Ujwala Rahane

Inspirational

4.5  

Ujwala Rahane

Inspirational

धागेदोरे

धागेदोरे

4 mins
393


  हे लग्न होणार नाही. बाबांनी निक्षून स्वराला सांगितलं का बाबा? माझे शंतनूवर प्रेम आहे. शंतनूचे वडील आणि तुमचे पहिले काय संबध आहेत त्याचाशी आम्हा दोघांना काही देणे घेणे नाही आणि कारण जाणून घ्यायची आम्हांला गरज नाही. 


  बाबांनी गोडीत समजून सांगायचा प्रयत्न केला. पण स्वरा आपल्या मताशी ठाम होती.प्रशांत म्हणजेच स्वरांचे वडील हताश झाले. 


  शेवटी म्हणाले हे लग्न होईल पण मी तिथे हजर राहणार नाही. हे काय बाबा? 


  स्वराला वाटले हो नाही करतील पण बाबा लग्नाला तयार होतील. पण एवढा टोकाचा निर्णय घेतील असे तिला वाटले नाही. 


  इकडे शंतनूच्या आईवडीलांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली होती.जे काही झाले ते आपलं प्रारब्ध होतं. आपल्या मुळे पुढच्या पिढीला त्यात अडकायचं नाही. त्यांचा काय दोष? 


  शंतनूचे वडील संयमाने शंतनूच्या आईशी बोलले.आईने पण हो त हो मिसळून तयार झाली. 


  इकडे स्वरा आईला विचारत होती. आई काय कारण आहे ग एवढे संबंध बिघाडायचे? आधी तर बाबा म्हणायचं तु शोधून आण मुलगा पण योग्य मी तुझं लग्न लावून देईल. स्वरा तु लव्हमॅरजच कर. 


  मग आता काय झाले. शंतनुला पहिल्यांदा पाहिल्यावर पण खुशीतच होते. योग्य निवडलास मुलगा असे देखील म्हणाले. मग आता काय झालं? 


  हो बाळा शंतनु योग्य वर आहे तुझ्यासाठी. पण शंतनुने दिलेल्या माहितीनुसार त्याचे कुटुंब कोण आहे हे समजले. खुप दिवस झाले आपला संपर्क तुटला होता त्या कुटुंबाशी.


 त्याच्या कुटुंबीयांचे धागेदोरे जरा वेगळ्या कारणाने आपल्या कुटुंबाशी जोडले होते. सांगेल सावकाशीने. 


 आई सावकाशीने कसले.आता हातातोंडाशी आलेला घास आहे. आत्ताच कळाले पाहिजे. कारण याबाबतीत मी व शंतनु दोघेही अज्ञानी आहोत. 


  बाळा खुप वेगळा इतिहास आहे तो. अग बोल ना! न बोलता कसं समजणार? ऐक मग तयारी ठेव परिणामाची. 


   आई बोलू लागली.स्वरा बाबांची आई व शंतनूचे आजोबा एकेकाळी प्रेमात पडले होते. एकमेकांच्या ज्या काळात प्रेम करणे म्हणजे फार मोठा गुन्हा होता. 


  त्याला कारणही तसेच.आज्जीच्या माहेरी खुप मोकळे वातावरण होते. सगळे खेळामेळीचं राहत.तेंव्हा त्यांच्या वाड्यात शंतनूच्या आजोबाच्या वडीलांचे बिर्हाड राह्यला आले. शंतनूचे पणजोबा ग्रामसेवक होते. शंतनूची पंजी आणि शंतनूचे आजोबा. व त्यांची बहिण एवढेच कुटुंब.

   

  मग या कुटुंबाची आणि आज्जीच्या कुटुंबाची छान मैत्री झाली. शंतनूच्या आजोबांची बहिण आणि आज्जी तर घट्ट मैत्रीनीच झाल्यजेवने, खाणे शाळेत जाणं येणं सगळे बरोबरीने. दोन्हीही कुंटूबाचे मैत्रीचे धागेदोरे मस्त जुळले. 

  

  शंतनूचे कुटुंब गरीब होते. ग्रामसेवकाचा कितीसा तो पगार? त्यावर मुलांचे शिक्षण आणि गावी आई वडीलांना देखील पैसा पाठवायला लागायचे.मग शंतनूची पंजी विद्यार्थ्यांना डबे द्यायचे काम करायची. तेवढाच संसाराला हातभार.


  आपलं म्हणजेच आज्जीचे माहेरचे कुटुंब खुप सुखवस्तू होतं. दुधधुपतं शेती वाडी सगळ भरपूर. मग तुझी पंजी पणजोबाच्या नकळतपणे शंतनूच्या आईला दुध धान्य द्यायची.

 

 शंतनूचे आजोबा व आत्या आज्जी दोघेही आभ्यासात हूशार होते. आपल्या आज्जीला शंतनूचे आजोबा आभ्यासात मदत करायचे. चुणचुणीत हुशार आजोबाच्या प्रेमात आज्जी कधी पडली कळलेच नाही. दोघेही दुरूनच पण एकमेकांकडे आकर्षिले गेले. जात व परिस्थितीत दोन्ही पलिकडे. 

  

 एकदिवस आज्जींच्या वडीलांनी त्यांना बोलताना बघीतले. घरी आल्यावर आज्जीच्या आईला व आज्जीला दम दिला. परत त्याच्यांशी बोलताना दिसलीस तर तंगड मोडून हातात देईल. 


  आज्जीचे बाहेर जाणेच काय शाळाही बंद केली. शंतनुच्या कुटुंबाला पण बिर्हाड खाली करायला सांगितले. आज्जीला तर कोणालाच भेटू दिले नाही. 


  जाताना शंतनूची पंजी आणि आत्येज्जी निरोप घ्यायला आल्या. कर्म धर्म संयोगाने आज्जीचे वडील घरी नव्हते. आत्येज्जीच्या गळ्यात पडून आज्जी खुप रडली.


  ऋणानुबंधाच्या गोष्टी आहेत ग. म्हणून शंतनुच्या पंजीने समजून घातली. भातुकलीचा डाव विस्कटला. पुन्हा कधीही न भेट होईल इतके ते दुर गेले. कोठे गेले काय झाले. काही कळले नाही. 


 मग आज्जीच्या वडीलांनी तुझ्या या आजोबांचे स्थळ शोधून आज्जीचे लग्न लावून दिले. 

  

 मन मारून आज्जी संसार करू लागली पण पहिले प्रेम ते मधूनच उन्मळून येत. कोठे असेल कसा असेल या विचारात ती उदास होत. 


  निसर्गनियमानुसार आज्जीला तुझा बाबा आणि आत्या दोन मुले झाली. 


  आजोबा खुप कडक आणि संतापी. सतत आज्जीकडे संशयानं बघत. सासुरवास करत. कुलटा, अवलक्षणी असे अपशब्द वापरत. 


  आज सांगायला मला लाज वाटते पण तुझ्या आत्याला तर दुसऱ्याचं पाप मला फसवणूक करून माझ्या माथी मारले असे म्हणत. आज्जी सहन करायची इलाज नव्हता. 


 आजोबा खुप बोलायचं अगदी माझ्या समोर कित्येकदा आज्जीला अपमानित केले आहे. जाऊ दे गेले ते! माणूस गेल्यावर त्यांच्याविषयी वाईट बोलू नये असे म्हणतात. 


 अग आई तु तर या घरची सुन मग हा इतिहास तुला कसा माहीत? हो मला वाटलंच तु हा प्रश्न मला विचारणारच. 


  त्याचे असं झालं.आज्जी आणि माझं नातं खुप वेगळे होते. सासू सुनेपेक्षा मैत्रीणीच जास्त होतो आम्ही.


  कधी कधी आज्जी मनातलं बोलायची.पण कुठेतरी अडघळायची कधी कधी थांबायची. जाऊ दे सांगेल कधीतरी असे म्हणायची. बोलताना तिची जीभ जड व्हायची. मग मी एक आयडिया दिली आज्जीला. 


  आई एक काम करा. तुम्हांला मी एक डायरी देते. त्यात तुम्ही तुमचे आत्मचरित्र लिहून काढा. रोज दैनंदिनी लिहा. 


 आज्जीला कल्पना पटली तिने आत्मचरित्र लिहिले आणि जाताना माझ्या व बाबांच्या हातात सुपूर्द केले. 


 कर्मधर्मसंयोगाने आज शंतनुच्या कुटुंबाशी संबंधित धागेदोरे डायरीतील नोंदीशी मिळतेजुळते झाले.नाहीतर आम्ही ती डायरी एक आठवण म्हणूनच जपून ठेवली होती. 

  

आता सांग काय करायचं? स्वरा आता शंतनुच्या प्रेमाचे धागेदोरे जुळवत होती. तिलाही आता आज्जीच्या प्रेमकहाणी सारखी आपली पण प्रेमकथा होईल का याची भीती वाटत होती. 


  आईने घड्याळ बघितले स्वराचे बाबा यायची वेळ झाली होती. ती उठून कामाला लागली जाता, जाता हाताशी असलेला रेडिओ तिने आॉन केला. 

  गाण्याचे स्वर स्वराच्या काळजाचा शोध घेत होते. 


 कसे कोठुनी येतो आपण ओळख नसता जातो गुंतून, भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ क्षणभर, जरा विसावू या वळणावर!.. 


गाण्यातील मधल्या मधल्या ओळीवर थांबून स्वरा त्या गाण्याचा संदर्भ आपल्याला सहजीवनाशी जोडत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational