Abhilasha Deshpande

Thriller

3  

Abhilasha Deshpande

Thriller

आक्रोश

आक्रोश

6 mins
188



       बोरगाव एक सुंदर गावा सगळीपासून निसर्गाने भरभरून दिले होते पंचक्रोशीतल नावाजलेले गाव सगळीकडून असलेली बालाघाटाच्या डोंगरावर उंचउंच देखणी झाडी होती हळूच वाहणारी नदी डोंगररांगातून वाहत बोरगावाला स्पर्श न जात होती. नदीला येणारा पूर म्हणजे पर्वणी असायची.

     निसर्ग भरभरून देत होता. तस गाव अठरा पगड जातीचे तस गावात सगळ्यांनी आपली सामाजिक जबाबदारी स्वीकारली होती. आपापल्या पध्दतीने आपापली बंधन पाळून, एकमेकांचा आदर कायम ठेवला होता. सगळ्यांची दुःख सारखी मानायचा.

        हल्ली थोडा बदल झाला ग्रामपंचायत आणि पोरं सुधारली. ग्रामपंचायतीला अनुदान आले अन् पोरांच्या हातात मोबाईल गावचा सगळा सगळा सत्यानाश झाला. एकावेळी थाटात चावडी गाजवणारे हल्ली खूप शांत झाले. होणारच सगळ्यांना ज्ञान आले. खरतर अज्ञानच बरं होतं. खरतर ग्रामपंचायतीला अनुदान नको होत.

कारण सामाजिक बांधिलकी असल्याने चावडीची भिती असल्याने लोक शंभरदा विचार करायचे असं करावं की,नाही? काही लोकांना तो त्यांच्यावर झालेला अन्याय होता. आता त्या धनंजयचे वय काय करतोय काय तुम्हीच बघा दहावीत आहे तो पाटलाचा एकुलता एक मुलगा.

        अंबाची सुरु आणि तो एकाच वर्गात तसा तो 5 वर्षांनी मोठा आहे. सुरु दिसली की एकच हरकत आज जे केलं ते अक्षम्य!.

   "माझं प्रेम आहे तुझ्यावर".

"धनंजय वाट सोड कोणी बघायच्या आत निघून जा नाहीतर इथच बोंब ठोकीन". "ते कायबी न्हाय आज जे काही हायते हितच सोक्षमोक्ष लावून टाक होकी न्हाय" धनंजय.

  धनंजय आल्यावर सगळ्या पोरी पसार झाल्या. त्याच्या इतका क्रूर पोरगा गावात बरे ह्यातच सगळे धन्यता मानायचे. त्यात त्याच्यासोबत उध्दव, सुरेश व निलेश असल्यावर कहरच. सगळे जण सरुभोवती गोळा झाले होते. उध्दवची 7 वर्षाची पोरगी होती. पण,धनंजय सोबत टवाळक्या करायला जाम भारी वाटत म्हणूनच तो ही प्रत्येक पापात धनी होत होता. सुरेश आणि निलेश वर्गमित्र काही ही करून मास्तर पोर रोज यांना त्याकारणाने छेडून यायचेच.

     सरु दिसायला खूप सुंदर! गावात जरी वाढली असली तरी, अंबा पारंपरिक धंद्याला बगल देऊन, लेडीज स्पेशल टेलरींग करत असल्याने सरूसाठी सगळे नवीन फँशन हौसेने करायचे. सरु आणि धुरु ह्याच दोन मुलीना लेकासारखं वाढवायचं अंबानी ठरवल होत. खूपच शांत संयमी अंबा कुणाच्या अद्यात ना मद्यात हेच धोरण त्यांचे होत.

     धनंजयचे वडिल संपत अण्णा पाटील सगळ्याचे अण्णा! आजकाल कोणीकोणाला अशी अदबीची नाव देताना दिसत नाही अण्णा, तात्या म्हणजे सामाजिक अभियंताच! यामुळेच प्रत्येक गावात ही महाभूत असायची.

     आजतर धनंजय सरुला काहीतरी काळेबेरे करण्याच्या उद्देशाने तिच्याकडे धावत येत होता. सरु सगळ्यांनी विनंती करत होती. "तुम्ही तरी अडवा न उध्दव भाऊ....तुमालाबी पोरगी हायनं... कामून अंत बगायले... सुरेश ,निलेश वाचवा."

     घा-या डोळ्यांत वासनेची लाली स्पष्ट दिसत होती. सगळेजण हसत होती. अगदी 10 वीत असलेली सरु नुकतच तारुण्यात पदार्पण केलं होत. आईने सांगितलेल्या सर्व सुचना स्पष्ट दिसत होत्या . नाइलाज झाला होता. धनंजय 5 वर्ष शाळा सोडून 6वीपासुन सरूसोबत रेग्युलर झाला होता. नेहमी सरु समजून सांगत होती पण आज तिचा अंत समोर दिसत होता.

    ओढणी बाजूला भिरकावून धनंजयने सरुला आपल्याकडे खेचलं तसं गालचा चावा घेतला. राक्षसी क्रुर हास्य सुरु झाले.

     सरुच्या सगळ्या वाटा संपत आल्या होत्या. शाळेत कोणीच नव्हते. शाळा व गाव या दोन्हींमध्ये एक पूल होता तिथते कांड सुरु होते. कुठून एक बैलगाडी दगडातून मार्ग काढीत घटनास्थळावर येताना दिसली.तसं धनंजय अन् मित्रपरिवार पसार झाले. तसं सरुला धमकी देऊन गेला" "गपचुप संध्याकाळी पांदीला भेट नाहीतर घरात घुसुन अब्रु लुटीन". तसाच घाईघाईने कपडे ,भांग पाडून तोही पसार झाला.

   अशा अवतारात बाहेर पडावं तर गावात चर्चा होणार. काही झाल तरी बेअब्रु अपण होणार.एकुलत एक घर सगळा सहारा असणारे आबा पाटलांच्या बैठकीत एकटं पाडणार कोणाचाबी आधार नाही.म्हणून बैलगाडी जाईपर्यंत तिथच पांगलेल कपडा ,वेणी व्यवस्थित करुन ती बाहेर पडली.

  धुरु लहान असल्याने तिला तिला आत घेऊन जायच खुनवून आबा सरुजवळ गेले. तशाच स्थीतीत आबांनी सरुला बाहुपाशात घट्ट धरले. आबांनी काही विचारायच्या आत सरुनी कर्म कहानी सांगितली. "बैलगाडी आली म्हणून वाचले नाहीतर सगळ संपलं होत आबा."आबाला खूप राग आला होता. संतापाची लाट उसळली. डोक्यात सुडाची आग लागली. मस्तकाची शीर चमकत होती. धनंजय आणि सुरेश ,निलेश ,उध्दव डोळ्यात सलत होते.    

   कराव तरी काय काही सुचत नव्हते? वयात आलेली पोरं गावात चर्चा झाल्यास कोण लग्न करील हाच विचार आबाला खात होता. एकच घर त्यात आपला सगळा व्यवसाय गावावर चालतो. हाच विचार आबाला सतावत होता. तसेच आबाने सरुचे डोळे पुसले आणि म्हणाले "रडू नकोस पोरी...तुझा बाप सगाळ नीट करील.तु डोळे पूस ...धुरुला यातलं काही सांगू नकोस... आईलापण सांगू नकोस....गुपचूप जेवण करून घे...काही झालच नाही असं गावात वाग.. बरं चल जेऊन घे.

   जेवण उरकून आबाने वाडा गाठला. संपत अण्णा नेमक जेवन करुन वसरीत पान लावीत बसला होता. तस आबा येताना दिसताच अण्णानी अजून एक पान लावलं "रामराम पाटील".

    "राम राम आबा काय काम काढलं ..तुझ्या सारख्या शिकल्या सवरल्या पोरासनी आमची आता कायबी गरज राहिली नाही. गाव ग्रामपंचायत चांगलीच वाढली. बरं जाऊदे पुराण कसं आलास ते सांग. धर घे पान" "पाटील ला आबानी सर्व समस्या सांगितली. ही समस्या ऐकून अण्णाला संताप आला. "पाटील कायबी नाही जरा खाजगी होत . तुमचं धनंजयरावाबद्दल तेबी याच अटीवर सांगणार हाय ते म्हणजे तुम्ही त्याला मारणार नाहीत आणि जे झालं ते इथच सोडून देणार याच अटीवर".

     "त्याला तर जीव मारणार हाय मी... तेच काही सांग नाहीतर नको सांगू... तो मेलाय माझ्यासाठी. ४ पोरीवर थांबलो असतो तर बरं झालं असत. नातवंड कामाधंद्याला लागली तरी ही औलाद सुधारणारी नाही."

      "तरी बी पाटील तुम्ही वचन द्या तुम्ही समज देणार" " बरं आबा चल दिलं वचन". " पाटील माझी पोरगी बेअब्रु होता होता वाचली..धनंजयरावांना २ महिने अडवा,मी लग्न लावून देतो पोरीचं.

   तसं आबा घराकडे आला. तंबाखू पानाला चघळीत दुकानात बसला. सरू,धुरु धिंगाणा घालत होत्या. म्हणजे सरुने घरात बाकी कोणाला सांगितले नाही.एकदाच आबा मोकळे झाले.

   इकडे पाटलांनी चाबुक काढला तसं धनंजयराव आले. जेवन झाले. अन् एकदाच वसरीत पलटले. भाव असे की किहीच झाले नाही.मोबाईल वरची रिंगटोन ऐकीत येरझारे घालत होते. डोळे झापताच धनंजयरावांना दौराने बांधून कैद केले. सोडा म्हणताच तोंडात बोळा दाबला.

     गुन्हेगाराला शिक्षा वसरीत दिली जायची. त्यामुळे गुन्हेगार आरामात उचलला जावा म्हणून माळवदाला सराला कपी लावलेली असायची. ब-याच दिवसांनी कपीचा उपयोग झाला. उरलेल्या दोरीला कपीत ओवून ,क्षणात धनंजयराव माळवदाला टेकले. तस पाटलांनी लक्ष्मीबाईला आदेश दिले. तेलात माखलेला चांबूक आला.

   लक्ष्मी बाईनी आणून दिला. त्यांची बोलायची हिम्मत

     झाली नाही. कारण पाटलांनी उचलेला माणुस गुन्हेगार असतो. त्यामुळे त्या गप्प राहून निघुन गेल्या. पुढे काय होणार होते. धनंजयराव चांगले मोकळे झाले. 3 दिवस चाबूक आणि मीठ हाच खायला होता. त्यामुळे धनंजय मार खाऊन मोकळा झाला. शेवटी कबुली जबाब घेवून प्रायश्चित देऊन खाली उतरला. त्यापुढे जे झाले ते तुम्ही ऐकाव अन् मी सांगाव. गावातले श्रध्दास्थान मोहनगिरी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने गावात सप्ताह बसला. या सप्ताहात धनंजयराव मुख्य आकर्षण ठरले.

  बघता बघता परिक्षा आल्या. सरु धनंजयचा सावध पवित्रा घेत होती. परिक्षा झाल्या. तसं सरुला बोलला"आता मी खूप बदललो सरु...मित्र?

    काही झालं तरी सरु विसरली नव्हती. काहीही न बोलता निघून गेली. तस धनंजयने अडवले. सरु मला तू आवडतेस पण आवडणा-या सगळ्या गोष्टी आपल्या होत नसतात,मला ते कळवलयं हा माझा नंबर घे. मला माहिती आहे तुझ लग्न आहे. मी आबाला कुठलीही कमी पडू देणार नाही. बघ लग्नात किती काम करतो ते.

         तसं बोलताच सरूला खात्री पटली अन् झालं ते गंगेला मिळालं असं बोलून, धनंजयाची मैत्री स्विकारली.

     आता सरुच्या लग्नाची तैयारी सुरु झाली. धनंजय केसांना बरोबर कातरुन एकसाईड भांग पांढरा शुभ्र शर्ट आणि खाली पांढरी पँट छाती अन् दंड मजबूत दिसावेत म्हणून अंगाखांद्याला चिकटून राहिल. राजदूत गाडी भडभडा वाजत सरुच्या लग्नाच्या तयारीत होती. हल्ली धनंजय कडे वेळ नाही. काही झाल तरी लग्नात काही कसर ठेवायची नाही पाहुणे अगदी खुश करुन सोडायचे असच काहीतरी चालू होत.

      सरुच्या मिस्टरांनी नवाकोरा नोकीया फोन सरुला दिला होता. धनंजय भाऊला आनंद आणि दुःख सोबत झाले. गावात चर्चा सरुच्या मोबाईलची होती. आनंद या गोष्टीचा होता की, कामानिमित्त का होईना बोलायला भेटत होते. बस्ता भरण्यापासून ते किराणा भरेपर्यत धनंजय ने सगळी मदत केली.

     सौंदर्य खाण असलेली सरु अजून सुंदर दिसत होती. सजणाच्या चाहुलीने पूर्ण न्हाऊन गेली होती. फोन आला अन् प्रगती झाली. 2 जीव वेडी झाली. तास-तासाला सरुचे मिस्टर हालहवाल घेत होते. गावातल्या बायका कुतुहलाने बोलत होत्या.

  " आमच्या काळात असलं असलं कायबी नव्हतं माय लग्नाअगोदर नवरा बायको हु..हुं..हुं पार पिढी बिघडली माय डबड्याने"असं बोलून निघून जायच्या.

      लग्न थाटात पार पाडले. आबा पुर्णपणे रमला होता. लग्नात झालेला खर्च भरुन निघावं म्हणून कपडे शिवण्यासोबत ड्रेस आणि ड्रेस मटेरियल पण विकायला ठेवायला लागला. दिवाळीत सुरु यायचे डोहाळे लागले. सगळी तयारी झाली.

----------------------------------------------------------    


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller