अनैतिक भाग 2
अनैतिक भाग 2
आज मनातील विचारांना कंट्रोल करणे कठीन होत होते. पण घरापासून दूर जाण्याचा आनंद होताच अभिषेक च्या मनात आणि त्या आनंदाला द्विगुणित केले होते सोबत असणाऱ्या अन्नू ने त्याच्यासोबत एवढ्या लांब टू व्हीलर वर जाण्याचे कबूल केले म्हणून. त्याला एकप्रकारे मुक संमती मिळाली होती. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटेच दोघे निघाले मीटिंग साठी.
हळू हळू प्रवास सुरू झाला. थंड हवेची साथ, मंद येणारा फुलांचा सुगंध, आणि शेताजवळून जाताना येणारा मातीचा सुगंध अगदीच मनमोहक वाटत होते सगळे. जस जसे 🏍️🏍️
टू व्हीलर चालत होती तसं तसा दिवस ही उजाडत होता. मधात एका ठिकाणी गाडी थांबली, मस्त हिरवा निसर्ग शेतीला पाणी सुरू असल्याने मातीचा सुगंध, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अनोळखी नजरा, एकदम अभिषेक जवळ येऊन उभा राहिला आणि अन्नू चा हात हातात घेतला, तिने अचानक मागे वळून पाहिले आणि ती घाबरली........