चकवा (भाग ३)
चकवा (भाग ३)


मीरा,तुम्हाला सांगितले त्या प्रमाणे करा.काही ही करून त्या सायको किलर ला शोधायचे आहे.
ओके सर,मी लक्षात ठेवते नीट सगळ.
इन्स्पेक्टर अभिजित आणि मीरा ने एक प्लॅन बनवला त्या प्रमाणे एका रात्री मिरा एका मॉडर्न मुली सारखी वेशभूषा करून त्या राजापूर रोड वर अभिजित सोबत आली.
इन्स्पेक्टर मिरा मी तुम्हाला सोडून जातो.तो जर कोणी किलर असेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्या ट्रॅप मध्ये अडकवेल.एकदम सावध रहा.काही अडचण वाटली तर मी आहेच.
ओके सर माझ्या फोन चे लोकेशन मी ऑन ठेवले आहे.
हो तुमचा फोन मी ट्रेस करत राहीन.
मिरा मग गाडीतून खाली उतरली.त्या रस्त्यावर चालत गेली.खांद्याला पर्स होती.त्यात मोबाईल आणि तिच्या सेफ्टी साठी एक गन पण होती.रस्ता पूर्णपणे सुनसान होता.वाहनाची ये जा कमी होती.अभिजित रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गाडीत बसून होता.मिरा कडून काही खबर मिळाली की तो तिच्या कडे जाणार होता.
मीरा त्या रस्त्यावर जणू घाबरून एकटी चालली आहे असच दाखवत निघाली होती.रस्ता संपला आणि एक वळण तिथे आले,तिथे लाईट ही नव्हती खूप अंधार होता,,त्या अंधारात मिरा चालत निघाली होती रात किड्यांचा कर्कश आवाज आणि जोरात वाहणारा वारा या मुळे वातावरणात एक भयानक भीती जाणवत होती.पण मिरा सावध पणे पुढे पुढे जात होती.
अचानक तिला तिच्या चेहऱ्यावर कोणाचा तरी हात जाणवला. ती तो हात पकडणार इतक्यात त्या व्यक्ती ने कलोरोफोर्म लावलेला रुमाल मिरा च्या नाकावर दाबला. मीरा हळूहळू बेशुद्ध झाली.
त्या मास्क घातलेल्या व्यक्तीने इकडे तिकडे पाहिले तिथे कोणीच नव्हते.अपरात्री ते ही अमावस्या असताना लोक त्या रस्त्यावर चुकून पण येत नसायचे.त्या व्यक्ती ने मिरा ला उचलले आणि आपल्या गाडीत घालून नेले.
अभिजित इकडे गोंधळून गेला होता कारण मिरा चा फोन ट्रॅक होत नव्हता.तिचे लोकेशन समजत नव्हते याचा अर्थ तो जो कोणी किलर आहे त्याने मिरा ला ताब्यात घेतले असणार.तो राजापूर रोड जिथे संपला त्या पुढे मिरा चा फोन बंद झाला होता.
अभिजित ने सोबत असणाऱ्या कॉन्स्टेबल ला गाडी त्या दिशेने घ्यायला लावली.
मीरा ने डोळे चोळत चोळत पाहिले ती एका अंधाऱ्या मिणमिणत्या बल्ब चा पिवळा उजेड असणाऱ्या खोलीत होती.तिचे हात पाय बांधून ठेवले होते.
कोण आहे इकडे आणि मला का असे बांधून ठेवले आहे.मिरा ने आवाज दिला.
तसे रुपेश मास्क लावून तिच्या समोर आला,ये जास्त आरडाओरड करायची नाही ,नाहीतर जिवंत ठेवणार नाही.मी एक वेडा आहे,मला सुंदर मुलींचा तिरस्कार वाटतो,म्हणून मी तुम्हाला अस पकडुन आणतो.
पण मी काय केले आहे तुझे? आणि माझ्या सोबत काय करणारा आहेस तू?
चील बेबी...तू तर एकदम हॉट आहेस.रुपेश मिरा च्या गालावर आपली बोट फिरवत म्हणाला.मी तुला अगोदर टेस्ट करणार,तुझा मनसोक्त उपभोग घेणार मग तुझे एक एक अवयव तोडून हाल हाल करून तुला संपवणार.
तू अस नाही करू शकत मला जावू दे.माझे आई बाबा वाट बघत असतील.मिरा बोलली.
इथे येणारी मुलगी परत जिवंत माघारी जात नाही.
हे बघ पोलीस तुला आज ना उद्या पकडतील तेव्हा तुला फाशीच होईल.आता मला सोड मी कोणाला काही सांगणार नाही.
रुपेश ने मिराचे तोंड दाबले,ये मला शहाणपण नको शिकवू.आज पर्यंत पोलीस माझ्या पर्यंत पोहचले नाहीत समजल.
मिरची पर्स तिथेच बाजूला पडली होती त्यात मोबाईल आणि गन होती.ती पर्स कधी घेता येईल याचा ती विचार करत होती दोन्ही हात तिचे दोरीने बांधले होते मिरा ने थोडी हुशारी दाखवली,म्हणाली,हे बघ तुला जे हवे ते मी देते पण फक्त माझे हात तरी सोड.
ये मला मूर्ख समजलीस काय.? रुपेश ओरडला.तेव्हा त्याचा फोन व्याब्रेट झाला.तो फोन घ्यायला टेबल कडे गेला.तेव्हाच मिरा ने बांधलेल्या दोन्ही हाताने बाजूला असणारे लाकूड उचलले आणि रुपेश कडे फेकले.त्याला डोक्याला ते लागले.तो रागात तसाच मागे आला आणि त्याने मीराला जोरात थप्पड लगावली. "मला मारतेस काय,बघ काय हाल करतो तुझे अस बोलून रुपेश तिचे कपडे पकडुन फाडू लागला तसे मिरा ने दोन्ही लाथा नी त्याच्या पोटात मारले.रुपेश खाली पडला. मिरा हाताने आपली पर्स पकडली पण दोन हाताने ती नीट पकडता येईना.तो पर्यंत रुपेश उठून उभा राहिला,त्याने तिच्या हातून पर्स घेतली आणि उघडली तर त्यात गन.
अरे वां तू तर गन सोबत घेवून फिरतेस तर.आता याच गन ने तुझ्या डोक्यात गोळी घालतो.रुपेश बोलत होता. मिराने आपल्या दोन्ही हातानी त्याच्या हाता वर जोरात फटका दिला.गन बाजूला पडली.ती घ्यायला मिरा खाली वाकली तर रुपेश ने तिचे केस जोरात पकडले.तिला खूप वेदना होत होती.रुपेश ने ती गन आपल्या ताब्यात घेतली आणि तिच्या डोक्याला लावली..आता मारायला तयार हो..तू खूप हुशार दिसतेस तुला एक मिनिट पण जिवंत ठेवायला नको.रुपेश ने आपल्या हाताचा विळखा मिरा ला घातला होता आणि गन डोक्याला धरली होती.मिरा घाबरली होती कोणत्या ही क्षणी तो गोळी झाडणार होता.अभिजित ला आपले लोकेशन सापडले असेल की नाही.आपला फोन रेंज मध्ये असेल की नाही काही तिला माहीत नव्हते.मिरा ने गच्च डोळे मिटून घेतले आणि जोरात धडाम असा आवाज झाला.आपण आता मेलो आपल्या डोक्यात गोळी घुसली असच मिराच्या मनात आले. तिने डोळे उघडले तर समोर गन रोखून अभिजित उभा होता.
पकडा रे याला. साला इतके दिवस पोलिसा पासून लपून होता काय? अभिजित म्हणाला.कॉन्स्टेबल ने रुपेश ला ताब्यात घेतले होते
मीरा आर तू ओके.अभी ने विचारले.
हो सर तुम्ही वेळेत आला म्हणून नाहीतर आज काही खरे नव्हते.
मिरा थोडा वेळ तुमचा फोन आऊट ऑफ रेंज दाखवत होता पण तुम्ही गेलात त्या रोड वर आम्ही आलो आणि अचानक पुन्हा तुमचा फोन रेंज मध्ये आला आणि लोकेशन सापडले..
थँक्यू सर हा एक सायको किलर आहे,मुलींना पकडुन डांबून ठेवून त्यांच्या वर अत्याचार करतो मग त्याचा खून करतो.यानेच माझ्या समोर कबूल केले आहे.
रुपेश रागाने मिरा कडे बघत होता आज त्याचा डाव फसला होता.ही मिरा इन्स्पेक्टर आहे हे आता त्याला समजले होते.
दुसऱ्या दिवशी सगळ्या न्युज चॅनल वर रुपेश ची बातमी दाखवत होते.ते अमावस्या आणि भुताटकी , चकवा अस काही नव्हते तर तो सायको किलर रुपेश होता अस बातमीत सांगत होते.गाववाले ही आता निश्चिंत झाले होते.राजापूर रोड वर कसलाच चकवा कधी ही नव्हता.
आता राजापूर रोड अमावस्येला ही गजबजुन जात होता.लोकांची गाड्यांची तिथे गर्दी दिसत होती.
रुपेश ला जन्मठेप झाली होती.
समाप्त.