kanchan chabukswar

Others

4.0  

kanchan chabukswar

Others

बळी तो कान पिळी

बळी तो कान पिळी

5 mins
410


 लॉकडाऊन च्या काळामध्ये बरेच व्यवसाय ठप्प झाले. विशेष म्हणजे हॉटेलचा व्यवसाय. तयार अन्नाची पाकीट, किंवा पिझ्झा बर्गर यांचे दुकान, एकदमच बंद पडले.


जवळ जवळ एक दीड वर वर्षाने, सगळे व्यवसाय हळूहळू रुळावर येऊ लागले, पण.............


 आर्यन, वीर, श्वेता, राबिया, युसुफ, दिलीप, कॉलेज मधली मुले. सध्याच्या काळामध्ये कॉलेज तसं ऑनलाइन चालू होतं, त्याच्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होत नसत. पण चोरून मारून युसुफ कडे बऱ्याच वेळेला त्यांची भेट होत. राबिया कुलसुम यांना तशी बाहेर पडायची बंदी होती, तरी पण काहीतरी कारण काढून त्या घराबाहेर निघत.


     नोट्स देणे-घेणे या कारणावरून बरेच मुलं घराबाहेर पडत.

नुकतीच पिझ्झा ची दुकाने उघडली होती, बऱ्याच मुलांच्या आईवडिलांची पैशाची तंगी चालू होती त्यामुळे बाहेरचं खाणं, त्याच्या साठी लागणारे पैसे, घरातून मिळणं फारच कठीण होतं.


   सगळ्यांच्या डोक्यातून आता जरा भलत्याच, भन्नाट आयडीया यायला लागल्या.

युसुफला कुलसुम वरती बरेच इंप्रेशन मारायचे होते, तसेच शाहरुखला राबिया वर.


त्यादिवशी गप्पा मारताना पिझ्झा मागवायची कल्पना निघाली. शाहरुखने युसुफला एक आयडिया दिली.


     शाहरुख दुकानात जाऊन पोहोचला, टंगळमंगळ करत उभा राहिला, तेवढ्यात युसुफन दुकानांमध्ये पिझ्झा साठी ऑर्डर दिली. अर्धा तास काहीतरी स्वस्तातली वस्तू खात शाहरुख तिथेच थांबला. कोण डिलिव्हरी बॉय निघतोय हे त्यांनी पाहिले, ताबडतोब युसुफला त्याचा पिक्चर काढून पाठवला.

   डिलिव्हरी बॉय बिल्डिंग पाशी आल्यावरती काहीतरी कारण काढून युसुफने त्याच्याशी भांडण उकरून काढले, भरपूर शिवीगाळ केली, तेवढ्या वेळात अर्धा तास निघून गेला, नंतर त्यांनी डिलिव्हरी बॉय ला सोडले.

झाले डिलिव्हरीसाठी उशीर झाला म्हणून कुलसुम ने डिलिव्हरी फुकट घेतली. कारण कंपनीची तशीच पॉलिसी होती.

शाहरुख कुलसुम, युसुफ, आणि राबिया मस्त पिझ्झा एन्जॉय केला. 


राकेश[ डिलिव्हरी बॉय] मी दुकानात येऊन बाकीच्या सर्विस स्टाफला काय झाले ते सांगितले.

सगळ्यांनी आपल्या खिशातून पन्नास रुपये काढून पिझ्झा चे पैसे दुकानात भरले आणि राकेश ला गप्प राहायला सांगितले.


आता असं नेहमीच व्हायला लागलं, चिकन पिझ्झा, स्पेशल चीज पिझ्झा, अशी महाग पिझ्झाची ऑर्डर एका ठराविक नंबरवरून येत,

ऑर्डर द्यायला गेलेल्या डिलिव्हरी बॉय ला अनंत अडचणी येत.


प्रत्येक वेळेला घरामध्ये डिलिव्हरी घेण्यासाठी मुली असत. त्यामुळे त्यांच्याशी भांडण्यात काही अर्थ नसे, काय करावे कोणालाच कळत नव्हते.

दुकानाचा मालक असले फालतू कारण ऐकायला तयार नव्हता. त्याला धंदा करायचा होता आणि मागच्या वर्षी चा लॉक डाउन मुळे झालेला लॉस भरून काढायचा होता.


  त्यादिवशी वाढदिवस होता आर्यन चा आणि त्याने आपल्या घराच्या गच्चीवर ती आपल्या मित्र मंडळाला बोलवले होते. शाहरुख आणि आर्यन जुनाट चाळीमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होते, चाळी ला लिफ्ट नव्हतीच त्यामुळे पिझ्झा डिलिव्हरी बॉय वर चढून येऊ पर्यंत दहा पंधरा मिनिट आरामात लागायचे.

त्याची आई घरीच बरेच पदार्थ करणार होती, तिचे पोहे , आमलेट पाव किंवा स्वस्तातला खिमा-पाव असले पदार्थ पार्टीला थोडी चालणार होते?

त्यांना तर बर्गर, न्यूडल्स नाहीतर महागडा पिझ्झा, त्याच्याबरोबर प्यायला सॉफ्ट ड्रिंक असला थाट हवा होता. अक्कल कवडीची नाही कमवायची अक्कल नाही, काम करायची तयारी नाही, आई-वडिलांच्या जीवावरती सगळी मौजमजा.


  शाहरुखने परत एकदा चकटफु पिझ्झा चा डाव आखला. आर्यनला काहीच अडचण नव्हती, नाहीतरी त्याची आई घरीच बर्गर बनवणार होते.

शाहरुखने आर्यनला आपला बेत सांगितला.

एका ने दुकानात उभे राहायचे, ऑर्डर घेऊन कोण मुलगा निघतो त्याचा पाठलाग करायचा, त्याला काहीतरी कारण काढून थांबवायचं, कंपनीच्या नियमानुसार फुकट पिझ्झा देण्यास भाग पाडायचं.

प्लान तर उत्तम होता, नेहमीप्रमाणे शाहरुखने आपल्या मोबाईल वरुन दुकानांमध्ये फोन केला.


यावेळेला मात्र दुकानाचा मालक दुकानात नसल्यामुळे, अनिल यांनी फोन घेतला. नंबर ओळखीचा वाटल्यामुळे त्याने तो नंबर राकेशला दाखवला. म्हणजे आता चकटफु टोळक्याने 4 पिझ्झा ची ऑर्डर दिली होती. आणि काहीतरी कारण काढून ते पिझ्झा फुकट हादडणार होती.

राकेश ने आणि अनिल ने पण एक डाव रचला. दुकानाच्या स्टोअर मध्ये कच्चे पिझ्झा चे साहित्य पडले होते.

मागील चार पिझ्झा चे पैसे पण वसूल करायचे होते.

अनील चा चुलत भाऊ पोलिसांमध्ये हवालदार होता, त्याची मदत घ्यायचे ठरवले.

  कोणाला काही सुगावा न लागू देता दुकानाच्या समोरून चार पिझ्झा घेऊन राकेश निघाला, तर दुकानाच्या मागच्या पासून अनिल, विवेक आणि सुरेश निघाले. समोर त्यांना दिसत होतं की राकेश चा पाठलाग कोणीतरी करताय.


ठरल्याप्रमाणे राकेश भलत्याच दिशेला निघून गेला. स्कूटर चालवत चालवत तो गर्दीत हरवून गेला. बाकीच्या तिघांनी कंपनीचा टीशर्ट बदलून अन्य टी-शर्ट घातला होता, त्या तिघांनीही तोंडावरती मास्क आणि डोळ्यावर काळा गॉगल घालून वेगळ्या रंगाच्या hat घातल्या होत्या , त्यामुळे त्यांचा चेहरा ओळखता येत नव्हता.

 ते तिघे जण आणि अनिलचा हवालदार भाऊ आर्यांनच्या इमारतीपाशी पोहोचले.


  चकटफू टोळके जोरजोरात गप्पा मारत होते, ते वाटच बघत होते ऑर्डर घेऊन जो कोणी येईल त्याची वाट अडवायची आणि फुकट पिझ्झा हादडाय चा.


  अनिल बरोबर इमारतीचे मजले चढून आर्यांनच्या दरवाज्यापाशी उभा राहिला, बेल वाजवून त्यांनी पिझ्झा डिलिव्हरी केला आणि चार हजार रुपये बिल झाले आहे सांगितले. आर्यन च्या आईला काही समजलेच नाही, पण शाहरुख चा नंबर जेव्हा अनिल न दाखवला तेव्हा तिला समजले की मुलांनी परस्पर ऑर्डर दिली आहे. आर्यन च्या वडिलांनी चरफडत, राग राग करत चार हजार रुपये काढून दिले. अनिल ने आणि बरोबरच्या हवालदाराने साधेच टी शर्ट घातले, त्यांनी कंपनीचा बॉक्स देखील घेतला नव्हता. युनिफॉर्म भिजला आणि बॉक्स खराब झाला म्हणून नवीन बॉक्स घेतला, पिझ्झा ची कंपनी नवीन आहे, आणि आम्ही शाहरूखचे मित्र आहोत असं सांगतअसे थातूरमातूर कारण देत त्यांनी पैसे घेऊन पोबारा केला.


  पिझ्झा चा बॉक्स गरम लागत होता, आर्यन च्या आईने राबिया ला हाक मारली आणि सगळे सामान गच्चीवर पाठवून दिलं.

खालचे टोळक न जाणे कुठे गायब झालं होतं?


बराच वेळ वाट बघून शेवटी मुली बिल्डिंगच्या खाली आल्या, आर्यन शाहरुख युसुफ दिलीप कुठे सापडत नव्हते.

सगळ्या पार्टीचा बेरंग झाला म्हणून त्या नाराजीने घरी निघून गेल्या.

आर्यनचे वडील बराच वेळ रागवून बसले पण जसे तीन तास उलटून गेले तसेच त्यांना काळजी वाटू लागली.

सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर जिन्याच्या खाली अडगळी मध्ये चारीही मुले बांधलेल्या अवस्थेत आढळली.


  खोदून खोदून प्रश्‍न करून देखील त्यांना काहीही आठवत नव्हते. रात्रीचे दहा वाजून गेले होते,

" ठीक आहे जे झालं ते झालं, व मुले खाऊन घ्या तुमचा पिझ्झा आला आहे." असं म्हणत आर्यन च्या आईने त्यांच्यासमोर पिझ्झा चे बॉक्स टाकले.

उघडून बघतात तर आत मध्ये फक्त गरम केलेल्या डबल रोटी होत्या. शाहरुखच्या डोळ्यापुढे काजवे चमकायला लागले. त्याने दुकानात फोन केला, दुकानाचे मालक जागेवर असल्यामुळे त्यांनी फोन वरती पिझ्झा ची कुठलीही ऑर्डर नसल्याचे सांगितले..


आता सर्व प्रकार शाहरुख आणि युसुफच्या लक्षात आला.


शाहरुख तर राकेश च्या मागे भलतीकडेच गेला होता, राकेश दुसरीकडे डिलीव्हरी द्यायला चाललाय हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा तो वळून इमारतीकडे परत आला होता. तोपर्यंत तिघही मुलं इमारतीच्या खालून गायब झाली होती, त्यांना शोधण्यासाठी जेव्हा शाहरुख इमारतीचा जिना चढू लागला तेव्हा कोणीतरी त्याच्या डोक्यावर ती दाणकन काहीतरी मारले होते त्याच्या नंतर त्याला काहीच आठवत नव्हते.

युसूफ दिलीप आणि आर्यनच्या तोंडावर ती स्प्रे मारून कोणीतरी त्यांना बेशुद्ध केले होते आणि चौघा जणांना जाम बदडून जिन्याखालच्या अडगळीच्या जागेमध्ये फेकून दिले होते.


कंप्लेंट करण्यासोबत ती त्यांच्याकडे काहीच नव्हते, आतापर्यंत शाहरुख आणि कंपनीने पिझ्झा फुकटच हादडला होता त्यामुळे आता त्यांना मुकाट्याने तोंड शिवून बसावे लागले होते. आर्यन च्या वाढदिवसाचा पार बेरंग झाला होता.

इकडे दुकानाच्या बंद दरवाजाआड पार्टिशन च्या मागे बसून मुलांनी हिशोब केला, आधीच्या चार पिझ्झा चे पैसे ज्यांनी ज्यांनी भरले होते त्यांना ते परत देण्यात आले आणि आजचे दोन हजार रुपये बक्षीस म्हणून पण ठेवून घेण्यात आले.

त्यांच्या लक्षात आलं की संकट काळात एकीने राहिलं तरच निभाव निघतो.

आर्यन आणि कंपनी च्या लक्षात आलं की ज्याचा आपण बळी घेतो तो कधीतरी येऊन कान पिळतो.


Rate this content
Log in