Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

भावनांचा मेळावा

भावनांचा मेळावा

4 mins
301


    आज शनिवार नव्या उपक्रमाचा दिवस. दर शनीवारी एक नवीन उपक्रम घेऊन वर्गामध्ये जाते. तसेच आज दुपारी मधल्या सुट्टीनंतर वर्गात गेले आणि जरा मधल्या सुट्टी मधला मुलांचा झालेला गोंधळ निस्तरला. तुषार ,एक मुलगा त्यांने मुलींना मारलं. मुलींनी त्याला मारलं . या काही तक्रारी ऐकून घेतल्या मुलांना समज दिली, आणि प्रत्येक मुलाचा स्वभाव समजावून सांगितला. त्यांच्यामधल्या उणिवा काय आहेत, आणि चांगले काय आहे , हे समजावून सांगून कसे वागावे समजावले.हा एक माझा सुंदर उपक्रम झाला. या उपक्रमामध्ये मुलांचा स्वभाव पाहता प्रत्येक मुलगा मी कसा हे आपल्या बाई कशा काय सांगतात ?हे ऐकण्यासाठी आसुसलेला होता त्यांच्यातला बरोबर स्वभाव सांगितला , काही वाईट गुण सांगितले व चांगलेही गुण सांगितले. मुलं हेऽऽ करून ओरडत होती. मी म्हटलं ठीक आहे जरा गोंधळ होतोय पण मुलांना पटतंय त्यांच्या चुका समजावून घेत आहेत. त्यांच्यातला चांगुलपणा कोणता हे पण आज मुलांना कळत होतं. माझे बोलणे झाल्यानंतर वर्गातली एक मुलगी जवळ आली, म्हणाली" बाई मला पण माझा मन मोकळं करायचं ".मी तिला समोर बोलवलं आणि तिने तिचे मन मोकळं करायला सुरुवात केली. काल शाळेतून जाताना तिची मैत्रीण आणि ती दोघींमध्ये वाद झाला होता. आणि तिला त्याची खंत वाटत होती. काळजी वाटत होती कारण आज तिची मैत्रीण आली नव्हती शाळेमध्ये. तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. अरे आपला वाद झाला काल आपल्यामुळे भांडण झाली म्हणून आज आपली मैत्रीण आली नाही का शाळेमध्ये?ती खूप चिंतेत होती .आणि खूप भरभरून तिच्याविषयी बोलत होती. मैत्रिणीचं नाव होतं माधुरी जी बोलत होती ती केतकी .केतकीने माधुरीचे खूप छान वर्णन केलं .बाई माधुरी माझ्याजवळ रोज येते ,रोज छान एक गाणं मला म्हणून दाखवते. पण आज मी तिला मिस करते .काल शाळेतून जाताना जरा आमचं भांडण झालं मी पण बोलले ती पण मला बोलली. आमच्या दोघींमधलं बोलण्याचा घरी गेल्यानंतर मी जरा विचार केला आणि म्हटलं आपण खूप बोललो माधुरीला माधुरी पण आपल्याला बोलणारच. पण आज माधुरी आली नाही .तिला त्याचं खूप खूप वाईट होत, आणि तिचे खूप डोळे भरून आले "बाई ,तिने मला ब्लॉक केलं आम्ही दोन रोज फोनवर पण बोलायचं पण आज तिने मला ब्लॉक केलं मला खूप वाईट वाटतंय बाई प्लीज प्लीज प्लीज तिला बोलवा ना शाळेमध्ये तिच्या तिला आत्ता फोन करा ."अशी तिने मला खूप विनवणी केली, आणि खूप रडायला लागली तिला शांत केलं नंतर मग तिला म्हटलं तर तुला आणखी काय बोलायचं का?ती म्हटली हा अजून एक मैत्रीण आहे तिच्याबद्दल मला बोलायचं मग ती प्रिया नावाच्या मैत्रिणीबद्दल सांगितले प्रिया मी अभ्यास करताना काही अडचण आली तर मला ती लगेच समजावून सांगते इंग्लिश चे शब्द माझ्याकडून म्हणून घेते मला अभ्यासात पुढे जाण्यासाठी मदत करते आज तिच्यामुळे माझे अक्षर सुद्धा सुधारायला लागलेय. बाई असं खूप छान भरभरून ती बोलत होती ,आणि माधुरीला खूप मिस करत होती माधुरी आज आली नाही म्हणून तिची आठवण काढून परत रडायला लागली .असे हे भावनांचे धुके ,त्यांच्या मनातले मी बघत होते. याच मुली पुढे मोठ्या होणार आहेत आणि खूप छान एकमेकींना साथ देणार आहेत हे मी आता बघत होते या मुलींचे बघून आणखी एक मुलगी स्वरा खंदारे नावाची मुलगी म्हणाली "बाई, मलाही काहीतरी बोलायचं ती म्हणाली नुकतीच एक पंधरा दिवस झाले तिने ॲडमिशन घेवून . स्वरा समोर उभी राहिली अक्षरशः पाचव्या वाक्याला तिला हमसून हमसून रडायला आलं ति म्हणाली" बाई, मी या वर्गात आले तेव्हा माझी बेस्ट फ्रेंड कोणीही नव्हतं, फक्त तुम्ही माझ्याशी खूप छान बोलत होतात मुली बोलत होत्या पण मला खूप काही त्यांच्याजवळ जाता येत नव्हतं पण आज केतकी,प्रिया माधुरी ,रिद्धी ,सिद्धी अशा अनेक छान मैत्रिणी मला मिळाल्यात .मला काही झालं तर त्या रडतात. माझा आणि त्यांचं नातं खूप वेगळं झालंय. इतक्या या छोट्या मुली भरभरून बोलू शकतात हे आज मला खरंच हा उपक्रम घेतल्यामुळे जाणवलं. एक आशिता समोर आली तिनं आपल्या या वर्गामध्ये इयत्ता पहिली मध्ये असताना वैदही नावाची मुलगी किती छान सगळ्यांना जपत होती समजून घेत होती आणि ती मुलगी आज एक एप्रिल 2020 आली देवा घरी गेली हे सांगताना तिला खूप खूप रडायला आले. अशा प्रकारे हे भावभावनांचे धुके मी आज माझ्या वर्गात अनुभवत होते इयत्ता चौथीची ही मुलं पण खूप काही बोलून गेली अशा या मुलांचे भवितव्य खरच उज्वल आहे हे मी आज अनुभवत होते आणि म्हणून आज माझ्या या गोष्टीला किंवा या उपक्रमाला भावनांचा मेळावा हे नाव द्यावसं वाटलं विशेष म्हणजे हे सर्व वर्गातील सर्व मुलं खूप छान शांत बसून ऐकत होती आणि प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आलेले होते मुलींच्या डोळ्यातून टपाटपा अश्रू गळत होते हे बघून खरंच मी आज मला धन्य धन्य मानते की आज मी ही पिढी भावनिकदृष्ट्या खरंच छान घडवली याचा मला अभिमान वाटतो .हे सर्व पाहताना माझ्याही डोळ्यातून आश्रू गालावर कधी आले हे समजलेच नाही.माझे आश्रू पाहून सर्व मुली माझ्याकडे आल्या माझ्या गळ्यात पडल्या.मी ही मुलींना जवळ घेतले.

  हे पाहून मुलं म्हणाली बाई आम्ही काय केलय हो.मग मुलांनाही जवळ घेतलं.

  असे भावनांचे नाजूक जाळे विणण्यात आज मी यशस्वी झाले होते.


Rate this content
Log in