दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

भुख लघुकथा

भुख लघुकथा

1 min
172


चोर चोर...पकडा पकडा करत लोकं त्याच्या मागे पळत होते.कुणी हातात काठी घेतली होती तर कुणी दगड.एका सुशिक्षित दिसणाऱ्या बाईने त्याच्यावर पिशवी चोरण्याचा आळ लावला होता.


आजुबाजुला भाजीवाले कुजबुज करत होते.रोज इथे भर उन्हात रस्त्याच्या कडेला उभा असतो.येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना न्याहाळत असतो... अरे वेडा आहे तो वेडा.स्वत:शीच बडबडत करत असतो.आज चोरलीच ना त्या बाईची पिशवी..


पुढच्या निमुळत्या गल्लीतून लोकांनी त्याला पकडले.लाथा बुक्क्यांनी त्याला सर्वच खुप चोप देत होते. सर्वांना त्याच्या हातातील ती चोरीची वस्तू काढून घ्यायची होती. पण त्यानेही एवढा मार खाऊनही आपला एक हात पाठीमागे दाबुन ठेवला होता.

तोंडातुन,हाता पायातुन रक्त वाहेपर्यंत लोकं त्याला मारत होते. तो गयावया करत होता.

मी चोर नाही,मी चोरी केली नाही..पण लोकं त्याचं ऐकायला तयार नव्हते. आधीच जिर्ण झालेला त्याचा शर्ट लोकांनी ओढुन ताणुन पुर्ण फाडुन टाकला होता.

त्याला आपल्या हातातील वस्तू सोडायची नव्हती.पण लोकांच्या बळापुढे त्याचा जोर कमी पडला आणि तो ग्लानी येऊन पडला.. केव्हा पासून घट्ट आवळून धरलली त्याची मुठ उघडली..तर त्याच्या हातात ब्रेडचा तुकडा होता..


पोटाची भूक भागविण्यासाठी, एका छोट्याशा ब्रेडच्या तुकड्यापायी रस्त्यावर फीरणाऱ्या त्या वेड्याला स्वतः ला शहाण्या समजणाऱ्या लोकांनी मरेपर्यंत मारला होता..



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational