Author Sangieta Devkar

Abstract Inspirational Others

2  

Author Sangieta Devkar

Abstract Inspirational Others

अक्षय सुखाचे वरदान

अक्षय सुखाचे वरदान

3 mins
29


आपला देश संस्कृती आणि परंपरा जपणारा आहे,त्यामुळे प्रत्येक सणाचे काही ना काही महत्व आहे. जीवन हे क्षणभंगुर आणि अशाश्वत आहे, तरी त्या पासून मिळणारे सुख शाश्वत असावे,या पायी जीवन जगण्या साठी जी उर्मी ,उभारी प्राप्त होत असते ,त्यात अनेकांचा वाटा असतो. त्या सर्वांना त्यांचे श्रेय देण्याचा ,त्याचे स्मरण करण्याचा उत्सव म्हणजे अक्षय तृतीया होय. वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षयतृतीया साजरी करण्यात येते. या काळातील निसर्गाचे दर्शनही मोठे अद्भूत असते.वैशाख शुद्ध तृतीयेला त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. त्याचप्रमाणे चार युगांपैकी सुरुवातही याच दिवशी झाली, म्हणूनही हा अतिशय शुभदिन मानला जातो. आपल्या संस्कृतीत मुहुर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे, योग्य मुहूर्तावर सुरु केलेल्या कार्यात हमखास यश मिळते अशी घट्ट समजूत आहे. म्हणूनच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्यतृतीयेला महत्त्व आहे. मुहूर्त न बघताही या दिवशी नवीन वस्तू, वास्तू, वाहन, व्यवसाय आरंभ, शुभकार्य, सामाजिक कार्य केल्यास हमखास यश मिळत असे मानतात. अक्षय् याचा अर्थ कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारा असा आहे. म्हणूनच या दिवशी खरेदी वा शुभकार्यास आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते. अक्षयतृतीयाच्या दिवशी अगदी गुंजभर वा १ ग्रॅम सोने जरी खरेदी केले तरी त्यात सातत्याने वाढ होते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात कित्येक शेकडो किलो सोने विकले जाते.    अक्षयतृतीयेचे एक वेगळे महत्व म्हणजे या दिवशी परशुराम जयंती येते. परशुराम हा दशावतारातील सहावा अवतार. परशुराम हा रेणुकामाता आणि जमदग्नी ऋषी यांचा मुलगा. जमदग्नी हे अत्यंत कोपिष्टऋषी होते. त्यांनी संतापाच्या भरात माता रेणुकाच्या वधाची परशुरामास आज्ञा केलि. पुत्राने पित्याची आज्ञा त्वरित आत्मसात केली. परंतु परशुरामाने मी तुमची आज्ञा पाळल्याच्या बद्दल मला गुरूदक्षिणा द्यावी. आणि त्यात मला माझी माता परत जिवंत हवी अशी मागणी घातली त्यामुळे त्यांना माता रेणुकाला परत जीवित करावे लागले. परशुराम हे क्षत्रियांना धडा शिकविण्यासाठी नेहमी परषुचा वापर करत. त्यामुळे त्यांना परशुराम नावानेच संबोधत असत.अक्षय तृतीया या दिवशी जे काही जप,होम,पितृतर्पण,दान ईत्यादी केले जाते ते अक्षय होते,असा शास्त्रसंकेत आहे. वैशाख महिन्यातील शुद्ध पक्षातीलतृतीया म्हणजे अक्षय तृतीया या दिवसाला कृतयुगाचा प्रारंभ दिन मानतात. हिंदू संस्कृती जे साडेतीन मुहूर्त पाळतात त्यातील अक्षयतृतीया हा अर्धा मुहुर्ताचा दिवस. अक्षयतृतीया हा वैशाख महिन्यात येतो वैशाख महिना हा वनव्यासाठी प्रसिद्ध आहे. सूर्याच्या तेजाने सृष्टी तापून निघत असते. अश्यावेळी थंडगार पाण्यासाठी जीव व्याकुळ होत असतो. म्हणून त्यांची तृष्णा भागविण्यासाठी ठिकठीकाणी पानपोई सुरु केल्या जातात.आजचा जमाना खूप दगदगीचा आहे सगळंयाना प्रत्येक गोष्टी चा ताण आहे प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी पटकन हव्या आहेत,त्यासाठी स्पर्धा,कुरघोडी,ताणतणाव,याचा सामना प्रत्येकाला करावा लागत आहेया मुळे सुख,पैसा समाधान कुठेच नाही,याचा विचार ही कोणी करत नाही. दिवसरात्र काम,टेन्शन यातच जो तो गुरफटला आहे ,एका न संपणाऱ्या चक्रात अडकला आहे,मग एखादा दिवस हा ताण असहाय होतो,अशा वेळी कोणीतरी मायेने समोर येतो,आपला आधार बनतो,आपली विचारपूस करतो. त्या सावलीत आपण सुखावतो,पुन्हा नव्या उमेदीने लढायला तयार होतो. तो प्रेमाचा हात आपल्या माणसाचा च असतो. तो अक्षय आपल्या पाठी शी उभा असतो. हे सुख आपणच शोधायचे असते. कुठेतरी दंगल घडते,कुठे नैसर्गिक आपत्ती कोसळते कितीतरी जीव अनंतात विलीन होतात,कोणाचे छप्पर दुरावले,कोणी एकटाच उरतो,अशा वेळी पुढे येतात काही हात आणि झालेली पडझड तोलून धरतात,मदतीचा हात देतात,एखाद्याचा आधार बनतात. दुःखितांचे अश्रू पूसतात,अशा वेळी ओळखू येतात,हे आनंदाचे,सुखाचे,मायेचे हात. यांच्या कडून ऊर्जा घेऊन अक्षय आनंद देणारे बनतात हजारो हात,! हा असतो अक्षय सुखाचा ठेवा!  अक्षय तृतीयेला केलेले कार्य चिरकाल टिकते असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी चांगलेच कर्म करावे,ज्यायोगे आपल्यानंतर काही काळ तरी लोक आपले काम वाखाणतील. आपल्या इतिहासात अशी बरीच नावे आहेत ज्यांचे कार्य अक्षयस्वरूपी आहे. बाबा आमटे,सचिन तेंडुलकर,लता मंगेशकर ही आज ची काही उदाहरणे आहेत. त्यांचे कार्य निश्चित वंदनीय आणि अक्षय स्वरूपी आहे. या दिवशी गोरगरिबांना मदत करणे,गरजवंताला कपडे,द्रवय,तर तहानलेल्या ला पाणी आणि भुकेल्याला ला अन्न देणे यातच अक्षय सुखाचे मर्म दडले आहे. संत तुकोबांना माहित होते की आपले जीवन क्षणभंगुर आहे त्या अपल्शा जीवनातही सद्गुरू सुखाचा आनंद लुटला आणि इतरांनाही तो लुटण्यास प्रवृत्त केले. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांनी देखील शाश्वत सुखाचा दाखला देताना म्हंटले आहे,की " मी हे जग सुंदर करून जाईन" केलेल्या उपकारा चे समरण ठेवणे,आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेणे हेच खऱ्या अर्थाने शाश्वत सुख आहे,या सणाचे हेच खरे मर्म आहे.             -                                                -


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract