अपूर्ण विवाह
अपूर्ण विवाह
*****************************************
जवळपास सगळ्यांच्या आयुष्यात किंवा आजूबाजूला बऱ्याच असे घटना घडतात. की ज्यापहून मन निराश होऊन जाते. अशीच एक कथा आहे ही भूमीची.
भूमी ही BA झालेली मुलगी. तीच्या घराची परिस्थिती जेमतेमच होती. पण लाडात वाढलेली असल्यामुळे थोडी हट्टीच. BA नंतर तिला जॉब करायचा होता. आणि तिने एका प्रायव्हेट इजेन्सी मध्ये मुलाखत ही दिली आणि सुदैवाने तिची नेमणूक ही झाली. त्यामुळे ती आणि घरचेही खूप खुश होते.
भूमी रोज ऑफीसला janya- येण्यासाठी बसने प्रवास करत होती. रोज जाणे आणि येणे असल्यामुळे बस मध्ये बरेच प्रवाशी नियमित प्रवास करणारे होते. त्यामध्ये एक कृष्णा नावाचा तरुणही अपडावून करत होता. त्याची आणि भूमीची चांगली मैत्री जमली होती. त्यांच्याकडेही चांगली जॉब होती. याशिवाय दोघांच्या आवडीनिवडी,सवयी मध्येही बरेचशे साम्य होते. रोज चॅटिंग, कॉलिंग, मीटिंग सगळ सुरू झालं. हळूहळू दोघेही एकमेकांना सर्व सांगत होते. एक दिवस कृष्णा ने भूमीला प्रपोज केले. तिला होकार द्यायचा होता.
जेव्हा कृष्णाने तिला प्रपोज केले त्यावेळी तिला ही होकार द्यायचा होता,पण घराच्यांशिवय होकार देणे तिला जमले नाही. तिला शिकवण च तशी होती. त्यामुळे तिने सरळ सांगितले त्याला आधी तुझ्या घरच्यांना माझ्या घरी नियमानुसार मागणी घालावी लागेल. घरून होकार आल्याशिवाय आपल लग्न होणे शक्य नाही. यापुढे तो बीचाराही काय बोलणार😌
त्याप्रमाणे कृष्णाने आधी त्याच्या घरी कल्पना देऊन त्यांना भूमी बद्दल सांगितले. ते ज्यावेळी तयार झाले त्यांनी भूमीच्या घरी निरोप पाठविला. त्यानुसार पाहणीचा कार्यक्रम वगैरे पार पडला. लग्नाची तारीख, बस्ता,वगैरे ठरलं. लग्न ठरल्यामुळे सगळे वातावरण आनंदी होते🥰🥰
तोपर्यंत शॉपिंग,इतर लग्नाची तयारी सुरू झाली. लग्न जवळ काढल्यामुळे सगळी धावपळ सुरु होती..... सगळी कामाची गडबड.... सगळे आपापल्या कामात व्यस्त होते.. दोघांची शब्दांची देवाणघेवाण सुरू होतीच शिवाय काय काम पार पडले आणि काय करायची आहेत याशिवाय भावी आयुष्यात काय करायचे असे बरेच स्वप्न ही रंगत 😍होती ऑनलाईन चॅटिंग वर.
तो दिवस उजाडला ज्या दिवसाची वाट कृष्णा आणि भूमीला होती. लग्न वधू पक्षाकडे म्हणजे भूमिकेकडे च लागणार होते. सगळे घर गजबलेल होत. फुलांनी सजवलेल्या, रांगोळ्या काढून नवरदेव साठी हातात स्वागत करायला नवरीच्या मैत्रिणी सजवलेलं ताट घेऊन उभ्या होत्या मंडपाच्या गेट वर......
नवरदेव वाजत गाजत आला घोडिवर बसून🐎🐎 अर्थात प्रथेप्रमाणे नवरदेव आधी मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येणार होता.तिथे दोघींनी जाऊन त्यांचे स्वागत केले, नंतर नवरदेव निघाले मंडपाकडे🧨🧨 फटाक्यांचा आवाज आणि वाजत गाजत नाच नारे मित्र घेऊन.
इकडे नवं वधू ही पारंपरिक लूक मध्ये तयार होती. जांभळ्या रंगाची पैठणी त्यावर हिरवा चुडा, हातभार मेहंदी,अगदी मराठमोळी नवरी जिला पाहून कोणाचेही मन आकर्षित व्हावे आ सुंददिसत होती आज भूमी. लग्नमंडपात लग्न लागायला सुरवात झाली.
इकडे आई वडिलांचे मन थारत नव्हते एवढ्या गर्दीत ते एकाकी झाल्यासारखे वाटत होते त्यांची मुलगी आज त्यांना सोडून परक्या घरी जाणार होती. याचा त्यांना त्रास ही होत होता आणि सगळ तिच्या इच्छेनुसार झालं याचा आनंद ही होता.पूर्ण दिव
स लग्नाच्या तयारीत आणि बिदाईत निघून गेला.संध्याकाळी वरपक्षाकडे वधूचे थाटात स्वागत झाले. खेळ वगैरे सगळ आटोपून दोघांना रिलॅक्स व्हायला वेळ मिळाला. दुसऱ्या दिवशी वरात पंगत झाली आणि भूमी संध्याकाळी परंपरेनुसार माहेरी त्याच पाहुण्यासोबत परत आली.
सगळे लग्न व्यवस्थित पार पडले. तिसऱ्या दिवशी कृष्णा भूमीला घ्यायला आला. इथे पाहुणचार आणि सत्यनारायणाची पूजा ठेवली होती पूजा आटपून,जेवण करून सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊन दोघे निघाले. भूमी सासरी पोहली तर तिथेही पूजा वगैरे झाली. दुसऱ्या दिवशी कुलदेवतच्या दर्शन घेण्याकरता दोघांना रवाना केल्या गेले.
सगळे व्यवस्थित पार पडले त्यामुळे आता सगळे रिलॅक्स होते. हळूहळू इकडे भूमी आणि कृष्णाचा संसार सुखाने सुरू होता. कृष्णा ल दोन बहिणी एकीने पळून जाऊन प्रेमविवाह केला आणि दुसरी कृष्णपेक्षा लहान होती. तीही प्रेमविवाह करणार होती. भूमीच्या सासूबाई जरा तापड स्वभावाच्या होत्या.त्यांना भूमीने सांगितले तेवढेच करवे बाकी कसलाही हस्तक्षेप केलेला आवडतं नसे. आता भूमीचे काम तर तिने सोडवलेच पण घरातही दिवसभर ती एकटीच काम करायची. सकाळी चहापासून ते सगळ्यांच्या आवडीनुसार नाष्टा ते जेवणापर्यंत. शिवाय घराची साफसफई, धूनी,भांडी सर्व भार एकटिवर आला होता. आता भूमीचा दिवस पाच ला उजाडला की तो रात्री अकरा - बारा पर्यंत मावळत असे. न थकता ती हे सगळ हसत मुख घेऊन करत होती. हळूहळू सासूबाईंचा त्रास वाढू लागला. कृष्णा दारूच्या आहारी गेला. तो रात्री पिऊन धिंगाणा घालत होता. त्यावेळी त्यांच्यात भाग घेणारे कोणी नव्हते. भूमी हे सगळ कोणाला सांगू शकत नव्हती कारण प्रेमविवाह केला होता तिने त्यामुळे सगळे तिला च उलट बोलतील याची भीती मनात होती. त्यांच्या जीवनात नवीन पाहुनी आली होती. शिवानी क्या रूपाने भूमीच्या जीवनात नवीन उम्मेद आली होती. जसं जशी शिवानी मोठी होत गेली तसतसा भूमीचा त्रास वाढत गेला.
भूमीची लहनी नणंद ने म्हणजे रोहिनिने तिच्याच मामाच्या मुलांसोबत लग्न करायचं निर्णय घेतला.यामुळे कदाचित आता थोडातरी भूमीचा त्रास कमी होईल....
पण इथ उलट होत होते त्यामुळे या लग्नाला विरोध होता.
रोहिनीच्या धमकीला बळी पडून सर्वांनी तिच्या लग्नाला होकार दिला पण ती पही महिन्यात परत आली.
भूमीला ही पूर्णतः त्रासून गेली होती.तिला आयुष्य नकोसे झाले होते. पण शिवानिमुळे ती हतबल होती. एका वेळी तिने कृष्णाला नको त्या अवस्थेत पर स्त्री सोबत पाहीले
त्यावेळी ती स्वतःला दोष देत होती. तिने रागाने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. जाताना सोबत ती शिवणीला घेऊन गेली. यावेळी दोघेही आजारी झाल्या होत्या भूमी ही मानसिक तणावाखाली होती.तर तिच्या तब्बेतीचा असर हा शिवानी वर होत होता. असे बरेच दिवस गेले कृष्णा नशेत सासरी जाऊन भांडत होता शिवीगाळ करू लागला. यातून दोघांमधले अंतर वाढत गेले.कृष्णाच्या आई ने शिवणीची मागणी केली. पण भूमीला घरात घ्यायला नकार दिला यातून वाद इतका विकोपाला गेला की दोघांचा घटस्फोट झाला यात अट ही की शिवानी कृष्णा जवळ राहील.
यात त्या चिमुकल्या शिवानी ची काय चूक होती. भूमीने प्रेम केले ही चूक झाली. त्यातून लग्न केले हेही चुकले असणार. असे झालेले लग्न हे पूर्ण लग्न मानल्या जाईल का यामुळे शिवानी आणि भूमी दोघींचे आयुष्य प्रवास हा मध्यंतरी स्थगित झाला. काय याला अपूर्ण विवाह म्हटल्या जाईल का?...
.........