आजची चाणक्ष पिढी
आजची चाणक्ष पिढी


BLO ची कामे व मिटिंग अटेंड करण्यासाठी शिक्षक शाळेच्या वेळात गेले होते.माझ्याकडे पहिलीचे दोन वर्ग एकत्र होते. एकूण 65 मुले होते. एक तर मलाच माझ्या पालकांची नीटशी ओळख होत असताना या दुसऱ्या वर्गाची जबाबदारी आली. मुलांना पालकांच्या त्यांचे मुलं सोपवणे आणि दुसऱ्या वर्गाचे पालक अपरिचित होते.
मधली सुट्टी झाली मुलांनी डबे खाल्ले.. आता मात्र त्यांना घरची आठवण येऊ लागली.
मी ब्लू टूथ वर गाणी, कविता घेतल्या. गोष्ट सांगितली. पण तीन मुले खूपच रडत होती. डोके सुन्न झाले होते. एक तर वर्गात खूप मुले, शांत तर सोडाच पण सारखी इकडून तिकडे धावधाव चालू होती.
अभ्यास दिला तर करणारी मुले पटकन करून दाखवत होती. रडणारी रडत होती. न अभ्यास करणारी मस्ती घालत होती.
शेवटी एक युक्ती केली सर्व मुलांना घेऊन मैदानावर गेले. खेळवले पण मुले पांगली... दडपण आले.. परत वर्गात आणली.
रडणारी मुले आता माझे काही ऐकेनात. मला फोन मागायला लागली. मी एका मुलीला फोन दिला. तिने मस्त तिचा नं. डाएल केला. मला म्हणाली "माझ्या बाबांना बोलवून घ्या मला न्यायला " मला खूप आश्चर्य वाटले.
फोन लावला होताच मग पालकांशी बोलले.. ते तिला न्यायला आले.. एक रडणे कमी झाले.
मग दुसऱ्या दोन मुलांनी सेम केले.. एका मुलाने बरोबर नं.डायल केला.. तो पण पालकांबरोबर गेला.
आता तिसरी मुलगी राहिली.. रडते, रडते नं. फिरवते तिला नं. पाठ नव्हता. पण फोन सोडायला तयार नाही.शेवटी शाळा सुटण्याची वेळ झाली. तिचे पालक आले. तिला घेऊन गेले.
मला या मुलांचे कौतुक वाटले.
आपल्या आईला फोन करून बोलवावं हे कस कळत. फोन नं. तोंड पाठ.आजची ही पिढी खरेच हुशार आहे. त्यांना आपल्या कडून उत्तम मार्गदर्शन मिळाले तर ही पिढी आणखी उत्तम घडेल...