Neelima Deshpande

Romance Inspirational

3  

Neelima Deshpande

Romance Inspirational

ड्रिमगर्ल चे ड्रिम ©®

ड्रिमगर्ल चे ड्रिम ©®

2 mins
237


"रंजना, काय झाले ग...? बोलत नाहीस माझ्याशी! सकाळ पासून थोडीशी नाराज दिसतेस माझ्यावर. नक्की काय झालं तुला ?सगळं जग हा आठवडा 'व्हलेंटाईन वीक म्हणजेच आपल्या जवळच्या व्यक्तीवरील स्वत:चे प्रेम विविध मार्गाने व्यक्त करुन प्रेमाचा आठवडा साजरा करत असताना तू मात्र अगदी शांत आहेस. सगळ्यां सारखे मी असे काही करु शकलो नाही आजवर! मी माझ्या व्यापात तुला फार वेळ देऊ शकत नाहीए म्हणून रागवलीस का तू माझ्यावर?" सुधीर त्याच्या बायकोची जमेल तशी मनधरणी करत होता.आजवर कोणतीही कूरकुर न करता तिने समजुतीने संसार केला होता. त्यामूळेच तिचे शांत म्हणजे खरे तर सकाळ पासून गप्प राहणे त्याला बेचैन करत होते. तिने मग उत्तर दिले,


"नाही, नाराज वगैरे काही नाही रे!ऑफ़िस मधल्या कामाचा तुझ्या मागचा सारा व्याप कळतोय मला. तू हे सारे आमच्यासाठीच करतोस हे कळते मला. मीही इतकी वर्षे होतेच ना गुंतलेली माझ्या नोकरीत! नोकरी सोडल्यावर आता माझ्या हातात जास्त वेळ वाचत असुनही मला त्याचा माझ्या कडून पूर्ण वापर होतोय असे कधीकधी वाटत नाही त्यामूळे गप्प राहून विचार करते आहे. मला माझे स्वत:चं पुस्तक छापावे अशी इच्छा होती म्हणून गेला महिनाभर मी त्याची माहिती काढते आहे. अनेकांशी माझी चर्चा सुद्धा होतेय पण कधी इथे परक्या प्रांतात मला मराठीत पुस्तक छापून देणारे सापडत नाहीत तर कधी ऑनलाइन पुस्तक छापण्यामधे ती प्रोसेस वाचून माझं काही समजण्यात चुकलं की वेळ जातोय. हे कारण आहे..."


"इतकंच ना, मला वाटलं मी तुला इतरांसारखी गिफ्ट दिली नाहीत म्हणून तू नाराज आहेस!चला या वर्षी सुरु करतो. गिफ्ट म्हणून मी तुझे लिहिलेले पुस्तक ॲमेझॉन किंड़लवर कसे छापतात ते वाचतो. मग आपण दोघे सोबत बसून तुझे पुस्तक एकत्र सोबत बसून आजच प्रकाशीत करु."


त्याने असे म्हणताच तिचा चेहरा खुलला. मनातल्या इच्छा पूर्ण करणारा जोडीदार लाभल्यावर रोजच प्रेमाचा सोहळा साजरा होतो... त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज उरत नाही! जोडीदाराची साथ आणि त्याच्याकडून प्रोत्साहन मिळाल्यावर ड्रीमगर्लचे ड्रीम पूर्ण झालेच समजा!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance