Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

अश्रूंची झाली फुले (भाग ,२)

अश्रूंची झाली फुले (भाग ,२)

2 mins
229


चारू मी आई बाबांशी बोलते उद्या ओके झोप आता.

अवंती ने ही डोळे बंद केले पण नजरें समोर निषाद च दिसु लागला.तीच पहिलं प्रेम.तीच जग.


कॉलेज मध्ये असताना निषाद अवंती ला भेटला.मग दोघां मध्ये मैत्री झाली हळूहळू दोघे एकमेकात गुंतत गेले.खूप प्रेम होत त्याच एकमेकावर.कॉलेजची तीन वर्ष त्यानंतर पोस्ट ग्राज्यूयेशन ची दोन वर्ष ते एकत्र होते.कॉलेज च्या शेवटच्या वर्षी निषाद गावी अचानक गेला त्यांनतर त्याने अवंती शी कसलाच संपर्क ठेवला नाही.अवंती त्याच्या आठवणीत झुरत राहिली.त्याचा फोन नंबर ही चेंज झाला होता.काहीच न सांगत हा असा का गेला? मला दिलेल्या वचनाचं काय? प्रेम खोटं होत का त्याचं माझ्यावर? नको होते मी त्याला मग तसे स्पष्ट का नाही त्याने सांगितले? असे खूप सारे प्रश्न अवंती च्या मनात होते ते कायम मनातच राहिले.अवंती चांगल्या मार्काने पास झाली.एके ठिकाणी नोकरी ही करू लागली.योग्य वयात आई बाबांनी तिच्या साठी स्थळ शोधायला सुरुवात केली तेव्हा अवंती म्हणाली,की मला लग्न नाही करायचे. माझं प्रेम होत निषाद वर,मी त्याला विसरू नाही शकत.आई ने लहान बहीन चारू ने तिला खूप समजावले पण अवंती ने त्यांचे काही ही ऐकले नाही.गेली सहा वर्ष ती आपल्या भूतकाळा सोबत जगत होती.चारू चे ही लग्नाचे वय झाले होते.तिचा बॉयफ्रेंड समीर तिच्या मागे लागला होता की आपल्या बद्दल घरी सांग आणि लवकर काय ते ठरव लग्नाचे.पण आपल्या समाजात जोवर मोठ्या मुलीचे लग्न नाही होत तोवर लहान बहिणी चे लग्न करत नाहीत.अवंती मुळे चारू ची अडचण झाली होती.


अवंती नेहमी प्रमाणे ऑफिस ला आली.तिची कलिग मीनल सगळ्यांना पेढे वाटत होती.अवंती ला ही पेढा देत मीनल म्हणाली,माझं लग्न ठरले ना म्हणून हे पेढे.अवंती ला खूप काहीतरी तुटल्या सारखं फिल झाले,तिच्या वयाच्या मुली लग्न करून आनंदात राहत होत्या आणि ती आपला हट्ट कायम धरून राहिली होती.यात चारू चा काय दोष? तिला तिच्या मना प्रमाणे जगण्याचा अधिकार आहे,माझ्या मुळे तिच्या स्वप्नां वर का पाणी फेरत आहे.अवंती ने दिवसभर खूप विचार केला.मग तिने एक निर्णय घेतला.

संध्याकाळी ती घरी आली. आईला म्हणाली,आई मी लग्नाला तयार आहे,तुम्ही माझ्या साठी स्थळ शोधायला चालू करा.हे ऐकून चारू खूप खुश झाली.

आई बाबा समोर आता बत्तीस वय झालेल्या अवंती साठी स्थळ शोधणे महा कठीण काम होते.


क्रमशः.# पहिले प्रेम


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract