Ujwala Rahane

Comedy

3  

Ujwala Rahane

Comedy

दुनिया ही रंगबिरंगी

दुनिया ही रंगबिरंगी

1 min
145


   या वयात कसला आलाय लग्नाचा वाढदिवस आणि असले मनसुबे तुमच्यातच ठेवा.आजोबाच्या कडे जाल तर ओरडा खाल.आज्जीने नातवंडांना समजावले.

  त्यांच्या आमच्या लग्नाची तारीख जरी लक्षात राहीली तरी नशीब माझे. पोरांनी मात्र मनावरच घेतले. आजोबांना आज्जीला नकळत आपल्या गनिमी काव्यात सामिल केले.आज्जीला हिरवी पैढणी,आजोबांना आज्जीच्या पैठणीच्या रंगाशी साजेसा कुर्ता पायजमा खरेदी झाली. दोघांनाही एकमेकापासून अज्ञातच ठेवले.

    वाढदिवसाची तारीख जवळ आली आज्जी आजोबांच्या मित्रमंडळीना गुपचूप आमंत्रण केले. सगळे सगेसोयरे रंगबिरंगी कपड्यात हजर झाले. या दोघांनाही एका मित्राच्या लग्नाला जायचे म्हणून तयार केले. सगळे हॉलवर हजर झाले.आज्जी हिरव्या पैठणीत ठुमकत होती. पण आजोबा लग्नाचा वाढदिवस विसरले म्हणून मनात नाराज होती.अचानक दोघे समोर आले.मुलांने वरमाला हातात देऊन नव्याने त्यांचे शुभमंगल केले. सगळा गोतावळा हे दृश्य आश्चर्यचकित झाले.आज्जीचे नवे रूप पाहून आजोबाही भांबावून गेले.आज्जीची पण तिच अवस्था. मग दोघांनाही उखाण्याचा आग्रह झाला.पेढ्यात पेढे कंदी पेढे सातारी ही तर नवीन नवरी समजते वसुंधरा स्वतःहाला पण म्हातारी ते म्हातारीच.

  आजोबांच्या उखाण्यानी हॉलमध्ये खसखस पिकली. आज्जी काही कमी नव्हती. मतलबाचे लक्षात ठेवतात बाकी सगळे विसरतात. श्रीधरराव स्वतःहाला चॉकलेट हिरोच समजतात. सगळीकडे एकच हशा पिकला.या आगळ्यावेगळ्या व विनोदी वातावरणाच्या रंगात उभयता न्हाऊन निघाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy