Vasudha Naik

Others

4.5  

Vasudha Naik

Others

चिठ्ठी

चिठ्ठी

2 mins
276


 नील जेमतेम आठ वर्षाचा असतो. इयत्ता तिसरी मध्ये तो शिकत असतो. आई बाबा,एक पाठचा छोटा भाऊ, आजी आजोबा सर्व एकत्रित कुटुंब असते.

 इयत्ता सातवी मध्ये असताना अभ्यास सोडून इतर कलागुणांमध्ये त्याला रस यायला लागतो. ड्रॉइंग, पेंटिंग, रांगोळी,कागदी कला या कलांमध्ये तो व्यस्त राहायला लागतो.

  आई सांगत असते बाळा हे तुला करायचे आहे, पण अभ्यासाकडे सुद्धा लक्ष दे.

 तो आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. अभ्यास सोडतो कला जोपासतो. सातवी तो नापास होतो.

  त्याला समजते की अभ्यास करणं खरंच गरजेचं आहे. तो आता अभ्यास आणि त्याची कला दोन्हीही चालू ठेवतो. आईला समाधान वाटते. एका वर्गात नापास झाला पण आता इथून पुढे त्यांने छान भरारी घेतली.

  इयत्ता दहावीला तो शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने पास झाला. सर्व शिक्षक,त्याचे मित्र, आई बाबा,समाजातील व्यक्ती, सर्वांनी त्याचे भरभरून कौतुक केले.

  कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला . तो अभ्यासात उत्तम प्रगती करू लागला.

  अभ्यासाबरोबर त्याची कलाही जोपासू लागला. आता तो आभाळात उंच भरारी घेऊ लागला. इंजिनियर झाला.

  पुढील शिक्षणासाठी परगावी गेला. इकडे आईच्या तब्येतीत बिघाड होऊ लागला. दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत चालली.

  मुलाला पैशांची कमतरता पडायला नको म्हणून तिने डॉक्टरी इलाज करणे सोडून दिले. मुलाचे शिक्षण पूर्ण झाले तर आपले घरदार छान उभे राहील. या आशेवर नीलची आई होती.

   वर्षभरात तिची तब्येत खूप खूप खालावायला लागली. डॉक्टरांनी तिला पोटाचे ऑपरेशन करून घ्यायला सांगितले. तिला पोटाचा कॅन्सर झालेला होता. आणि चौथ्या स्टेजला पोहोचलेला होता.

   हे घरातील सर्वांना माहीत होते. पण पैशापुढे कोणाचे काही चालत नव्हते. डॉक्टरी इलाज करायचेच नाहीत हे आईने मनाशी ठरवले होते.

  एक चिठ्ठी लिहिली. त्यात लिहिले " नीलबाळा काय सांगते नीट ऐक, मला हा आजार गेले दोन वर्षांपासून होता, तू इथे असतानाच मला त्याची कूण कूण लागलेली होती. हे ऐकून तू परदेशी जाणार नाहीस हे मला माहीत होते. म्हणून मी तुझ्यापासून हे लपवले. घरच्यांपासूनही हे लपवले. पण आता वेदना असह्य होत चालल्या आहेत. जेव्हा तू परत मायदेशी येशील, तेव्हा तू मला पाहू शकणार नाहीस. पण तू खूप आई वेडा आहेस हे मला माहित आहे. मी आजारी आहे म्हटल्यावर तू शिक्षणासाठी गेलाच नसतास. पण कदाचित तू येईपर्यंत मी या जगात नसेन. खूप मोठा हो. छान नोकरी कर. आणि सर्व घरादाराची पूर्ण जबाबदारी घेऊन पुढील आयुष्य उत्तम प्रकारे घालव. तुला मी वरून पाहतच राहणार आहे. तुला भरभरून शुभेच्छा देते. आणि हो मी या जगात नाही म्हणून रडू नकोस माझे आशिष तुझ्या पाठीशी आहेत. "

  इकडे नील चे फोन होतच असतात. पण घरातले सुद्धा त्याच्या पासून आईची ही गोष्ट लपवून ठेवतात. एक दिवस असा येतो की आई देवा घरी जाते. नीलला हे सांगितले जाते. नील मिळेल त्या विमानाने मायदेशी परत येतो.

  आईचे क्रिया कर्म सापडत नाहीस त्याला. पण आईने लिहिलेली चिठ्ठी त्याचे बाबा त्याला देतात. हे वाचून तो सुन्न होतो. खूप शिकायचे मोठे व्हायचे आणि आपल्या पैशातून गरीब अनाथांना मदत करायची.हे मनाशी पक्के ठरवतो व सर्व झाले की शिकण्यासाठी परत जायला निघतो..


Rate this content
Log in