चकवा (भाग 1)
चकवा (भाग 1)


साहेब राजापूर रोड वर झाडीत एक प्रेत सापडले आहे.कोणीतरी निर्घृण पणे खुन केलेला आहे मुलीचा. कॉन्स्टेबल जाधव कॉल वर बोलत होते.
ठीक आहे मी येतो लगेच इन्स्पेक्टर अभिजित गर्दे म्हणाले.
कोकण राजापूर रोड तसा सुनसान,एखाद दुसरे वाहन जाता येता दिसत असे.असली तर कधी गाड्यांची गर्दी नाहीतर तुरळक गाड्या असायच्या.
इन्स्पेक्टर अभिजित तिथे आले,त्यांनी पाहिले एक २४/२५. वयाची तरुण मुलगी होती ती,तिच्या शरीरावर सूरी ने वार केले होते.खुनी विचित्र आणि विक्षिप्त दिसत होता.त्या मुलीच्या शरीरावर एक ही कपडा नव्हता.
जाधव या मुलीवर अगोदर अत्याचार केला आहे मग तीच्या वार करून खून करण्यात आला.
होय साहेब मला पण असेच वाटते.जाधव बोलले.
बॉडी पोस्टमार्टम साठी पाठवून द्या.अभिजित म्हणाला.
सूमे एवढं नटून थटून बाहेर पडू नको आज अमावस हाय.
आई अग काही होत नाही, रंजी, लता पण आहेत की सोबत, कॉलेज च गॅदरिंग संपल की लगेच घरी येणार
सांभाळून जा ग,त्या राजापूर नाक्यावर चकवा हाय,अस गावातील लोक बोलत होती,तरुण पोरी आपोआप तिथं गायब होतात. वसू सुमन ची आई म्हणाली.
आई अस काही नसते,आजच्या जगात असल काही घडत नाही.तू नको काळजी करू.येते मी.सुमन घरा बाहेर पडली.
कॉलेज गॅदरिंग साठी साडी नेसून चालली होती संध्याकाळी कार्यक्रम होता ,कॉलेज गावा पासून लांब होत. वडाप जीप गाड्या राजापूर ला जात येत असत .सुमन रंजना लता जीप मधून गेल्या.गॅदरिंग संपायला रात्रीचे आठ वाजले. त्यांच्याच गावातली काही मुल त्यांच्या सोबत होती सगळे मिळून जीप ने घरी यायला निघाले.
नेमके त्या नाक्या जवळ आल्यावर जीप बंद पडली .जीप ड्राइवर ने सगळ्यांना खाली उतरायला सांगितले आणि दुसरी गाडी बघा म्हणाला.सुमन रंजना,लता एकमेकांचा हात धरून रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या,येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या ना हात दाखवत होत्या पण कोणी थांबत नव्हते.त्यांच्या सोबत असणारी लोक चालत पुढे निघून गेली या तिघी आणि दोन मुल मागे राहिली.रात्र वाढत चालली होती. झाडी मधून किड्यांचे आवाज येत होते वारा वेगाने आवाज करत जात होता. रात्र वाढत चालली होती तशा या तिघी घाबरून गेल्या. रंजे आपण चालत चालत जावू बघू गाडी भेटेल एखादी.सुमन म्हणाली.
हा चला जावू लता बोलली.मग तिघी आणि ती दोन मुल चालत चालत निघाली. रात किड्यांचा किर्र आवाज, वाहणारा वारा,रस्त्यावर चिट पाखरू पण नाही. अमावस्येचा अंधार सगळच भीती दायक होत.तिघी जणी जीव मुठीत घेवून निघाल्या होत्या..शुक शुक..त्या गडद अंधारात एक आवाज ऐकू आला. लते तुला आवाज ऐकू आला काय? रंजना ने घाबरून विचारले.
नाही ग कुठला आवाज...पुन्हा शुक शुक...मी आलोय थांब ग जरा...हा आवाज स्पष्ट तिघींना ऐकू आला.तशा त्या घाबरल्या.आणि पळा म्हणत जीव मुठीत घेवून धावू लागल्या.
थोडे अंतर गेल्यावर लता थांबली ,बाजूला रंजना होती पण सुमन कुठे दिसत नव्हती.
रंजे सुमन कुठे आहे?
आपल्या सोबतच पळत होती की,कुठे गायब झाली?
सुमन ये सुमन लता ने आवाज दिला पण सुमन कुठे दिसली नाही.तिथे थांबण्यात काही अर्थ नव्हता.दोघी पळत गावात पोहचल्या ,सुमन गायब झाल्याची बातमी गाव भर पसरली.त्या नाक्यावर असणाऱ्या भुताने सुमन ला पळवले अस सगळे जण बोलू लागले. तो रस्ता म्हणजे चकवा हाये, तिथं माणूस गायब होतो मग पुन्हा जिवंत येत नसतो.अशी अफवा गावात होती.
क्रमशः