अनैतिक
अनैतिक
अन्नू घाबरून तेथून निघून गेली पण अभिषेक ला जाता आले नाही. त्याला नाईलाजास्तव थांबावे लागले. पण त्याच्या मनात भीती होतीच त्याला काय ऐकायला मिळणार यापेक्षा हातचे काम जाणार की काय याची आणि त्याहीपेक्षा अन्नू च्या घरी समजले तर काय होईल. पण त्यावेळी वोनर तेथून न बोलता निघून गेले.
पुढे दिवाळी सन होता आणि त्याआधी दोघांना कमावरन कमी करणे त्यांनाही महागात पडले असते. पण तरीही सहज दुर्लक्ष करण्याइतके साधे प्रकरण नव्हते म्हणून दोघांना समोर बोलाऊन त्याच्यासोबत बोलणे गरजेचे होते. त्याप्रमाणे दोघे हजर झाले, जाब विचारला असता बोलायची वेळ अभिषेक चीच होती अन्नू यायलाच तयार नव्हती पण अभिषेक ने तिला येण्यास भाग पाडले. त्याने तिच्या वतीने आणि स्वतःची ही बाजू मांडत सांगितले की त्या दोघांनी ऑफीस चा दुरुपयोग करायला नको होता, पण त्यांच्या कडून चूक झाली जी परत होणार नाही. पण या बोलण्याला काही अर्थ नव्हता हे सरळ लक्षात येण्यासारखे आहे. त्यामुळे वोनर ने दिवाळी नंतर बघू काय होईल ते, आणि तेथून निघून गेले जाताना मात्र एक ऑफीस मध्ये त्यांच्या मित्राला त्यांच्या जागेवर ठेऊन गेले. सगळ
्या कामाबरोबर स्टाफ वर लक्ष द्यायला.
अन्नू आणि अभिषेक च्या वागणुकीला पाहता त्यांना दिवाळीनंतर कामावरून काढून टाकण्यात आले. यामुळे अभिषेक चे हातचे काम गेलेच पण बदनामी झाली त्याचा असर जुळणारे लग्न मोडीतच निघाले. अन्नू चेही असेच झाले कामाबरोबच घर ही गेले नाही म्हणता तिच्या घरी जे समजायचं ते समजल आणि तिला माहेरी जावे लागले मुलांशिवाय. यानंतर अभिषेक ने परत अन्नू सोबत कॉन्टॅक्ट तोडला बाहेर असूनही तो तिला इग्नोर करत होता. मॅसेज ला रिप्लाय देत नव्हता, फोन ही उचलत नव्हता. अशा प्रकारे अन्नू च्या सुंदर हसऱ्या जीवनाचा एक्स्ट्रा मॅरेज अफेअर्मुळे धिंगाणा झाला.
ज्यांना लपवता आल त्यांनाच दुर्गुण पचवता येतात नाहीतर अधिक चांगल्याचा नादात आपल्या हातात असणार चांगलं ही सुटतं. जे आहे तेच चांगल बनवण्याचा प्रयत्न करून आयुष्य प्रवास सुखाने राहू द्या
मी पहिल्यांदा कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. ज्या वाचकांनी वाचून मला समीक्षा देऊन प्रोत्साहन दिले त्यांना मनापासून आभार. अशीच कुपदृष्टी राहू द्या 🙏🙂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐