Rajshri Zande

Others

4  

Rajshri Zande

Others

बाळ ​यशवंत

बाळ ​यशवंत

4 mins
342


रात्र काळी कभिन्न झाली होती, मध्यरात्री रातकिड्यांचा मध्येच किर किर्र ... आवाज येत होता . सुन्न अशा रात्री च्या वेळी झोपडीचे दार थोडे उघडे होते जसे पुढे ढकललेले...आणि मग कोण बर जागे होते इतक्या रात्री ? ते सुमन व पांडुरंग त्यांच्या पडक्या झोपडीत बोलत बसलेले होते . लग्नाला खुप वर्ष झाले परंतु त्यांना मूल - बाळ झाले नव्हते त्या चिंतेत सुमनला झोप लागत नव्हती . सुमन तिचा पती पांडुरंगाशी बोलत होती . आपल्याला कधी मूल - बाळ होईल ? तेव्हा पांडुरंग बोलतो तो सगळ्यांचे ऐकतो आपल्याला पण देईन मूल या चिंतेत कित्येक दिवस गेले . एक दिवस असा येतो ती खुश होऊन धनीस ( पतीस ) बोलते आपल्याला बाळ होणार , सुमन काय बोलतेस ! आपल्या वेलीला फूल येणारं या खुशीमध्ये पांडुरंगाची खुशी गगनाला भिडत होती . तो या खुशीत होता कि देवाने माझे ऐकले सुमन आई व मी बाबा होणारं नऊ महिने उलटले सुमनला गोंडस मुलगा झाला व मुलाचे नाव त्यांनी " यशवंत " ठेवले . यशवंतचा लाड न करता शिक्षण देऊन मोठा साहेब करायची दोघांची इच्छा होती. गावच्या प्राथमिक शाळेत नाव दाखल केले मुलगा शिकून मोठा होईल ह्या स्वप्नाला साकार होण्याच्या खुणा दिसत होत्या . मुलाचे प्राथमिक शिक्षण पुर्ण झाले होते . गावात शिक्षण फक्त इ .७ वी पर्यंतच होते . 


        आता तालुक्याला जाऊन नाव दाखल करण्याकरीता पांडुरंगने सकाळीच उठून न्याहारी केली . यशवंतला घेवून तालुक्याच्या प्रवासास निघाला . शिक्षणाची उत्तम सोय कुठे होईल म्हणून इकडे तिकडे शाळा हुडकू लागला . एक वस्तीगृह त्यात शाळा म्हणजे वस्तीगृहात राहुन शिकण्याची व्यवस्था बघून पांडुरंग खुश झाला होता . हे सर्व कधी सुमनला सांगेन असे होत होते . त्या आनंदातच तो राहत्या गावी कधी पोहचला तो प्रवास त्याला समजलाच नाही सुमनला सर्व वृत्त सांगितले म्हणून ती पण खुप खुश झाली होती. बस्स - - आता खुप कष्ट करायचे आणि मुलाला मोठासाहेब बनवायचे या मध्येच प्रत्येक दिवस कष्टात दोघेजण घालवत होते . 


प्रत्येक महिना मनीऑर्डर पोस्टाने न चुकता जात होती . एखादी मनीऑर्डर ही कधी चुकली नाही. ३ वर्ष उलटली सुमन म्हणाली धनी ! मुलाला भेटून या यशवंत आता एस . एस . सी. ला गेला असेल , होय सुमन आज उदया जाईल असे मत माझे पण चालु आहे . आज जाऊन येतो आणि पहाटेच्या सुमारास पांडुरंग प्रवासास निघाला आणि तो तालुक्याला पोहचला. स्टेशनला उतरून तो रस्त्याने जात असताना लोकांची गर्दी भरपूर होती एवढी गर्दी कसली बरे .... म्हणून तो गर्दीत गेला, लोकं कुजबुजत होता एक अपघात झाला होता, १६ वर्षांचा मुलगा गाडी खाली आला त्याला रस्त्याच्या त्या बाजुला जायचे होते . परंतु रस्ता ओलांडताना गाडी खाली आला पालथे शरीर असल्यामुळे कोणी ओळखू शकत नव्हते . एवढ्या शहराच्या ठिकाणी गर्दीत कुणाला वेळ आहे कुणाचे काय झाले बघायला . पांडुरंग म्हणाला शरीर तरी बाजुला ठेवा उचलून , येईन कोणीतरी ओळखेल ओळख पटली तर त्याच्या घरच्या पर्यंत निरोप तरी जाईल .


परंतु हे सगळे शक्य नव्हते. कोण करेन. पांडुरंग तर म्हातारा असल्यामुळे एकट्याने ते शक्य नव्हते . मग कोणी करायचे हे रस्त्याच्या कड्याला असा अधून मधून आवाज येत होता . म्युनिसिपालिटी वाले (सरकारी माणसं ) करतील बाजुला आपले काय जाते त्यात असे काही बोलत होते आणि पांडुरंग पण जायला निघाला वस्तीगृहाकडे . तिथं पोहचल्यानंतर मित्रांना विचारणा केली तेव्हा मित्र म्हणाले यशवंत पोस्टात पत्र आले म्हणून टपालात गेला आहे . दोन दिवस पोस्टमन नव्हता म्हणुन पत्र आले होते पण कळाले नाही . सकाळी पोस्टमनने सांगितले कि , पत्र आले आणि तो पत्र आणायला गेला , तुम्ही बसा खोलीत मी त्याला बोलावून आणतो . हो म्हणून पांडुरंग आत बसून पुस्तकांची खोली बघत होता . अंथरुण , मुलाचा जेवणाचा डबा , कपडे इ . सगळे खोलीत बसून पांडुरंग बघत होता .


आता थोड्या दिवसाने मुलाला नोकरी लागेल आणि मोठ्ठा साहेब होईल या तंद्रित असताना मुलाचा मित्र तिथे आला आणि यशवंतच्या वडीलांना बघत व शांत होऊन म्हणाला , तुमचा यशवंत रुसला आहे ,तुमच्यावर नाराज झालेला आहे . तुमच्या सोबत यायचे नाही वाटत त्याला.... मित्राच्या डोळ्यात अश्रुंचा धारा येतात तेवढ्यात पांडुरंग बोलतो चला बाळांनो मी त्याची समजुत काढतो आणि मित्रा बरोबर यशवंत कडे बाप लेकाच्या भेटीसाठी निघतो ... काय तर ...यशवंत तिथे नसतो त्याला नेलेले असते ती जागा पांडुरंग ओळखतो तिथे एकच आवाज येत होता मुलाला कोणीच नव्हते . सकाळ पासून शरीर पडलेले होते . ओळख पटली नाही, अनोळखी मृतदेह म्हणुन म्युनिसिपालीटी वाले ( सरकारी माणसे ) घेऊन गेले. जास्त वेळ देता येत नाही म्हणून शरीर ताब्यात करून घेतले होते आता पांडुरंग सुन्न झाला ... काहीच बोलत नव्हता पाऊल कुठे वळवावा काहीच कळत नव्हते सुमनला काय उत्तर देऊ.. ? त्याच्या मित्रांना कसे सांगू? माझ्या मुलाचे मृत असलेले शरीर जणु माझ्याशी बोलत होते जा .... माघारी इथुनच माझी भेट शेवटची आहे ... बाळ ... यशवंत.. , यशवंत असा उसासा घेऊन हंबरडा गिळत पांडुरंग कुणाला काही न बोलता निघाला गावाच्या वाटेकडे. इथे आपले काहीच नाही मुलगाच नाही तर कुणाला विचारु मी माझे बाळ कुठं आहे . तो शहरात आला व इथेच राहिला . आई-बापाला विसरला शहरानं माझा पोरगा हिसकावला माझ्या कडून . 


 पांडुरंग गावी पोहचला आणि सुमन दारातच वाट बघत होती इतकी रात कशी झाली यायला म्हणून विचारत होती व सुमन् धन्यास म्हणाली धनी इतका उशीर का हो झाला . अग सुमन उशीर.. उशीर होताच आपल्या नशीबात तीच् काळोखी रात्र, ,झोपडीचे पुढे ढकललेले दार परंतु दिवा नव्हता त्या झोपडीत. वाऱ्याने दिवा विझला होता .तेवढयात सुमन बोलते धनी ... काही आठवले का हो तुम्हाला तेव्हा पांडुरंग बोलतो , "हो सुमन त्या वेळी देवानं आपल्याला बाळं दिलं आणि आज नेले." ह्या म्हाताऱ्या वयांत .आणि सुमनने व पांडुरंगाने जिवाच्या आकांताने हंबरडा फोडला, बाळ ....बाळ .... यशवंत . 


Rate this content
Log in

More marathi story from Rajshri Zande