Jyoti gosavi

Classics Others

4.0  

Jyoti gosavi

Classics Others

बारा कोस सासर

बारा कोस सासर

1 min
220


बारा कोस सासर

तर आधीच भोकाड पसर


ही एक पारंपारिक ग्रामीण म्हण आहे. या म्हणीचा आपण शब्दशः अर्थ घेतला तर !त्या काळामध्ये मुलींचे विवाह आजूबाजूच्या पंचक्रोशीच मध्येच होत असत. 

पंचक्रोशी म्हणजे साधारण आजूबाजूची पाच दहा गावे किंवा दहा-बारा कोसावरतीच मुली दिल्या जात असत. 

बारा बारा कोसावर सासर तर आधीच भोकाड पसर! म्हणजे सासरी जायचं म्हटलं की या मुलीने रडायला सुरुवात केली. 

पूर्वी या सासरी जाणाऱ्या मुली देखील लहान होत्या, परकरी होत्या ,त्यामुळे माहेरी भातुकली किंवा इतर खेळ सोडून अचानक सासरी जायचं, परकर ऐवजी साडीचा भोंगा नेसायचा, त्यात अडकायचं पडायचं शिवाय सासरच्या सगळ्यांची बोलणी खायची. प्रसंगी मारही खायचा, 

मरे मरे तो काम करायचं, अशी सारी परिस्थिती होती. त्यामुळे सासरी जायचं नाव जरी काढलं तरी, मुली रडायच्या. 

माझ्या लहानपणी पण कित्येक साधारण 18 ते 22 वयोगटातल्या मुली देखील सासरी जाताना ढसाढसा रडलेल्या मी बघितलेल्या आहेत. 

आता याचा व्यवहारिक अर्थ असा की एखादी घटना घडायच्या आधीच, त्याच्यावरती रडायला, आरडाओरडा करायला, टीका टिप्पणी,,करायला सुरुवात करायची .

अजून त्या गोष्टीला वेळ आहे पण त्याच्या परिणामाची आधीच चिंता करायची. 

दरवेळी काही तसंच घडेल असं नसतं .

पण सवयीचा परिणाम! म्हणून म्हटल आहे 

"बारा कोस सासर तर

 आधीच भोकाड पसर"


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics