akshata alias shubhada Tirodkar

Romance Classics

3  

akshata alias shubhada Tirodkar

Romance Classics

आदी घना

आदी घना

13 mins
213


"पहिले न मी तुला तू मला न पहिले पण आज आपली भेट होणार आहे "आदित्य आपल्या मनाशी मनातल्या मनात बोलत होता 

तेवढ्यात आदित्य चे बाबा त्याच्या रूम मध्ये आले "अरे आदित्य चल लवकर उशीर होईल "

"हो आलो चला आदित्य देसाई "

सगळे घरातले गाडीत बसून निघाले आज आदित्य साठी मुलगी पाह्यण्याचा कार्य्रक्रम होता तसे आदित्यचे एकत्र कुटुंब त्यामुळे आजी आजोबा काका काकू आणि आई बाबा आणि भांवंडे सगळीच निघाली होती 

गाडी येऊन थांबली तशी सगळे उतरले आदित्य हि उतरला पण थोडा बावरलेला मुलीकडचे म्हणजे मेघना चे आई वडील सगळयांच्या स्वागत साठी सज्ज होते सगळ्यांना त्यांनी आत बोलवले तसे सगळे आत येऊन बसले आणि ओळख पाळख सुरु झाली 

आदित्य ला हे पाहण्याचे कार्यक्रम आवडत नसत पण घरातल्या पुढे त्याचे कसे चालणार होते गप्पा चालू झाल्या पण आदित्य गप्प बसून सर्व ऐकत होता एवढ्यात मेघनाची आई मेघना घेऊन आली आदित्य ने पहिले तर टिपिकल मराठी चित्रपटात दाखवतात तसे मेघना हातात कांदे पोहे चा ट्रे घेऊन आली पण पाहताच क्षणी मेघना आदित्य ला आवडली सगळ्यांना पोहे देऊन ती आदित्य कडे पोहोचली आदित्य ने ट्रे मधली डिश घेतली आणि मेघनाला पाहून मिश्किल हसला मेघना हि औपचारिकते प्रमाणे हसली हे पाहून आदित्य ला कळले कि तिचे हे हसणे मनापासून नव्हते आणि मेघना आई शेजारी जाऊन उभी राहिली. 

गप्पा रंगात आल्या होत्या तेवढ्यात कोणीतरी म्हण्टले "त्यांना दोघाना एकांतात बोलू द्या" तसे आदित्य आणि मेघना त्याच्या टेरेस वर गेले दोघे हि पाच मिनिटे गप्प राहिले आदित्य ने मेघना कडे पहिले तर ती एक गोधळलेली वाटली म्हणून शेवटी आदित्य ने पुढकार घेतला 

"मेघना खूप सुंदर आहे तुमचे घर "?

"थँक्स "

"कांदे पोहे खूप छान झाले होते तू बनवलेस "

ह्या प्रश्नावर मेघनाने आदित्यला पाहत म्हण्टले "नाही सॉरी पण मी खोटे नाही बोलणार मला हे कांदे पोहे एवढे चांगले बनवता नाही येत माझ्या आईनेच बनवले आहे "

"नाही इट्स ओके आजकाल च्या मुलींना नाही येत स्वयंपाक करायला "

"सॉरी पण मी तुला स्पष्ट विचारते मग तुला कशी मुलगी हवी आहे स्वयंपाक येणारी असेल ना कारण तुमचे एकत्र कुटुंब ना "

"माझ्या काही मोठया अपेक्षा नाही आहेत प्रेमळ मनमिळावू असली म्हणजे झालं "

"म्हणजे तिला स्वयंपाक आला नाही तरी चालेल "

"तसे नव्हे पण शिकेल ना ती तसेच आमच्या घरी खूप लोक आहेत शिकवायला त्यामुळे होऊन जाईल माझ्या चुलत भावाची बायको आमची नंदिनी वाहिनी ती ला कुठे येत होता पण ती हळू हळू शिकली आणि आता तर ती आमच्याघरची मास्टर शेफ झाली आहे तुला कसा तुझा जोडीदार हवा "

"प्रेमळ मनमिळावू आपली कुठली हि गोष्ट माझ्यावर न लादणारा माझ्या मनाचा विचार करणारा आणि हो माझे मुख्य म्हणजे नाव लग्नानंतर न बदलणारा "

"वाह छान पण तुला एकत्र कुटुंब आवडत ना "

"हो त्यात मला काय प्रॉब्लेम नाही "

हे ऐकताच आदित्यने मनातल्या मनात सुस्कारा सोडला कारण आजकाल एकत्र कटुंबात राहंण्यास काहींची पसंदी नसते पण मेघना जरा उदास जाणवली हे पाहून 

"एक विचारू मेघना आमचे इथे येणे तुला आवडलेले दिसत नाही"

"नाही नाही तसे नाही पण खरे सांगू मला हे कांदे पोहे वैगरे आवडत नाही साडी नेसून उगीच खोटे हसणे "

हे ऐकून आदित्य हसू लागला 

"काय झालं का हसलास "?

"मला पण नाही आवडत हे असले पाह्यण्याचे कार्यक्रम पण घरचे थोडेच ऐकणारे "

"मग तुला कोणी आवडत का"?

"नाही नाही प्रेम वैगेरे नाही झाले मला म्हणून तर असले कार्यक्रम पाहावे लागतात "

"म्हणजे आपली मते जुळतात तर "

हे ऐकल्यावर आदित्यचा चहेरा अजून खुलला न राहून त्याने विचारले मग काय ठरवलस "मी पसंद आहे तुला "?

मेघना गप्पच राहिली 

"सॉरी म्हणजे मी असं नको होते विचारायला "

"हे बघ आदित्य तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं पण माझ्या जर मघाशी सांगितलेल्या अपेक्षा तुला मान्य असतील तरच मी विचार करिन" 

आदित्य ने परत एकदा आठवले आणि मनातल्या मनात तो बोलू लागला प्रेमळ तर मी आहे मनमिळावू पण आहे आणि मी कुठली गोष्ट दुसऱ्या वर लादणारा हि नाही प्रत्येकाला स्वतंत्र्य असावे हे माझे मत मनाचा विचार तर मी करणारच पण नाव हे मात्र अवघड वाटते कारण आमच्या घरात आजी पासून वाहिनी पर्यंत सगळ्याची नावे बदली आणि लग्नाच्या पूर्वी ह्यावर चर्चा असते कि कुठले नाव साजेशे असेल त्यांनी एक नजर मेघना कडे पहिले तर ती समोर असलेल्या गुलमोहराच्या फुलांना पाहण्यात गुंग होती 

काय करावे हे आदित्य ला कळेना कारण नाव बदलणे हि त्याच्या घरची परंपरा तो तोडू शकत नव्हता आणि मेघनाला हि नाही म्हणणे त्याला जड जात होते तरी त्याने हिंम्मतीने मेघना ला विचारले 

"मेघना शेक्सपिअर माहित आहे ना "?

"त्याच काय" 

"ते म्हणतात ना कि नावात काय आहे त्यामुळे लग्नानंतर नाव बदल्याने फरक पडतो का "?

हे ऐकल्यावर मेघनाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले "का नाही पडत पडतो आम्ही मुली जन्म एका नावाने घेतो ओळख एक नावाने निर्माण करतो आणि एका लग्नाने अख्खी ओळखच पुसून टाकावी हे मला पटत नाही आणि नवीन नाते जोडताना पूर्वीची ओळख पुसायची गरज आहे का संसार मन जुळ्याने होणार आहे कि नाव बदलण्याने "

आदित्य हि तसा पुरोगामी विचाराचा नव्हता त्यामुळे त्याला तिचे म्हणे पटायला वेळ नाही लागला पण घरातले काय म्हणतील यावर त्यांना समजवणे जरा कठीण होते त्यामुळे तो जरा शांत राहिला पण त्याच मन कुठे तरी सांगत होत "जिस मंझिल कि तुम तलाश कर रहे हो वो तुम्हारे सामने ही है "

त्याने मेघना कडे पहिले तर तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास तिच्या डोळ्यात दिसत होता त्याने मेघना कडे पहात म्हटले "मेघना मला तुझ्या सर्व अपेक्षा मान्य आहे "

तशी मेघनाला हि आदित्य चा स्वभाव आवडला ती ने हि लगेच होकार दिला दोघे हि खाली आले सर्वाना होकाराची बातमी सांगितली तशी मिठाई वाटण्यात आली सगळीकडे आनंद पसरला हसत खेळत आदित्यच्या कुटुंबांनी मेघनाच्या घरातल्याचा निरोप घेतला सगळे आनंदात होते मेघना हि खुश दिसतं होती जाता जाता तिने मोठीशी स्माईल आदित्यला दिली पण आदित्य ला मेघनाच्या अपेक्षा चे टेन्शन आले होते त्याने होकार दिला होता पण जर मना सारखे झाले नाही तर ?


आदित्यचे घरचे गेले तसे मेघना हि आपल्या खोलीत गेली ती मनापासून खूप खुश होती कारण तिच्या मनासारखा जोडीदार तिला मिळाला होता मी


मेघनाचे आई बाबा आदित्यच्या घरातल्याचा निरोप घेऊन आता आले "चला एकदाचे पार पडले आपली मेघु खूप नशीबवान आहे तिला चांगले घर मिळाले "


"होय हो माणसे खूप चांगली आहे आणि आदित्य हि "


'आपली मुलगी तिथे सुखात राहील ह्या पेक्षा आणखी सुख आईबाबाला काय असू शकत "


"हो ना बरोबर बोललात पण कुठे गेली ती पाहते जरा तिला "


मेघनाची आई खोलीत आली तर मेघना विचारात मग्न असलेली दिसली 


"मेघु "


"आ आई तू कधी आलीस "?


"काय कुठल्या विचारात "


"काही नाही असच "


"बरं स्थळ आवडलं ना तशी ती माणसे चांगली आहेतत"


"हो आई आवडले आणि खरं म्हणजे मला आदित्यचा स्वभाव आवडला जो टिपिकल नवरा असतो तसा नाही आहे तो खूप वेगळा आहे" "


"एकाच भेटीत एव्हडं कौतुक पण चांगलं आहे तू सुखी तर आम्ही सुखी "


"नाही आई मी उगाच कौतुक नाही करत खरंच तो वेगळा विचार करणारा आहे आणि तुला माहित आहे माझी सर्वात मोठी अपॆक्षा तो पूर्ण करण्यास तयार झाला "


"अपेक्षा कसली अपेक्षा "?


"लग्नानंतर नाव न बदलण्याची "


"काय "


"हो "?


"अगं पण एकत्र कुटुंब त्याची रीत असेल काहीतरी आणि लग्ननंतर नाव हे बदलतच त्यात काय एव्हडं "


"पुरे आई पुरे पण मी नाही बदलणार आणि आदित्य तयार हि झाला ""


"पण मेघु तू उगाच नावामागे लागलीस अगं नावात काय आहे "


"खूप काही आहे मला पहिले आडनाव पण बदलायचे नव्हते पण आडनाव बदलायला माझी आता काही हरकत नाही पण नाव मात्र मी नाही बदलणार "


"तू ना मेघु लहान मुलासारखा हट्ट बरा नव्हे" 


"अगं तू कशाला टेन्शन घेते तुझ्या होणाऱ्या जावयाने ह्या वर शिक्कामोर्तब केला आहे आणि माझा विश्वास आहे आदित्यवर "


"हो बाई असणारच आता तू होणाऱ्या नवऱ्याचेच गुणगान करणार "


"आई तू पण ना "


"मग काय म्हणू एका थोड्या वेळेच्या भेटीत त्यांनी खूप जादू केली दिसते पण तू खुश आहेस ना तुझ्या मनासारखं सगळं होत तर मग आम्हला आणि काय हवंय "


असे म्हणून आई निघून गेली 


आणि मेघना मनातल्या मनात लाजली खरी पण काय आदित्य तिच्यावरचा विश्वास राखू शकेल ?


 आदित्य च्या घरी आनंद पसरलेला कारण सगळयांना मेघना आवडली होती आणि मुख्य म्हणजे आदित्यला आदित्य हि खूप खुश होता अशाच एके दिवशी आदित्य एकटाच बसलेला आणि गालातल्या गालात हसत होता त्याची हि चेहऱ्याची चोरी त्याच्या चुलत भावाने नंदन ने पकडली तो हि हसत हसत त्याच्या जवळ आला आणि त्याला पाहत म्हणाला 


"काय आदित्य आता काय बाबा तुझी सोबत येणार मग आम्हाला विसणार "


"नंदन ला आदित्य प्रेमाने भाऊ म्हणे "भाऊ तसं काही नाही आहे हा ती आली म्हूणन तुला विसरणार अशक्य आहे "


"हो का पाहूया "


तेव्हड्यात नंदन ची बायको तिथे आली "काय पाहतात मला पण सांगा "?


"अगं काही नाही नंदिनी मी ह्याला म्हणत होतो कि तू मेघना आली कि आम्हला विसरशील वैगेरे तर नाही म्हणतो "


"जाऊ द्या हो कसली मस्करी करतात पण खरंच मेघना खूप चांगली आहे आणि दोघांचा जोडा हि शोभून दिसेल आणि तुम्ही इथे बसून गप्पा नका मारू लग्नाचे घर आहे चला कामाला लागा "


असेच दिवस जात होते मेघना आणि आदित्यचे गुड मॉर्निंग पासून सुरु झालेले मेसेज रात्री गुड नाइट पर्यंत चालायचे मध्येच बोलणे हि व्ह्याचे मेघना ला आपल्या बदल असलेले प्रेम आदित्य ला जाणवत होते अश्याच एका संध्यकाळी त्यांनी भेटण्याचे ठरवले ते हि गुपचूप आदित्य ने कामावर उशीर होईल म्हणून सांगितले होते पण मेघना तशी बिंदास त्यामुळे ती नि घरी सांगितले होते 


आदित्य लवकर काम आटपून कॅफे बिट मध्ये पोहोचला संध्यकाळी ५ वाजता ची भेटण्याची वेळ होती त्याने तिथे लवकर जाऊन एक सुंदर अशी बसण्यासाठी जागा निवडली आणि तो मेघना ची वाट पाहत होता एवढ्यात मेघना येताना दिसली 


"अरे तू पोहचलास मला उशीर तर नाही ना झाला "?


"नाही नाही बस "तशी मेघना बसली 


"बरं मेघना कॉफी कुठली ऑर्डर करू "?


"कुठलीही चालेल "


"बरं चॉकलेट विथ कॅपचिनो चालेल "?


"हो ती तर माझी आवडती आहे "


"काय माझी पण "असे म्हणत दोघेही हसू लागले गप्पा हि रंगात आल्या मेघना दिलखूलास आदित्यशी बोलत होती 


"आदित्य खरंच मी खूप लकी आहे कि तुझ्या सारखा लाईफ पार्टनर मला मिळाला "


"नाही नाही एवढे माझं कौतुक नको करुस "


"नाही आदित्य खरंच पहा ना माझं मुख्य म्हणजे नाव नाही बदलणार दुसरा कोणी असला तर नाही म्हणाला असता पण तुझे विचार खूप वेगळे आहेत "


हे ऐकून आदित्यला मनातल्या मनात भीती वाटत होती कारण त्याच्या घरची परंपरा त्याला माहित होती जी तो बदलण्यास तयार झाला होता पण तो बदलू शकेल का ?


आदित्य आणि मेघना च्या घरी लग्नाची तयारी जोरात चालू होती अश्याच एका रात्री आदित्य चे कुटुंबीय सगळे जण जेवण्यासाठी बसले होते आदित्य काही काम होते म्हणून जरा उशिरा पोहचला गप्पा रंगात आल्या होत्या तेव्हड्यात आदित्य च्या आजोबानी आदित्यला पाहतच सगळयांना शांत केले 


"अरे शांत राहा तुम्हीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहात त्या नवर देवाला पण काही विचारा "?


"काय आजोबा "?


आदित्य च्या काकांनी सुरवात केली "काही नाही रे अरे आम्ही मेघनाचे नाव काय ठेव्याचे ह्याची चर्चा करत होतो सगळ्यांनी एक एक नाव सुचवलं आहे ते सोड तू काय ठरवलं "


"मी काही नाही "


"अरे असं कसं काही तरी ठरवलं अशील ना "?


तेव्हड्यात आदित्यच्या चुलत बहिणीने म्हणजे अनघा ते म्हटले "आदी दादा कोणाचं ऐकूच नको अदिती ठेव मस्त आहे आदित्य ची अदिती "


"ये चला गप्पा गोष्टी मग पहिली जेवण करा "आजोबानी आवाज चढवला तसे सगळे जेवण करू लागले पण आदित्य चे जेवणात लक्ष नव्हते हे त्याच्या नंदन भाऊ ने ओळखले 


जेवण झाल्यानंतर आदित्य आपल्याल्या ऑफिस चे काम आहे म्हणून आपल्या रूम मध्ये गेला त्याच्या मागोमाग नंदन हि गेला 


"काय रे काय झालं "?


"कुठे काय "?


"आदी खरं सांग जेवताना तुझे लक्ष नव्हते मेघना शी काही "


"नाही भाऊ "


"मग गप्प का"?


"भाऊ काय सांगू" आदित्य ने सगळी गोष्ट नंदनच्या कानावर घातली तसा नंदनचा चेहरा बदला


"अशक्य आहे आदि अशक्य आहे"


"भाऊ मला काही तरी मदत कर ना"


"काय करू तुझ सांग आपल्या घरातले रीती रीवाज तुला माहित आहे अजुनही आजी आजोबांच्या निर्णयाला कोणीच विरोध केला नाही माझ्या आई पासुन तुझ्या आई पर्यंत ते सोड अरे माझ्या नेहाची सुध्दा नंदीनी झाली हे विसरू नकोस आमचे अक्षर एक असताना सुद्धा नावात बदल झाला तर तुमची अक्षरे तर मिळतीजुळती ही नाही अवघड आहे ह्यावर एकच उपाय तु मेघनाला खरं सांगू टाक"


"काय भाऊ पण असे केल्याने तिचा मी विश्वास घात केल्यासारखे होईल"


"मग काय घरातले रिती रिवाज बदलणार आहेस"


"मी मेघना चा विश्वास घात नाही करू शकत जो विश्वास तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल दिसतो तो मी नाही जे होईल ते होईल मी लग्नात उखाणा घेताना मेघनाच नाव घेईन "


"वेडा झालायस कशाला उगीच आनंदीत वातावरणाला गालबोट लावायचा प्रयत्न करतो तुझ्या ह्या निर्णयाने हजार प्रश्न उभे राहतील उगीच चार लोकांसमोर शोभा नको आणी नावात काय आहे एवढं काही घेऊन बसण्याची गोष्ट नाही आहे मेघनाला समजावं नाही तर मी समजवतो"


"नाही मी आजी आजोबा शी उद्याच बोलणार जो होगा देखा जायेगा आणि हो नावात काय आहे हे आम्हला म्हणायला सोपे आहे"


नंदन मात्र हे ऐकून विचारात पडला कि "आता काय होणार "?


संध्यकाळी कामावरून आल्यावर ठरवल्याप्रमाणे आदित्य आजी आजोबाच्या रूम मध्ये केला आजी खुर्चीवर बसून नामजप करत होती तर आजोबा पुस्तक वाचत होते आदित्यला पाहातच 


"अरे आदित्य ये बस "


"आजोबा थोडं बोलायचं होत "


"बोला आदित्य "


आवाज ऐकून आजी ने हि डोळे उघडले


"आजोबा आणि आजी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे "


"बोल ना "


"आजी आजोबा मी स्पष्ट बोलतो मला लग्नानंतर मेघनाचे नाव नाही बदलायचे "


"काय अरे पण लग्नानंतर सगळ्याची नावे बदलात त्यात काय नवीन नाही तुझ्या आजी पासून तुझ्या वाहिनी पर्यंत सगळ्याची नावे बदली त्यात काय मोठेसे "


"माहित आहे मला कि नावे बदली पण मला नाही बदलायचं "


"अरे हे कुठलं नवीन खूळ डोक्यात घेऊन बसला आहे मेघना काही म्हणाली का "?


"नाही ती काही म्हणाली नाही पण मलाच नाही बदलायचं "


"अरे ती काही म्हणत नाही तर तू कशाला त्रास करतोस "


"आजोबा लग्न होऊन मुली नवीन घरी जाते नवीन घर नवीन माणसे त्यात एका नावाने लहानपाणापासून जगते ते नाव तिला जवळचे असते आणि एका क्षणी नवीन नाव लादणे मनाला पटत नाही "


"अरे पण आपण जगावेगळं काहीही नाही करत आहोत अरे लग्नानंतर नाव बदलणे हे स्वाभाविक आहे आणि आपल्या घराण्यात तर सगळ्यांचीच नावे बदली "


"बदली असतील पण एक नवरा म्हणून मला नाही बदलायचे "


"हे अति होते असे नाही वाटत अजून ती मुलगी घरात आली नाही तर एवढे मग ती म्हणेल मला एकत्र कुटुंब आवडत नाही मग काय वेगळा होणार ?


"आजोबा वाईट वाटून घेऊ नका पण ती तशी नाही आहे तिला एकत्र कुटुंब आवडत फक्त मला तिचे नाव नाही बदलायचे "


"म्हणजे तू हट्टास पेटलास तर ""


"हे बघ आदी अरे मुलीचे लग्न झाले कि नाव बदलत पहिली थोडं अवघड जाते पण मग मात्र सवय होते रे "


"पण आजी मला माझ्या नात्याची सुरुवात अवघड रित्या नाही करायची "


"सुशीला जाऊ दे आता मोठा झाला तो तुला वाटत तेच कर ये तू आता"


आजी आजोबा चे मन राखून कि दुखवून आदित्य कोणता निर्णय घेईल ?


आदित्यचे बोलणे आजी आजोबानी सगळयांच्या कानावर घातले सगळे हे ऐकून जरा आश्यर्य चकित झाले आदित्यच्या आई बाबानी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही सगळयांनी तो विषय संपवला पण नाराजीचा सूर मात्र होता त्यातच लग्नाची तयारी सुरु झाली लग्नाच्या चार दिवस पहिली साखरपुडा होता मेघना च्या घरी साखरपुड्याची जय्यत तयारी केली होती मोरपंखी पुडा मेघना तर्फ तर देवमासा च्या रूपातला पुडा आदित्य तर्फ आणला केला संगीताच्या मस्त धुंदीत एकमेकांच्या बोटात अंगठी घालून मस्त मजेत हा कार्यक्रम पार पडला 


हळदीचा दिवस उजाडला आदित्य आणि मेघना प्रेमाच्या हळदीत न्हाहून केले होते‌ नातेवाईक संगे सोयरे नि दोघाचे हि घर गजबजून गेले होते त्याच संध्यकाळी आदित्यच्या मोबाईल वर एक मेसेज झळकला त्यांनी पहिले तर तो मेघना चा होता तो मेसेज वाचून जरा त्याला विचित्र वाटले पण मेघना च्या परत आलेल्या मेसेज ने त्याचा चहेरां खुलला 


लग्नाचा दिवस उजाडला शेरवानीत आदित्य खुलून दिसत होता तर साडी मध्ये मेघनाचे रूप अधिक उजळले होते आमंत्रिकांनी लग्नाचा हॉल भरून गेला होता मंगलाष्टके सुरु झाली आणि क्षणात आदित्यच्या नावाचे मंगळसूत्र मेघनाच्या गळ्यात पडले देव कार्य पार पडून मेघनाची पाठवणी सासरी झाली आई बाबा भावुक झाले मेघना त्याची एकुलती एक होती आदित्यच्या घरच्या दरवाजावर पोहचताच सगळ्यांनी उखाणा घेण्यासाठी मेघना ला सांगितले तशी मेघना ने सुरुवात केली 


"एका नजरेत आम्ही एकमेकाचे कधी झालो ते आम्हला कळलेच नाही 


आदित्य चे नाव घेताना वाटतो मला अभिमान भारी 


हे ऐकून सगळ्यांनी टाळया वाजवल्या आदित्य ने मेघना कडे पहिले मेघना ने त्याला खुणेने काही सूचित केले 


सगळे आता आदित्यच्या मागे लागले" उखाणा तयार आहे ना आदित्य उखाणा नाहीतर प्रवेश नाही आदित्य ने हसत हसत म्हण्टले हो आहे आदित्यने एक नजर मेघना कडे टाकली आणि सुरवात केली 


"आदित्य ची भेट झाली मेघना शी 


जुळले एक अतूट नाते मनाशी "


"आदित्यचा आदी "


"आणि मेघनातला घना जोडून "


"स्वागत करतो आदीघना ला माझ्या घरी "


हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले कारण नाव वेगळे होते आदित्य ने सगळयांना पाहत हसला मेघना ने गृहप्रवेश केला देव कार्य आटपून सगळे बसले सगळयांच्या चेहऱ्यावर नाव जाणून घेण्याची उत्सुकता होती आदित्य ला कोणी विचारण्यात आताच आदित्यने सुरवात केली 


"कसे नाव वाटले अदिघना "?


"अरे पण तू नाव बदलणार नव्हतास ना मग "


हे ऐकून मेघना म्हणाली "नाही मलाच नांव बदलायचं नव्हतं पण त्या साठी त्यांनी एक वेगळं पाऊल उचल तुम्ही घरातले सगळेच त्याचावर नाराज झालात हे जेव्हा मला कळले तेव्हा मला खूप वाईट वाटले माझ्यामुळे तुमच्यात दुरावा आलेला मला चालणार नव्हता आणि आदित्य सारखा जोडीदार मिळाला हेच माझ्या साठी मोठे आहे म्हणून मी आदित्यला हळदी दिवशी माझ्या नावाचा मेसेज केला मला माझ्या नव्या नात्याची सुरवात कडवट रित्या सुरु नाही करायची आजी आजोबा जो काही तो बोला तो फक्त माझ्यासाठी बोला आता सगळं विसरून जा आणि ह्या अदिघनाला आशीर्वाद द्या 


हे ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मेघनाचं तोंडभरून कौतुक हि केलं 


आदित्य ने मेघना कडे पहिले आणि "थँक्स माझ्यासाठी तुझी अपेक्षा बाजूला ठेवलीस "


"आदित्य हि माझीच अपॆक्षा नाही तर हर एक लग्न होणाऱ्या मुलीची असते पण जो पर्यत आपली नाव बदलण्याची मानसीकता बदल नाही तो पर्यंत मुली जन्म एका नावाने घेतील आणि आयुष्याची बाकीची वर्ष दुसऱ्या नावाने जगतील आणि नेहमी दोन नावाची कसरत करत राहतील "


आदित्य ने मेघना च्या डोक्यावर हात ठेवलाआणि म्हणाला "तू बाकीच्या साठी आदिघना अशील पण माझ्यासाठी मेघनाच राहशील "


आदित्यला भावुक होताना पाहत मेघना म्हणाली वेड्या तसं हि हे नाव मला आवडलं आहे "सो लेट्स स्टार्ट आदित्य न्यू जर्नी ऑफ आदिघना "



समाप्त



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance