Achala Dharap

Inspirational

3  

Achala Dharap

Inspirational

भाग आठवा

भाग आठवा

2 mins
217


स्पर्श


   भाग ८


   आजी गेल्यावर अनन्याला चैन पडत नव्हतं. आजीची आठवण आली की आजीचा फोटो काढून बघायची. अबोलीला पण सासुबाईंची आठवण यायची .त्यांचा आधार होता तिला. अनन्याच्या दत्तक घेण्यापासुन ते तिला इतक मोठं करे पर्यंत प्रत्येक गोष्टीत सासुबाईंनी तिला मुलीसारखी साथ दिली होती.

   अनन्या वर्गात सगळ्या मुलींशी मिळुन मिसळून वागायची. ती वर्गाची माॅनेटर होती. सगळ्या गोष्टीत तिचा सहभाग असायचा . त्यामुळेच ती सगळ्या शिक्षकांची लाडकी होती.

   अनन्या नववीत असताना पालकांची मिटिंग होती. दहावीच्या दृष्टिने तयारी या संदर्भात चर्चा करण्यासाठी. वर्गातील पायल सोडून सगळ्यांचे पालक या मिटिंगला आले होते. नंतर परत एकदा नववीच्या परीक्षेच्या आधी मिटिंग होती. तेव्हासुध्दा पायलचे पालक मिटिंगला आले नव्हते. मग क्लास टीचर पायलला वर्गात खूप बडबडल्या. तिला रडू आले. टीचरनी पायलला सांगितल की तुझे पालक आले नाही तर परीक्षेला बसून देणार नाही.पायल खूप रडत होती. तिनी अनन्याला सांगितल, 'अनन्या , शाळा सुटल्यावर जरा वेळ थांबशील का? मला तुझ्याशी बोलायचय. पण एकटीच ये. बरोबर कोणाला आणू नको.'

अनन्याने कबूल केलं. शाळा सुटल्यानंतर अनन्याने तिच्या मैत्रीणीला आसावरीला जायला सांगितल आणि ती पायल थांबली होती तिथे गेली.

   पायल म्हणाली ,'अनन्या , माझे पालक आले नाहीत म्हणून मला टीचर बडबडल्या. आज पर्यंत मी कोणाला सांगितल नव्हतं. अग माझी आई वेश्याव्यवसाय करते. माझे बाबा कोण माहित नाहित. आईसारखी वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून तिने एक खोली घेतलेय. तिथे मी राहते. आई जाताना बाहेरन कुलूप लावून जाते. ती शिकलेली नाही. ती असा व्यवसाय करते म्हणून ती शाळेत येत नाही. हे टीचरना कस सांगू ग? मला शाळेतन काढून टाकणार नाहित ना? मला खूप भीती वाटते.आमच्याकडे जास्त पैसे नसल्याने १२ वी पर्यंत तरी माझ शिक्षण होईल की नाही हे माहीत नाही. त्यात टीचर आत्ताच बडबडल्या. तू टीचरना हे सांगशील का? '

अनन्याला ऐकून वाईट वाटल. ती पायलच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाली ,' काळजी करु नको. मी सांगिन टीचरना. त्या तुला परवानगी देतील.' 

पायलला दिलासा देवून अनन्या घरी निघाली. पण तिच्या डोक्यातून पायलचा विचार जात नव्हता. घरी आल्यावर तिने आईला सगळा प्रकार सांगितला. मग बाबा आल्यावर बाबांना पण सांगितल आणि बाबांना म्हणाली ,' बाबा , पायलच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही कराल का? तिला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. '

तिचे हे विचार ऐकून अनिकेतला आश्चर्य वाटलं. त्याने अनन्याला कबूल केलं की तो पायलच्या शिक्षणाचा खर्च करेल. तिला आनंद झाला.

  दुस-या दिवशी अनन्या पायल बरोबर टीचर कडे गेली. त्यांना पायलचा प्राॅब्लेम कळला. त्या पायलला म्हणाल्या,'तू चांगला अभ्यास करून यशस्वी हो.'

पायलच आता टेन्शन कमी झालं.

   शाळा सुटल्यावर आसावरी अनन्या सोबत आली. अनन्याने पायलचा प्राॅब्लेम तिला सांगितला. अनन्या म्हणाली ,' आपण किती नशिबवान आहोत ना आपले आईवडील आपल्यावर किती प्रेम करतात. लाड करतात. बिचारी पायल!'

   त्यावर आसावरी म्हणाली,' मला पण तुझ्या आईबाबां बद्दल माहितेय.'

 'माझ्या आई बाबां बद्द्ल!'


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational