Jyoti gosavi

Classics

3  

Jyoti gosavi

Classics

बर्फाचे तट पेटुनी उठले *

बर्फाचे तट पेटुनी उठले *

3 mins
529


कवी वि वा शिरवाडकर यांची वीर रसाने भरलेली आणि क्षात्र तेजाने ,

ओतप्रोत नाहून निघालेली अशी ही टॉप टेन कवितें पैकी एक

1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हाची ही कविता आहे. तोपर्यंत आमचे भारतीय, राजकारणी, आणि आपण देखील निवांत होतो. 

तिन्ही बाजूला समुद्र आणि एका बाजूला रक्षक असा हिमालय, अशा वेळी हिमालयाच्या बाजूने आपल्यावर कोणी आक्रमण करेल हा विचार देखील आपल्याला शिवलेला नव्हता. 

आणि "हिंदी चिनी भाई भाई" म्हणत चिन्यांनी केसाने गळा कापला ,आणि अचानक हिंदुस्थानावर आक्रमण केले. 

आपण बेसावध होतो, आपली मिलिटरी जरी कितीही उच्च प्रतीची कामगिरी करत असली, तरी त्यांच्याकडे उच्च प्रतीची साधनसामग्री नव्हती. अगदी बर्फात लढायला सैनिकांकडे तसे बूट देखील नव्हते. 

तरीही आमच्या सैनिकांचं मानसिक खच्चीकरण कधीच होत नव्हतं. अशावेळी त्यांच्या अंगात वीरश्री निर्माण होण्यासाठी, अनेक प्रांता प्रांतातून अनेक प्रकारच्या कवींनी कविता निर्माण केल्या ,

वसंत बापट यांची" उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू" ही कविता तर, कुसुमाग्रजांची

" बर्फाचे तट पेटून उठले

 सदर शिवाचे कोसळते 

रक्त आपुल्या प्रिय आईचे

 शुभ्र हिमावर ओघळते"


 यातील पहिले कडवे किती सुंदर, आणि मनाला हात घालणारे आहे .

की बर्फ पेटलाय ही कल्पनाच पहा कशी आहे! या बर्फाचे तट आणि तट पेटून उठलेले आहेत, आणि शंकराचे घर कोसळू पाहत आहे .

आपल्या भारत मातेचे, प्रिय आईचं रक्त त्या बर्फावरती  ओघळत आहे. अगदी डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते. 

 

असुरांचे पद भ्रष्ट लागुनी

 आज सतीचे पुण्य मळे

अशा घडीला कोण करंटा

 तटस्थतेने दूर पळे ?

 

या भूमीला त्या दृष्ट असुरांचे पाय लागलेले आहेत ,आणि त्यामुळे सती सारखी पवित्र असणारी माझी माय भू, तिचे पुण्य पणाला लागलेले आहे .

यामध्ये रावणाने पळवून नेलेली सीतामाई, तिच्या आश्रमाला लागलेले त्याचे पाय आणि सतीच मळीन झालेलं पुण्य .

हा दाखला दिलेला आहे. आणि अशावेळी तो तटस्थ राहील आणि दूर पळेल तो खरच करंटा असेल! असं त्यांनी म्हटलेलं आहे. 

कोण करंटा दूर  पळे! 


कृतांत ज्वाला त्वेषाची ना

 कोणाच्या हृदयात जळे ?

साममंत्र तो सरे, रणाची

 नौबत आता धडधडते


असं कोण असेल की ज्याच्या हृदयामध्ये त्वेशाची ज्वाला जळत नसेल? 

आता त्यांच्याशी कोणाशी सांग म्हणजे समेट करण्याची वेळ गेलेली असून, आता रणांगणाच्या नौबती धडधडत आहेत. 


 सह्यगिरीतिल वनराजांनो

 या कुहरातुन आज पुढे

रक्त हवे जर स्वतंत्रतेला,

 रक्ताचे पडतील सडे


गिरी कंदरांमध्ये ,गुहेनमध्ये लपलेल्या सिंहानो, बाहेर या! आज तुमचा आवाज तुमची ताकद शत्रूला समजू द्या .

 अनेक कष्टाने मिळवलेले हे स्वातंत्र्य ,हे स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी, जर स्वातंत्र्य देवतेला जर रक्तच हवं असेल तर, त्याचे देखील येथे सडे पडतील. 


एक हिमालय राखायास्तव

 करा हिमालय लक्ष खडे

समरपुराचे वारकरी हो

 समरदेवता बोलविते


आपला एक हिमालय राखण्यासाठी तुम्ही इतके जण धावून या की, "जसे काय लक्ष हिमालय समोर उभे आहेत" असे शत्रूला वाटले पाहिजे. 

ह्या रणांगणाच्या वारकऱ्यांनो या ही समररूपी देवता तुम्हाला बोलवीत आहे. 



खडक काजळी घोटुनि

 तुमचे मनगट-बाहू घडलेले

कडेकपारीमधील वणवे

 उरात तुमच्या दडलेले


तुम्ही असे साधेसुधे लेचे पेचे नाहीत. तुमची ही मनगट तुमचे बाहू जणू काय काळे पत्थर करून बनवलेली आहेत. 

आणि कडे कपारी मधील "वणवे" तुमच्या उरात दडलेले आहेत, धगधगत आहेत .त्यांना वाट द्या. 


काबुल-कंदाहार पथावर

 डंके तुमचे झडलेले

शिवतेजाची दीपमाळ

 पाठीशी अपुल्या पाजळते



तुमच्या विजयाचे पराक्रमाचे डंके, कधीकाळी काबुल कंधार पर्यंत गेलेले आहेत. आणि शिव तेजाची हा शब्द मला इथे दोन्ही अर्थाने वाटतो. 

ही मराठी कवीने केलेली, मराठी भाषेतील कविता आहे. म्हणजे इथे शिवतेज म्हणजे अर्थात शिवाजी महाराज, त्यांचा पराक्रम, त्यांचे तेज, हे देखील अभिप्रेत आहे. आणि कवितेच्या सुरुवातीलाच

" बर्फाचे तट पेटून उठले

 सदन शिवाचे कोसळते" यामध्ये शिवतेज म्हणजे रुद्र श्रीशिवशंकर याचे तेज. 



 कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे

कोटि कोटि देहांत आज या एकच मनिषा जागतसे , जरी आम्ही शरीराने वेगळे आहोत तरी आमचं मनगट एकच आहे. 

म्हणजे आमच्या शरीरातील ताकद आम्ही एकवटली आहे. शत्रूच्या विनाशासाठी एकवटलो आहोत, आणि आज आमच्या सगळ्यांच्या मनात एकच इच्छा, एकच मनीषा जागते आहे, ती म्हणजे 

 स्वतःचा देश वाचवणे आणि शत्रूला पराजित करणे. 


पिवळे जहरी सर्प ठेचणे –

 अन्य मना व्यवधान नसे

एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो

 राहिल रण हे धगधगते  


हे चिन्यांच्या रुपाने आलेले पिवळे जहरी साप ठेचणे, एवढे एकच आमचे कर्तव्य आहे. 

 दुसरी कोणतीही गोष्ट आता आमच्या मनामध्ये नाही, आणि आम्हीही एकच प्रतिज्ञा सारे भारतीय करतोय, जोपर्यंत आम्हाला विजय मिळत नाही, तोपर्यंत हे समरणांगणरूपी कुंड धगधगते तेवते ठेवले जाईल, 

आणि आमच्या हृदयातील देश प्रेमाची आग देखील धगधगत राहील. 

असा इशारा शेवटी त्यांनी शत्रूला म्हणजेच चिन्यांना दिलेला आहे. 


आणि खरोखर विष्णू वामन शिरवाडकरांच्या सगळ्याच कविता ग्रेट, 

मनामध्ये घर करून राहिलेल्या , 

शब्दा शब्दात अर्थ भरून राहिलेल्या, 

 त्यात मला आवडलेली ही एक कविता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics