Jyoti gosavi

Classics

4.0  

Jyoti gosavi

Classics

अभंगाचे रसग्रहण

अभंगाचे रसग्रहण

1 min
187


संत नामदेवांच्या अभंगाचे रसग्रहण


!!!! आजचा अभंग !!!!

----------------------------

 एका अभंगाचे रसग्रहण!! 


पक्षिणी प्रभातीं चारियासी जाये ।

पिलूं वाट पाहे उपवासी ॥१॥


तैसें माझें मन धरी वो तुझी आस ।

चरण रात्रंदिवस चिंतीतसे ॥२॥


तान्हें वत्‍स घरीं बांधलेंसे देवा ।

तया हृदयीं धांवा माउलीचा ॥३॥


नामा ह्मणे देवा तूं माझा सोईरा ।

झणीं मज न अव्हेरा अनाथनाथा ॥४॥


- संत नामदेव


वरील अभंग संत नामदेवांचा आहे. 

ज्यामध्ये इतकी सुंदर उपमा दिलेली आहे की पक्षिणी सकाळी साऱ्यासाठी बाहेर पडते, परंतु घरट्यामध्ये पिल्लू उपवासी आपल्या आईची वाट पाहत असते. 

पण पिल्लू जसे फक्त आईच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असते, किंवा डोळ्यात प्राण आणून आईची वाट बघत असते. परमेश्वरा माझे तसेच झालेले आहे. 

आणि मी फक्त तुझ्या वाटेकडे नजर लावून आहे. 


किंवा तहाने वासरू  घरी गोठ्यामध्ये बांधलेले असते, आणि गाय चाऱ्यासाठी रानोमाळ फिरत असते ,परंतु ती गाय जशी वासराच्या ओढीने पुन्हा धावत घराकडे येते, किंवा ते वासरू जसे आईची वाट पाहत असते. परमेश्वरा तसेच तुझ्या चरणाकडे माझे मन लागलेले आहे. त्याचप्रमाणे परमेश्वरा तू माझा दिनाचा सोयरा आहेस, मायबाप आहेस, पालक आहेस, मी तुझी वाट पाहत आहे. 

तरी माझा अनाथाचा तू अव्हेर करू नकोस.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics