Author Sangieta Devkar

Abstract Drama Romance

3  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Romance

अश्रूंची झाली फुले (भाग 3)

अश्रूंची झाली फुले (भाग 3)

2 mins
160


आई बाबा समोर आता बत्तीस वय झालेल्या अवंती साठी स्थळ शोधणे महा कठीण काम होते.


अवंती लग्नाला तयार झाली हेच त्यांच्या साठी आनंदाचे क्षण होते .आई बाबा नी मग अवंती चे नाव एका विवाह मंडळात नोंदवले.

चारू ही खुश होती , तिने समीर ला सांगितले की लवकरच ती त्यांच्या बद्दल घरी बोलणार आहे.

अवंती ला एक स्थळ आले पण मुलाचा घटस्फोट झाला होता.आता अवंती चे वय बघता तिला अशीच स्थळ येणार होती.अवंती म्हणाली,मला मान्य आहे हे स्थळ .

मग ठरल्या प्रमाणे मुला कड चे अवंती ला बघायला आले.अवंती नाष्टा घेवून बाहेर आली.पाहते तर तिच्या समोर निषाद बसला होता. क्षभरासाठी तिला काही समजेना.आज सहा वर्षांनी ती त्याला बघत होती.तिच्या नजरेत त्याच्या बद्दल तिरस्कार दिसत होता.निषाद काहीच बोलला नाही.अवंती नाष्टा तिथे ठेवून आत निघून गेली.

निषाद निघून गेला.बाबांनी अवंती ला सांगितले की मुलाला तुला एकदा भेटायचे आहे,तू भेटून घे.

अवंती ला निषाद ला भेटायची इच्छा नव्हती पण इतके दिवस मनात असणारा प्रश्न त्याला तिला विचारायचा होता.तो असा अचानक का निघून गेला आणि गायब झाला याचे कारण तिला हवे होते.

अवंती आय एम रियली सॉरी.सगळ काही अचानक घडले ग.मला तुला भेटून काही सांगता ही आले नाही.निषाद अवंती ला भेटायला आला होता.

निषाद तुला माझ्याशी लग्न नव्हते करायचे तर तसे सांगायचे होते,मी तुला फोर्स केला नसता.मी तुझ्या आठवणीत एकटी राहीले ,तू मात्र लग्न करून मोकळा झालास.

अवंती माझं ऐकून तरी घे.मला बाबांचा कॉल आला होता,माझा मोठा भाऊ अपघातात अचानक गेला.भावाचे लग्न होऊन फक्त सहा महिने झाले होते.मला घरच्यांनी खूप दबाव टाकला आणि भावाच्या बायको शी माझे लग्न लावून दिले.मी आपल्या बद्दल घरी सांगितले पण आई ने तिच्या जीवाचे बरे वाईट करून घेईन अशी धमकी दिली.म्हणून मग तुझ्याशी कसलाच कॉन्टॅक्ट मी ठेवला नाही अवंती मना विरूध्द त्या लग्नात माझी घुसमट होत होती.मला आणि वहिनी ला हे लग्न मान्य नव्हते पण आई बाबांनी आमचे ऐकले नाही.लग्न लावून दिले पण दोघांची ही कुचंबना होत होती.आठ महिने कसे बसे काढले मग मात्र मी स्पष्ट घरी सांगितले की हे लग्न मला नको आहे.मी ते निभवू शकणार नाही.मग माझा घटस्फोट झाला.तुला आठवतो आपला मित्र राजेश..त्याला माहित होते की तुझे लग्न नाही झाले,म्हणून मग त्याने तुझा फोटो आमच्या घरी दाखवला.तुझ्या स्थळा बद्दल सांगितले,म्हणून मग मी इथे तुला पाहायला आलो.अवंती आज ही माझं तुझ्या वरच प्रेम आहे,तू माझं पहिलं प्रेम आहेस.तुला जितका त्रास झाला ना तितका मला पण झाला आहे.प्लीज मला माफ कर.अवंती चे डोळे भरून आले होते.निषाद ने आपल्या हाताने तिचे अश्रू पुसले.

अवंती ने त्याला मिठी मारली,निषाद आय लव यू.

लव यू टू अवंती.दोघे पुन्हा एकदा एक झाले होते. पहिलं प्रेम जिंकल होत.अश्रूंची आता फुले झाली होती.


समाप्त # पहिले प्रेम 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract