागल्या धारा
डोक्यावर खोका
खोक्यावर खोका
मी त्यांची मांजर
तो माझा बोका
समोरच्या कोनाड्यात
काट्याची पांजर
राव माझा बोका
मी त्याची मांजर
आता एक छानसे नाव
अहो गेले पंढरपूरला
सासूबाईंना खण आणला
वन्सना बांगड्या आणल्या
जाऊ बाईला कुंकू आणले
मामंजींना धोतर आणले
मग मी विचारले मला
तर म्हणतात कसे!
राणी मी आहे ना तुला!