भिती की आनंद
भिती की आनंद
गेल्या काही दिवसांपासून मी खूप आनंदात होतो , कित्येक वर्षानंतर मला माझ्या घरातल्या लोकांसोबत घालवायला वेळ मिळत होता..कारण होते ते फक्त कोरोना विषाणूचे !!!
हे जरा ऐकायला विचित्र वाटेल पण सत्य आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल विचार करण्यात काय फायदा !!! शहरात सगळ सुख असते या लोकांच्या मानसिकतेला धक्का बसला!! इच्छा नसताना देखील भरपुर लोकांना आज गावाकडे जायला लागले.. unlock 1.0 जाहिर झाल्यानंतर बरेच लोक शहरात परत येत आहेत ते मनात कोरोना ची भिती बाळगून आणी काम केल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणूनच !!! पण याच सोबत प्रत्येकासोबत असतील ते घरातल्यांसोबत घालवलेले आनंदी क्षण, मित्रांसोबत च्या आठ्वणी आणी हेच असेल त्यांचे उर्जास्थान !!!!
शेवटी नशीबच असे म्हणून हताश मनाने काम करण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या आप्तस्वकीयांच्या आशीर्वादाने प्राप्त झालेल्या सकारात्मक दैवी वलयामधे काम केलेले कधीही चांगले !!! नाही का ??