Sanjay Ronghe

Tragedy Others

3  

Sanjay Ronghe

Tragedy Others

ब्रेक अप

ब्रेक अप

3 mins
196


सम्या अरे चलतो का, तहसील ऑफिसला बाबांचं थोडं काम आहे, अर्धा एक तास लागेल बघ. लवकर जाऊ आणि लवकर परत येऊ .

अरे यार विक्या नको, मला यार आज खूप काम आहे, ये ना तूच जाऊन. नाहीतर तुझ्या कामात माझं काम राहूनच जाईल. ये तूच जाऊन. चल मी येतोच.

ओके चल बाय म्हणून विकास बाबांच्या कामाला एकटाच तहसील ऑफिसला पोचला. बाबू जागेवर नव्हते, आजूबाजूला विचारले तर कळले की बाबू साहेबांकडे गेले आहेत, साहेबांची मीटिंग सुरू आहे, किमान एक तास तरी लागेल. काय करावे हा विचार करत विकास ऑफिसच्या बाहेर आला. वेळ काढायचा म्हणून इकडे तिकडे बघत बसला. वेळ निघता निघत नव्हता.

इतक्यात त्याच्या समोरून समीरचे वडील त्याला जाताना दिसले. म्हातारपणामुळे त्याना चालणे पण कठीण होत होते. कसे तरी थांबत थांबत ते पुढे जात होते. त्यांची ती अवस्था बघून विकास खूपच अस्वस्थ झाला. त्याला राहवले नाही आणि तो सरळ त्यांच्या जवळ पोचला. त्याने त्यांना नमस्कार केला.

" नमस्कार काका, मी मदत करू का तुम्हाला " म्हणत त्याने त्यांना आधार दिला.

काका कसे आहात म्हणत तो काकांना धरून त्याना आधार देत चालू लागला, तसे ते म्हणाले, " काय रे विकास इकडे कुठे आलास ?"

"काही नाही काका बाबांचे काम होते, म्हटलं मीच करून येतो, म्हणून आलो होतो बघा"

पण बाबू मीटिंग मध्ये आहेत तर त्यांची वाट बघतोय".

त्यावर काका म्हणाले अरे हो का, मला पण मग त्याच बाबुकडे काम आहे. मग आता वाट बघवी लागेल तर. चल मग तिकडे त्या ओट्यावर बसू या, म्हणत त्यानी आपली चालण्याची दिशा बदलली. दोघेही मग ओट्यावर बराच वेळ बसून राहिले.

मधेच काकांना काही आठवले, तसे ते म्हणाले "अरे विकास आज तर कॉलेजला तुमचे काही प्रोजेक्ट चे काम होते ना, मग तू नाही गेलास का, समीर तर सकाळीच गेला आहे. त्याला मी माझ्या कामात मदत करायला बोललो तर तो कॉलेजचे महत्त्वाचे काम आहे म्हणून म्हणत होता. तुम्ही दोघेही तर सोबतच आहात ना, मग तुला नव्हते का ते काम."

तसे विकासाच्या लक्षात आले की समीर घरी खोटे बोलला, त्याला वडिलांना मदत करायची नसेल म्हणून तो काहीतरी कारण सांगून बाहेर भटकत असावा.

समीरच्या या वागणुकीचे विकासाला खुप वाईट वाटले. पण त्याने समीर वाडीलांपुढे खोटा पधु नये म्हणून त्यांना म्हणाला, " काका माझे पण काम समीरच करतोय. बाकी मी इथून गेल्या नंतर करील त्यामुळे मी इथे येऊ शकलो. नाहीतर मला पण येता आले नसते. "

तरीही समीरचे वडील काय समजायचे ते समजले. ते विकासाच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले. "खरच मुलगा असावा तर तुझ्या सारखा. किती काळजी करतोस रे तू तुझ्या बाबांची. "

"खूप छान ."

नंतर थोड्याच वेळात ते बाबू मीटिंग आटोपून आले. विकासने आपले आणि काकांचे पेपर त्यांच्याकडे देऊन काम पूर्ण केले. आणि मग त्यानेच आपल्या गाडीवर बसवून काकांना त्यांच्या घरी पोचवले.

काकांना विकासाचे ते वागणे खूप आवडले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला,

" खरच रे बाबा विकास, तू तुझ्या आयुष्यात खूप मोठा व्यक्ती होशील ."

विकास काकांना सोडून घरी परत आला. त्याने घडलेला प्रसंग आपल्या बाबांना सांगितला. त्याच्या बाबांना पण आपल्या मुलाच्या अभिमान वाटला.

सायंकाळी अचानक विकास आणि समीरची भेट झाली तर समीर एकदम विकासावर भडकला, म्हणाला

" तू माझ्या बाबांना का भेटलास, ते त्यांचे काम करत होते ना, तू कशाला मध्ये लुडबुड केलीस."

" माझी सम्पूर्ण इमेज घालवलीस. "

" यापुढे माझ्या कुठल्याही गोष्टीत तू ढवळाढवळ केलेली मला खपणार नाही."

" मी माझे बघून घेईल तुझ्या कुठल्याच मदतीची मला गरज नाही."

" आणि माझ्या घरच्यांना पण तू मदत केलेली मला बिलकुल नको आहे."

" या पुढे माझ्याशी कधीच बोलू नकोस."

म्हणत समीर तिथून रागा रागाने निघून गेला .

विकासने समीरला खूप समजविण्याचा प्रयत्न केला परंतु, समीर काहीच समजून घेण्यास तयार नव्हता. अशातच दोघांचा दुरावा वाढला.

आणि दोघांच्या मैत्रीचा आज असा अचानक ब्रेक अप झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy