Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

गावात मढ आणि पाटलाला कोड

गावात मढ आणि पाटलाला कोड

1 min
92


ही एक पारंपारिक ग्रामीण म्हण आहे, आणि या म्हणी मध्येच त्याचा गर्भित अर्थ दडलेला आहे. 

प्रथम आपण शब्दशः म्हणी चा अर्थ पाहूया. 

म्हणजे गावात एखादं बेवारस मढ पडलेलं आहे, त्यामुळे कोणाला नाही तरी गावच्या पाटलाला त्याची उस्तवार करावीच लागते .

चार माणसे जमवून रितीरिवाजाप्रमाणे त्या प्रेताचे दहन/ दफन काय असेल ते करावे लागते. 

म्हणजे काय! ते प्रेत तिथेच पडून राहत नाही. 

शेवटी गावचा पाटील तरी त्याची उस्तवावर करून त्याचा अंत्यविधी करतो. आता याचा गर्भित अर्थ असा आहे की, कोणाचे कोणा वाचून काही अडत नाही .

म्हणजे अगदी मुलांनी देखील म्हातारपणी आईबापांकडे लक्ष पुरवले नाही, आणि ते घरात मरून पडले ,तर शेवटी त्या काळामध्ये पाटील आणि आताच्या काळामध्ये म्युन्सिपालिटी त्याचे अंत्यविधी करते .

म्हणजे कोणी कुठल्या गोष्टीसाठी कोणाला अडवण्याची गरज नाही. 

तू नाही म्हणून तुझ्या वाचून ही गोष्ट राहणार नाही. मरणासारखी अत्यंत वाईट आणि दयनीय गोष्ट सुद्धा शेवटी कोणाच्यातरी हातून शेवटाला नेली जाते .असा

त्याचा अर्थ आहे म्हणूनच म्हटले आहे. 

"गावात मढ आणि

 पाटलाला कोड"


Rate this content
Log in