Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

असंस्कारी सून

असंस्कारी सून

3 mins
604


एक जागृत शेतकरी परिवारात दोन भाऊ होते. ते आपाल्या गांवातील शाळेत न चुकता जात होते. त्या शाळेतील शिक्षकांना त्या मुलांन विषयी प्रेम आणि आदर पण होता. मुले शिक्षणात फार हुशार आणी होतकरु होती. त्यांना खेळण्यात पन निपुनता लाभली होती. वाचन हा त्यांचा छंद होता.गावांतील वातावरण हे चांगल्या हुषार होतकरु मुलांन साठी फार जास्त पोषक नव्हते. त्या गांवात फ्क्त निम्म माध्यमिक पर्यंतच शिक्षणाची सोय होती. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या आई-वडिलांना मार्गदर्शन केले होते. त्यांना मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मुलांना शहरात ठेवने अत्यंत जरुरी असल्यांचे सांगितले होते.तशि त्यांनी त्यांना तनमयतेने विनंती पण केली होती. गांवातील शिक्षक हे गावक-यासाठी त्यांचे शुभचिंतक आणि मार्गदर्शक समजले जात होते. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शना वर मुलांच्या आई-वडिलांनी निर्णय घेतला होता. त्यांनी तसा मुलांचा दाखला शहरातील नामांकित शाळेत केला होता. मुले होतकरु,जवाबदार ,संवेदनशिल आणी शालिन असल्यामुळे त्यांनी शिक्षणात चांगलीच प्रगती केली होती.त्यांचा मोठा मुलगा सॉफ्ट वेअर इंजिनिअर झाला होता. लहान भावाने पण मोठ्या भावाच्या पावला वर पाऊल ठेवुन अ‍ॅलोपॅथिक डॉकटर झाला होता. मोठ्या मुलगा भारतीय राष्ट्रिय बैंकेत अधिकारी म्हणुन कार्यरत होता. तर लहान मुलगा शासकिय दवाखाण्यात डॉक्टरी पेशा करित होता.

        मुलांच्या कर्तृवामुळे आई-वडिलांची प्रतिष्ठा गावांत आणी नाते-वाईकात तसेच समाजात उंचावली होती.त्यांनी जी हिम्मत दाखवली होती त्याचे दोन्ही मुलांनी सोन करुन दाखवले होते. त्यांची गुंतवणुक सतकर्मि लागली होती. बरेच वेळा दैव देते पण कर्म नेते अशी वेळ मुलांनी त्यांच्या वर येवु दिली नाही. सगळं काही आई-वडिलांच्या मनासारखं होत गेले होते. आता मुलांचे हात पिळवे झाले की आपल्या जीवनाचे सार्थक होईल असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी मोठ्या मुलाच्या लग्नासाठी हाल-चाली सुरु केल्या होत्या. पण दुर-दैवाने कोराना महामहारी मुळे केलेल्या हाल-चाली आपो-आपच मंदावल्या होत्या. दुष्काळात जुन तेरावा महिनाच आला होता. आधीच मुलाचे वय झाले होते. आणी ही माहामारी किती काळ चालेल याचे भाकित कोणी करु शकत नव्हते. योगा-योगाने त्यांच्या कडे एका सुंदर ,शिक्षित व सरकारी नौकरी असलेल्या मुलीचे स्थळ चालुन आले होते. वरचे –वर बघता सर्व काही ठिक-ठाक दिसत होते. कोरोना महामारीच्या भितिमुळे त्यांनी त्या परिवाराची विशेष चौकशी केली नाही. सरकारी नियमा प्रमाने अत्यंत ठराविक वराड्यांच्या उपस्थितित लग्न सोहळा पार पाडला होता.सर्वजन आनंदित होते.

      नव-या मुलगा तीला हनीमून साठी कश्मिरला घेवुन गेला होता. पण तीथे सारखे एकाच व्यक्तिचे फोन येत होते. त्याच्या हनीमूनला जनु नकटीच्या लग्नला सारखे सतराशे साठ विघ्न लागले होते.ती त्या फोन वर सारखे एकट्यात जावुन बोलत होती. हनीमूनचे वारे-नारे झाले होते. तीला जेव्हा खोदुन –खोदुन पती ने विचारले होते. तेव्हा तीने तो तीचा बॉयफ्रेंड आहे असे सांगितले होते. चांगल्या गंभिर, सभ्य, सहिष्णु व संवेदनशिल पतीने प्रमाने त्याने तीला सांगितले आता आपले लग्न झाले आहे. आपला संसार सुरु झाला आहे. तु त्याला आता विसरुन जा. आणी संबंध ठेवु नको. आपण आपला संसार थाटाने थाटु !.

       जीत्याची खोड मेल्या शिवाय जात नाही,त्याच्या पत्नि मधे किंचितही फरक पडला नव्हता. उलट तीच्या गतिविधि मधे अधिक गतिशिलता आली होती. तीने घरातील मंडळीला धारे वर धरले होते. प्रयत्नांती परमेश्र्वर. पण इथे सर्वांनी तीच्या समोर घुटने टेकले होते. शेवटी ती एक दिवस सर्व सोन-नाण,व रोख रक्कम घेवुन आपल्या वडिलांच्या घरी निघुन गेली होती. सासरचे लोक तीच्या सोबत सवतेला व्यवहार आणी तीला खावु –पिवु घालत नाही असे आरोप तीने सासरच्या लोकांन वर जडले होते.नंतर जवळच्या नातेवाईकांनी सांगितले की ते संपूर्ण घर फार पैशाचे लोभी होते. तुम्ही संबंध जोडुन फसल्या गेले आहेत. यातुन तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. ढवळ्याच्या शेजारी पबळ्या बांधला होता, पण त्याने गुना सोबत रंग पण घेतला होता. जेव्हा मुला कडिल काही जेष्ठ नातेवाईक मुलीच्या वडिलांन कडे गेले होते. त्यांचा प्रतिसाद जुळवा-जुळव करण्याचा दिसला नव्हता. शेवटी गोष्ट घटस्फोटा वर आली होती. आलीया भोगाशी असावे सादर. दोन्ही पक्ष घटस्फोटा घेण्यासाठी तैयार झाले होते. पण वधु पक्षाची सात लाखाची लग्न खर्चाची क्षतीपूर्ती म्हणुन मागणी होती.ती मान्य केल्या वरच घटस्फोटाची तैयारी दर्शवली होती. 

        अडला नारायण गाढवाचे पाय धरी. जरी वधु पक्ष अति करित होत.तरि वर पक्षाने त्यांची अट मान्य केली होती.अति तिथे माती होते. त्यामुळे पैसे देवुन व घटस्फोटाच्या कागदावर सही करुन घटस्फोट घेण्याची मार्ग मोकळा करण्यात आला होता. घटस्फोटा मिळाल्या वर कां तिचा प्रियकर अंतरजातीय विवाहा करनार काय ?.आपल्या मुलीचा त्या मुलाशी प्रेम संबंध आहे, हे माहित असतांना नुसते पैसे उकळन्यासाठी चांगल्या होतकरु मुलाचे जीवन विसकळित करण्यात तुम्हाला काय गवसले होते?. समजा तीच्या प्रियकराने तीचा हात थांबण्यास नकार दिला तर समोर त्या मुलिचे भविष्य काय होणार !.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy